ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

सायबर अटॅकपासून बचाव करण्यासाठी लॉकडाउन मोडसह तुमच्या iPad चे संरक्षण करणे

‘लॉकडाउन मोड’ हे iPad साठी उच्च संरक्षणात्मक फीचर आहे. सुरक्षित वायरलेस कनेक्टिव्हिटी डिफॉल्ट, मीडिया हाताळणी, मीडिया शेअरिंग डिफॉल्ट, सॅण्डबॉक्सिंग आणि नेटवर्क सिक्युरिटी ऑप्टिमायझेशन ह्यासारख्या संरक्षणांचा समावेश आहे.

‘लॉकडाउन मोड’ ऐच्छिक आहे आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला राज्य प्रायोजित भाडोत्री स्पायवेअर विकसित करणाऱ्या खाजगी कंपनीसारख्या अत्यंत अत्याधुनिक सायबर अटॅकने लक्ष्य केले जाऊ शकते केवळ तेव्हाच हे वापरायला हवे.

महत्त्वाचे : अशा प्रकारच्या ॲटॅक्सनी बहुतांश लोक कधीही लक्ष्यित होत नाहीत.

iPad लॉकडाउन मोडमध्ये असताना, तो नेहमीप्रमाणे कार्य करत नाही. ॲप, संकेतस्थळे आणि फीचर ही सुरक्षिततेसाठीच काटेकोरपणे मर्यादित आहेत आणि ह्यासह काही कार्यक्षमता उपलब्ध नाहीत.

लॉकडाउन मोडविषयी जाणून घेणे

सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘लॉकडाउन मोड’ वर जा, नंतर ‘अधिक जाणून घ्या’ वर टॅप करा.

लॉकडाउन मोड चालू करणे

सेटिंग  > गोपनीयता व सुरक्षा > ‘लॉकडाउन मोड’ वर जा, नंतर ‘लॉकडाउन मोड' चालू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.