iPad वर Safari वापरून वेब ब्राउझ करणे

तुम्ही वेब ब्राउझ करू शकता, संकेतस्थळे बघू शकता, संकेतस्थळांच्या लिंक प्रीव्ह्यू करू शकता, वेबपृष्ठांचे भाषांतर करू शकता, आणि Safari ॲप काढून टाकले गेले असल्यास ते पुन्हा तुमच्या होम स्क्रीनवर समाविष्ट करू शकता. जर तुम्ही iCloud मध्ये त्याच Apple अकाउंट ने तुमच्या सर्व डिव्हाइसवर साइन इन केले, तर तुम्ही इतर डिव्हाइसवर उघडलेली पृष्ठे पाहू शकता आणि तुमचे बुकमार्क, हिस्ट्री आणि रिडिंग लिस्ट तुमच्या सर्व डिव्हाइसवर अद्ययावत ठेवू शकता.

उघडलेले वेबपृष्ठ. वरच्या बाजूला, डावीकडून उजवीकडे, ‘साइडबार’ बटण, ‘मागील’ बटण, सर्च फील्ड, ’शेअर करा’ बटण, ’नवीन टॅब’ बटण आणि ’टॅब ओव्हरव्ह्यू’ बटण आहे.

वेबपृष्ठावर जाणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. सर्च फील्डमध्ये वेबपृष्ठाचे नाव किंवा वेब ॲड्रेस (URL) प्रविष्ट करा.

Safari सह वेबसाइट बघणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • शीर्षस्थानी परत जा : लांब पृष्ठाच्या शीर्षस्थानी त्वरित परत येण्यासाठी विंडोच्या वरील कडेवर डबल टॅप करा.

    • पृष्ठाबद्दल अधिक जाणून घ्या : iPad ला लॅण्डस्केप ओरिएंटेशनमध्ये टर्न करा.

    • पृष्ठ रिफ्रेश करा : पृष्ठाच्या वरच्या भागातून खाली ओढा.

    • लिंक शेअर करा : विंडोच्या वरच्या उजव्या बाजूला शेअर बटण वर टॅप करा.

संकेतस्थळाच्या लिंक प्रीव्ह्यू करणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. पृष्ठ न उघडता लिंकचा प्रीव्ह्यू पाहण्यासाठी Safari मधील लिंकवर टच आणि होल्ड करा.

    लिंक उघडण्यासाठी, ‘प्रीव्ह्यू’ वर टॅप करा किंवा ‘उघडा’ वर टॅप करा. प्रीव्ह्यू बंद करण्यासाठी आणि सध्याच्या पृष्ठावर राहण्यासाठी, प्रीव्ह्यूच्या बाहेर कुठेही टॅप करा.

    संकेतस्थळासाठी प्रीव्ह्यू. प्रीव्ह्यूच्या उजवीकडे एक मेन्यू आहे ज्यात उघडा, बॅकग्राउंडमध्ये उघडा, न्यू विंडोमध्ये उघडा आणि बरेच काही समाविष्ट असलेले पर्याय दाखवितो.

वेबपृष्ठाचे भाषांतर करणे

जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेतील एखादे वेबपृष्ठ बघता, तेव्हा तुम्ही त्याचे (सर्व भाषांमध्ये किंवा प्रदेशात उपलब्ध नाही) भाषांतर करण्यासाठी Safari चा वापर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. ‘पृष्ठ मेन्यू’ बटण वर टॅप करा, नंतर 'भाषांतर करा' बटण वर टॅप करा (भाषांतर उपलब्ध असल्यास).

डाउनलोड मॅनेज करणे

  1. तुमच्या iPad वर Safari ॲपवर जा.

  2. तुम्हाला डाउनलोड करायच्या असलेल्या फाइल किंवा लिंकवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘लिंक केलेली फाइल डाउनलोड करा’ वर टॅप करा.

    तुम्ही डाउनलोड करत असलेल्या फाइलची स्थिती तपासण्यासाठी, डाउनलोड केलेल्या फाइल त्वरित ॲक्सेस करण्यासाठी किंवा डाउनलोड केलेल्या फाइलला तुम्ही कार्यरत असलेल्या दुसऱ्या फाइलवर किंवा ईमेलमध्ये ड्रॅग करण्यासाठी ‘डाउनलोड करा’ बटण वर टॅप करा.

टिप : तुम्ही Safari चा वापर करत असताना बॅकग्राऊंडमध्ये फाइल डाउनलोड करू शकता.

तुमच्या होम स्क्रीनवर Safari पुन्हा समाविष्ट करणे

जर तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवर Safari दिसत नसेल, तर तुम्ही ते ॲप लायब्ररीमध्ये शोधू शकता आणि पुन्हा समाविष्ट करू शकता.

  1. होम स्क्रीनवर, तुम्हाला ॲप लायब्ररी दिसेपर्यंत डावीकडे स्वाइप करा.

  2. सर्च फील्डमध्ये "Safari" प्रविष्ट करा.

  3. Safari ॲप आयकॉन वर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ‘होम स्क्रीनमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.