ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी ‘सुरक्षा की’ वापरणे

तुमच्या Apple अकाउंटसाठी ‘सुरक्षा की’ ही एक पर्यायी सुरक्षा सुविधा आहे जी फिशिंग आणि सोशल इंजिनियरिंग स्कॅमसह त्यांच्या अकाउंटवर होणाऱ्या लक्ष्यित हल्ल्यापासून अतिरिक्त संरक्षण हवे असलेल्या लोकांसाठी (जसे की सेलिब्रिटी, पत्रकार आणि सरकारी सदस्य) तयार केली गेली आहे.

‘सुरक्षा की’ हे एक लहान तृतीयपक्षी हार्डवेअर डिव्हाइस आहे, ज्याला तुम्ही तुमच्या iPad ला कनेक्ट करू शकता आणि तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करताना तुमची ओळख पडताळण्यासाठी ह्याचा वापर करू शकता. ‘प्रत्यक्ष की’ सामान्यतः टू फॅक्टर ऑथेंटिकेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सहा अंकी पडताळणी कोडची जागा घेते, ज्यामुळे ह्या माहितीत अडथळा आणला जाऊ शकत नाही किंवा हल्लेखोराकडून विनंती केली जाऊ शकत नाही.

‘सुरक्षा की’ च्या आवश्यकतांच्या तपशीलांसाठी, तुमच्या Apple अकाउंटसाठीच्या ‘सुरक्षा की’ विषयी माहिती ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

सुरक्षा ‘की’ सेट अप करणे

तुम्हाला किमान दोन सुरक्षा ‘की’ सेट अप कराव्या लागतील जेणेकरून तुम्ही त्यातील एका ‘की’ चा वापर बॅकअप म्हणून करू शकाल, जर इतर ‘की’ हरवली, खराब झाली किंवा चोरीला गेली असेल तर. तुम्ही तुमच्या अकाउंटबरोबर जास्तीत जास्त सहा ‘की’ पेअर करू शकता.

नोट : NFC ‘सुरक्षा की’ सध्या iPad वर सपोर्ट केल्या जात नाहीत.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

  3. ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वर टॅप करा, ‘सुरक्षा की’ वर टॅप करा, त्यानंतर ‘सुरक्षा की समाविष्ट करा’ वर टॅप करा आणि ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

सुरक्षा की वापरून डिव्हाइस, संकेतस्थळ किंवा ॲपमध्ये साइन इन करणे

  1. प्रॉम्प्ट केल्यावर, तुमची सुरक्षा की इन्सर्ट करा.

  2. ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुमचा Apple अकाउंट पासवर्ड रीसेट करण्यासाठी ‘सुरक्षा की’ वापरणे

जर तुम्ही तुमचा Apple अकाउंट पासवर्ड विसरलात, तर तुम्ही तुमच्या अकाउंटसह पेअर केलेली ‘सुरक्षा की’ वापरून त्याला रीसेट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

    जर तुम्ही तुमच्या iPad वरील तुमच्या Apple अकाउंटमध्ये आधीच साइन इन केलेले नसेल, तर साइन इन करण्यासाठी प्रथम तुमची ‘पेअर केलेली सुरक्षा की’ वापरा.

  3. ‘पासवर्ड बदला’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

Apple अकाउंट अनलॉक करण्यासाठी ‘सुरक्षा की’ वापरणे

जर तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये सलग सहा वेळा साइन इन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, किंवा जर तुमच्या iPad मध्ये संशयास्पद ॲक्टिव्हिटीची इतर चिन्हे आढळली, तर तुम्हाला तुमचे Apple अकाउंट लॉक केले गेल्याचे ऑनस्क्रीन नोटिफिकेशन प्राप्त होईल. त्याला अनलॉक करण्यासाठी तुम्ही तुमची ‘सुरक्षा की’ वापरू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

  3. ’अकाउंट अनलॉक करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचे Apple अकाउंट अनलॉक करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

  4. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पासवर्ड दुसऱ्या कोणालातरी माहीत असल्यामुळे तुमचे अकाउंट लॉक केले गेले असेल, तर ‘पासवर्ड बदला’ वर टॅप करा आणि नवीन पासवर्ड प्रविष्ट करा.

  5. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

‘सुरक्षा की’ काढून टाकणे

तुम्ही तुमच्या Apple अकाउंटबरोबर जास्तीत जास्त सहा ‘सुरक्षा की’ पेअर करू शकता. जर तुम्ही मर्यादा गाठली आणि तुम्हाला अतिरिक्त ‘की’ पेअर करायची असेल, तर तुम्ही तुमच्या पेअर केलेल्या ‘की’ पैकी एक किंवा अधिक काढून टाकू शकता. तुम्ही कोणत्याही वेळी काढून टाकलेल्या ‘की’ बदलू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

  3. ‘सुरक्षा की’ वर टॅप करा.

  4. सर्व ‘की’ काढून टाकण्यासाठी, ’सर्व की काढून टाका’ वर टॅप करा, त्यानंतर ’काढून टाका’ वर टॅप करा.

    ‘वैयक्तिक की’ काढून टाकण्यासाठी, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या ‘की’ वर टॅप करा, त्यानंतर ’की काढून टाका’ वर टॅप करा.

नोट : तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमधून सर्व ‘सुरक्षा की’ काढून टाकल्यास, अकाउंट टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी सहा अंकी पडताळणी कोड पुन्हा वापरतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.