ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये ऋतुचक्राची माहिती लॉग करणे

तुम्ही ऋतुचक्राची माहिती लॉग करू शकता ज्यामुळे तुम्ही मासिक पाळी आणि ‘गर्भधारणेसाठी योग्य काळ’ ह्याबद्दलचे अंदाज मिळवू शकता.

Siri : सपोर्ट करणाऱ्या मॉडेल वर, असे काहीतरी म्हणा : “Log that my period started today.” सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

सायकल ट्रॅकिंग सेट अप करणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. साइडबार बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सायकल ट्रॅकिंग’ वर टॅप करा.

  3. ‘प्रारंभ करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    तुमचे मासिक पाळीचे आणि ‘गर्भधारणेसाठी योग्य काळ’ ह्याबाबतचे अंदाज सुधारण्यात मदत करण्यासाठी, विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.

तुमच्या ऋतुचक्राची माहिती लॉग करणे

तुम्ही मासिक पाळीचे दिवस लॉग करू शकता आणि लक्षणे, स्पॉटिंग, शरीराचे तापमान आणि बऱ्याच माहितीचा मागोवा घेऊ शकता.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. साइडबार बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सायकल ट्रॅकिंग’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    स्क्रीनच्या शीर्षस्थानी आठवड्याची टाइमलाइन दाखवणारी ‘सायकल ट्रॅकिंग’ स्क्रीन. लाल घन वर्तुळे आणि जांभळे डॉट टाइमलाइनवर पहिले 5 दिवस चिन्हांकित करतात. टाइमलाइनच्या खाली मासिक पाळी, लक्षणे आणि इतर बरीच माहिती समाविष्ट करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.
    • मासिक पाळीचा दिवस लॉग करा : स्क्रीनच्या वरच्या बाजूला टाइमलाइनमध्ये दिवसावर टॅप करा. किंवा वरच्या उजव्या बाजूला ’मासिक पाळी समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर मासिक दिनदर्शिकेतील दिवस सिलेक्ट करा.

    • एका दिवसासाठी रक्तस्रावाची पातळी लॉग करा : दिवस सिलेक्ट करण्यासाठी टाइमलाइन स्वाइप करा, ‘मासिक पाळी’ (‘रक्तस्त्राव’ च्या खाली) वर टॅप करा, पर्याय निवडा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • लक्षणे, स्पॉटिंग किंवा इतर माहिती लॉग करा : दिवस सिलेक्ट करण्यासाठी टाइमलाइन स्वाइप करा, श्रेणीवर (‘इतर डेटा’ च्या खाली) टॅप करा, माहिती प्रदान करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

डेटा लॉगिंग स्क्रीनवर श्रेणी समाविष्ट करण्यासाठी, ‘लॉग’ च्या पुढे ‘पर्याय’ वर टॅप करा, त्यानंतर ‘लॉग’ च्या खाली असलेल्या श्रेणींमधून निवडा.

नोट : तुमच्या ऋतुचक्राची माहिती लॉग करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही Apple Watch वापरू शकता. Apple Watch ‘यूझर गाइड’ मध्ये Apple Watch वर ‘सायकल ट्रॅकिंग’ वापरा पहा.

तुमचा लॉग संपादित करणे

तुमची लॉग केलेली माहिती स्क्रीनच्या वरच्या बाजूला टाइमलाइनमध्ये दिसते, जिथे घन लाल वर्तुळ तुम्ही मासिक पाळी लॉग केलेला दिवस प्रदर्शित करते आणि जांभळा डॉट तुम्ही अतिरिक्त माहितीसह लॉग केलेला दिवस प्रदर्शित करतो. टाइमलाइनमध्ये सिलेक्ट केलेल्या दिवसाचा डेटा ‘ऋतुचक्र लॉग’ मध्ये दिसतो (टाइमलाइनच्या खाली). तुमची लॉग केलेली माहिती बदलण्यासाठी, पुढील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. साइडबार बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सायकल ट्रॅकिंग’ वर टॅप करा.

  3. दिवस सिलेक्ट करण्यासाठी टाइमलाइनवर स्वाइप करा.

  4. डेटाच्या श्रेणीवर टॅप करा (उदाहरणार्थ ऋतुचक्र किंवा लक्षणे), तुमचे बदल करा, नंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

मासिक पाळीचा दिवस अनमार्क करण्यासाठी, टाइमलाइनमध्ये त्याच्या घन लाल वर्तुळावर टॅप करा.

ऋतुचक्राचे घटक मॅनेज करणे

तुम्ही गरोदरपण, स्तनपानाच्या आणि गर्भनिरोधक वापराबाबत माहिती प्रविष्ट करता, तेव्हा ती माहिती तुमचे ऋतुचक्राचे अंदाज मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी वापरली जाते.

  1. साइडबार बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सायकल ट्रॅकिंग’ वर टॅप करा.

  2. ‘घटक’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • घटक समाविष्ट करा : ‘घटक समाविष्ट करा’ वर टॅप करा, घटक सिलेक्ट करा, जर तुम्हाला सुरुवातीचा दिनांक बदलायचा असेल तर ’सुरू झाले’ वर टॅप करा, नंतर ’समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • चालू घटकाच्या समाप्तीचा दिनांक बदला : घटकावर टॅप करा, ‘समाप्त झाले’ वर टॅप करा, दिनांक सिलेक्ट करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

    • सध्याचा घटक हटवा : घटकावर टॅप करा, नंतर ’घटक हटवा’ वर टॅप करा.

तुमचा आरोग्य डेटा आणि गोपनीयतेविषयी

तुम्ही ’आरोग्य’ मध्ये स्वतःबद्दल समाविष्ट केलेली माहिती तुम्हाला वापरण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी उपलब्ध आहे. ’आरोग्य’ मध्ये कोणती माहिती संग्रहित केली आहे आणि तुमचा डेटा कोण ॲक्सेस करू शकेल हे तुम्ही ठरवू शकता.

जेव्हा तुमचा iPad हा Face ID, Touch ID किंवा पासकोडसह लॉक केला जातो, तेव्हा तुमच्या वैद्यकीय ID व्यतिरिक्त ’आरोग्य’ मधील तुमचा सर्व आरोग्य आणि फिटनेस डेटा एनक्रिप्ट केला जातो. iCloud शी सिंक केलेला कोणताही आरोग्य डेटा ट्रान्झिटमध्ये आणि Apple सर्व्हरवर दोन्ही ठिकाणी एन्क्रिप्ट केला जातो. आणि जर तुमच्याकडे डिफॉल्ट टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि पासकोडसह, iPadOS, iOS आणि watchOS (तुम्ही ‘सायकल ट्रॅकिंग’ साठी iPhone आणि Apple Watch वापरत असल्यास) चे व्हर्जन असेल, तर तुमचा आरोग्य आणि ॲक्टिव्हिटी डेटा Apple वाचू शकणार नाही अशा प्रकारे संग्रहित केला जाईल.

ह्याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही ‘सायकल ट्रॅकिंग’ फीचर आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करता, तेव्हा तुमचा iCloud शी सिंक केलेला आरोग्य डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केला जातो आणि Apple कडे तो डेटा डिक्रिप्ट करण्यासाठी ‘की’ नाही आणि म्हणून Apple तो डेटा वाचू शकत नाही.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.