iPad वर डायरी लिहिण्याची सवय लावणे

‘डायरी’ ॲपसह, तुम्ही तुमच्या डायरी लिहिण्याच्या उद्दिष्टांचा ट्रॅक ठेऊ शकता आणि नवीन सवयी तयार करू शकता.

इनसाइटसह डायरी लिहिण्याच्या उद्दिष्ट्यांचा ट्रॅक ठेवणे

  1. तुमच्या iPad वरील ‘डायरी’ ॲप वर जा.

    तुमची सध्याची स्ट्रीक, तुम्ही सलग किती दिवस किंवा आठवडे डायरीमध्ये लिहले आणि इतर इनसाइट्स साइडबारमध्ये आहेत.

  2. ‘इनसाइट्स’ वर टॅप करा, नंतर अधिक तपशील पाहण्यासाठी कोणत्याही टाइलवर टॅप करा.

    टिप : साइडबार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

    सध्याची स्ट्रीक आणि लिहिलेल्या शब्दांची संख्या ह्यासारखे मेट्रिक्स दाखवणारी ‘डायरी’ ॲपमधील स्क्रीन.

डायरी लिहिण्याचे शेड्यूल सेट करणे

डायरी लिहिण्याच्या नोटिफिकेशन्ससह लिहिण्याची तुम्हाला आठवण करून दिली जाऊ शकते.

  1. तुमच्या iPad वरील ‘डायरी’ ॲप वर जा.

  2. साइडबारमध्ये, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘नोटिफिकेशन्स’ वर टॅप करा.

  3. ’कस्टम’ वर टॅप करा, त्यानंतर साप्ताहिक शेड्यूल सेट करा.

डायरी विजेट वापरणे

दिवसभर बदलत राहणाऱ्या तुमच्या सध्याच्या स्ट्रीक किंवा लिखाणाच्या प्रॉम्प्टसह तुमच्या होम स्क्रीन किंवा लॉक स्क्रीनवर विजेट समाविष्ट करा, ज्यामुळे तुम्ही ह्या क्षणी काय चालले आहे ह्यावर चिंतन करू शकता.

  1. iPad होम स्क्रीन किंवा लॉक स्क्रीनवर, डायरी विजेट समाविष्ट करा.

  2. विजेट बदलण्यासाठी, विजेटवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘विजेट संपादित करा’ वर टॅप करा.

  3. वेगवेगळ्या लिखाणाच्या प्रॉम्प्टमधून सिलेक्ट करण्यासाठी ‘विजेट’ वर टॅप करा, नवीन नोंद सुरू करा किंवा तुमच्या सध्याच्या स्ट्रीकबद्दलचे तपशील पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.