iPad वर ‘होम’ चा परिचय

तुम्ही ‘होम’ ॲपचा वापर करून लाईट, लॉक, आणि थर्मोस्टॅटसारख्या HomeKit आणि Matter एनेबल्ड ॲक्सेसरी सुरक्षितपणे समाविष्ट, नियंत्रित आणि ऑटोमेट करू शकता. जेव्हा तुम्ही सुरक्षा कॅमेरे सेट अप करता जे HomeKit सुरक्षित व्हिडिओला सपोर्ट करतात, तेव्हा तुम्ही व्हिडिओ कॅप्चर करू शकता, आणि जेव्हा कॅमेरा एखाद्या व्यक्तीला ओळखतो किंवा पॅकेज दरवाज्याजवळ ठेवले जाते तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होते. तुम्ही एकच ऑडिओ प्ले करण्यासाठी अनेक स्पीकर्सचे समूह तयार करू शकता, आणि सपोर्ट केलेल्या डिव्हाइसेसवर इंटरकॉम संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकता.

तुम्ही विशिष्ट वेळी ऑटोमॅटिकली चालवण्यासाठी, किंवा जेव्हा तुम्ही विशिष्ट ॲक्सेसरी सक्रिय करता (उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही समोरील दरवाजा उघडता) तेव्हा ऑटोमेशन तयार करू शकता. होम हब—Apple TV 4K (चौथे जनरेशन किंवा त्यापुढील) किंवा HomePod स्पीकर्सच्या मदतीने तुम्ही तुमचे घर रिमोट पध्दतीने नियंत्रित करू शकता . हे तुम्हाला, आणि तुम्ही आमंत्रित केलेल्या इतर व्यक्तींना, तुम्ही दूर असताना तुमच्या घरावर सुरक्षितपणे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

नोट : मॅटर एनेबल्ड अॅक्सेसरीसाठी ‘होम’ हब आवश्यक असते, जसे की HomePod स्पीकर किंवा Apple TV 4K. थ्रेड अॅक्सेसरीसाठी थ्रेड एनेबल्ड ‘होम’ हब आवश्यक असते, जसे की Apple TV 4K (तिसरी जनरेशन) Wi-Fi + इथरनेट, HomePod mini, सपोर्ट केलेले थर्ड पार्टी बॉर्डर राउटर, किंवा डिव्हाइस जे थ्रेड पेअरिंगला सपोर्ट करते.

होम ओव्हरव्ह्यू

होम ॲप तुम्हाला तुमच्या ॲक्सेसरी सहजपणे नॅव्हिगेट आणि नियंत्रित करण्यास मदत करते. होम ॲपमध्ये, पुढील विभाग दाखवण्यासाठी साइडबारमध्ये ‘होम’ वर टॅप करा :

  • श्रेणी : खोलीनुसार व्यवस्थापित केलेल्या सर्व संबंधित ॲक्सेसरी एकाच स्क्रीनवर दाखवण्यासाठी लाईट्स, सुरक्षा, हवामान, स्पीकर्स किंवा पाणी ह्यासारख्या श्रेणीवर टॅप करा.

  • कॅमेरा : ‘कॅमेरा’ च्या खाली जास्तीत जास्त चार कॅमेऱ्यांचा व्हिडिओ दिसू शकतो. अधिक कॅमेरे पाहण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.

  • सीन : टॅप किंवा Siri ने केलेल्या विनंतीद्वारे अनेक ॲक्सेसरी नियंत्रित करण्यासाठी दृश्ये तयार करा-ब्लाइंड बंद करण्यासाठी आणि संध्याकाळी लाइट चालू करण्यासाठी ‘सीन’ वर टॅप करा.

  • आवडते : ‘होम’ टॅबवरून त्वरित कंट्रोल करण्यासाठी तुम्ही सर्वाधिक वेळा वापरत असलेल्या ॲक्सेसरीला ‘आवडते' मध्ये समाविष्ट करा.

  • खोल्या : ॲक्सेसरी खोलीनुसार व्यवस्थापित केल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला फक्त तुम्हाला हवी असलेली ॲक्सेसरी शोधता येते.

डाव्या बाजूला साइडबार असलेले होम ॲप, वर डावीकडे होम, ऑटोमेशन आणि डिस्कव्हर टॅब दर्शवित आहे. ‘होम’ मधील श्रेणी आणि खोल्या खाली दिसतात. साइडबारच्या उजवीकडे, शीर्षस्थानी, ‘इंटरकॉम’, ‘समाविष्ट करा’, आणि ‘अधिक पर्याय’ बटणे आहेत. शीर्षस्थानाजवळ श्रेणी बटणे आहेत. त्याखाली दृश्ये, कॅमेरा इमेजेस आणि ॲक्सेसरीसह खोली आहे.

‘होम’ संपादित करणे

तुम्ही होम ॲप अशाप्रकारे व्यवस्थापित करू शकता, जे तुमच्यासाठी सर्वात योग्य असेल.

साइडबारमध्ये ‘होम’ वर टॅप करा, अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा.

  • आयटम पुन्हा व्यवस्थापित करा : ‘होम व्ह्यू संपादित करा’ सिलेक्ट करा, त्यानंतर टाइल वेगळ्या स्थानावर ड्रॅग करा. तुमचे काम पूर्ण झाल्यावर ‘पूर्ण झाले’ वर टॅप करा.

  • रिऑर्डर विभाग : होम स्क्रीनमध्ये विभागांना क्रमबद्ध करण्याची पद्धत बदलण्यासाठी, ‘विभाग पुन्हा क्रमबद्ध करा’ निवडा, त्यानंतर विभागाजवळील नवीन स्थानावर ‘रिऑर्डर करा’ बटण ड्रॅग करा. तुमचे काम पूर्ण झाल्यावर ‘झाले’ वर टॅप करा.

  • आयकॉनचा आकार बदला : ‘होम व्ह्यू संपादित करा’ सिलेक्ट करा, टाइलवर टॅप करा, ‘आकार बदला’ बटणवर टॅप करा, त्यानंतर ‘झाले’ वर टॅप करा.

तुमच्या Apple डिव्हाइससह स्मार्ट होम कसे तयार करावे आणि ॲक्सेसराइज करावे ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, साइडबारमध्ये ‘शोधून काढा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.