ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर Apple Music ची सदस्यता घेणे

Apple Music ही एक जाहिरातमुक्त स्ट्रीमिंग संगीत सेवा आहे जी तुम्हाला लाखो गाणी आणि तुमची संगीत लायब्ररी प्ले करू देते. सदस्य म्हणून, तुम्ही कोणत्याही वेळी—ऑनलाइन किंवा ऑफलाइन ऐकू शकता आणि तुमची स्वतःची प्लेलिस्ट तयार करू शकता, Lossless आणि डॉल्बी ॲटमॉस संगीत स्ट्रीम आणि डाउनलोड करू शकता, वैयक्तिकृत शिफारसी मिळवू शकता, कलाकारांना फॉलो करू शकता, तुमचे फ्रेंड्स कोणते संगीत ऐकत आहेत ते पाहू शकता, विशेष व्हिडिओ कॉण्टेंट पाहू शकता आणि बरेच काही करू शकता.

तुम्ही Apple Music किंवा Apple One ची सदस्यता घेऊ शकता, ज्यामध्ये Apple Music आणि इतर सेवा समाविष्ट आहेत. Apple One सह Apple सदस्यता एकत्रित करणे Apple सपोर्ट लेख पहा.

नोट : Apple Music, Apple One, Lossless आणि डॉल्बी ॲटमॉस सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Apple Music ची सदस्यता घेणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. Apple Music ची सदस्यता घेण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    जेव्हा तुम्ही पहिल्यांदा संगीत ॲप उघडता तेव्हा जर तुम्ही Apple Music ची सदस्यता घेतली नसेल, तर तुम्ही नंतर सदस्यता घेऊ शकता—सेटिंग  > ॲप > ‘संगीत’ वर जा, आणि नंतर ‘Apple Music जॉइन करा’ वर टॅप करा.

नवीन सदस्य ट्रायल सुरू करू शकतात आणि कोणत्याही वेळी रद्द करू शकतात. जर तुम्ही तुमची Apple Music सदस्यता बंद केली, तर तुम्ही ह्यापुढे Apple Music गाणी स्ट्रीम करू शकणार नाही किंवा तुम्ही डाउनलोड केलेली Apple Music गाणी प्ले करू शकणार नाही.

प्राप्त विद्यार्थी सवलतीच्या दरात विद्यार्थी सदस्यता खरेदी करू शकतात. Apple सपोर्ट लेख Apple Music विद्यार्थी सदस्यता मिळवा पहा. Apple Music बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि किंमत ठरवण्यासाठी Apple Music संकेतस्थळावर जा.

कुटुंबातील सदस्यांसोबत Apple Music शेअर करणे

जेव्हा तुम्ही Apple Music, Apple One फॅमिली, किंवा Apple One Premier ची सदस्यता घेता, तेव्हा तुम्ही कुटुंबातील जास्तीत जास्त पाच इतर सदस्यांबरोबर Apple Music शेअर करण्यासाठी कौटुंबिक शेअरिंगचा वापर करू शकता. तुमचे कुटुंब सेट अप झाल्यानंतर, तुमच्या कौटुंबिक गटाला काहीही करण्याची गरज नाही— तुमची सदस्यता सुरु झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा संगीत ॲप उघडतात, तेव्हा त्यांच्यासाठी Apple Music उपलब्ध असते.

जर तुम्ही Apple Music, Apple One कुटुंब किंवा Apple One Premier ची सदस्यता घेतलेला कौटुंबिक गट जॉइन केलात, आणि तुम्ही आधीच सदस्यता घेतली असल्यास, तुमच्या पुढच्या बिलिंग दिनांकाला तुमची सदस्यता नूतनीकृत केली जात नाही; त्याऐवजी तुम्ही गटाची सदस्यता वापरता. तुम्ही सदस्यता न घेतलेला कौटुंबिक गट जॉइन केल्यास, गट तुमची सदस्यता वापरतो.

नोट : कौटुंबिक गटाबरोबर Apple Music शेअर करणे थांबवण्यासाठी, तुम्ही सदस्यता रद्द करू शकता, कौटुंबिक शेअरिंग गटातून बाहेर पडू शकता किंवा कौटुंबिक शेअरिंग गटातून एखाद्या सदस्याला काढून टाकू शकता.

तुमची Apple Music सदस्यता बदलणे किंवा रद्द करणे

तुम्ही तुमचा सदस्यता प्लॅन बदलू शकता किंवा तुमची सदस्यता रद्द करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘साइडबार दाखवा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर साइडबारच्या तळाशी तुमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘सदस्यता मॅनेज करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुमच्याकडे Apple Music ची सदस्यता असल्यास, तुम्ही ॲम्बिएंट संगीत विजेटमधील प्लेलिस्टमधूनही संगीत प्ले करू शकता. तुमच्या होम स्क्रीनवर विजेट समाविष्ट करणे पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.