iPad वर दिशानिर्देश प्राप्त करण्यासाठी Siri वापरणे

तुम्ही Siri ला प्रवासाचे दिशानिर्देश मिळवण्यास, रहदारीच्या घटना कळवण्यास, तुमच्या आगमनाची अंदाजित वेळ (ETA) शेअर करण्यास, जवळपासची आकर्षणे शोधण्यास आणि बरेच काही करण्यास सांगू शकता. जेव्हा स्थान सेवा चालू केलेली असते, तेव्हा Siri स्थानावर आधारित माहितीदेखील प्रदान करते—जसे की तुम्ही विशिष्ट स्थानाहून निघाल्यावर तुम्हाला कशाची तरी आठवण करून देणे.

प्रवास दिशानिर्देश प्राप्त करणे

दिशानिर्देश प्राप्त करण्यासाठी तुम्ही Siri चा वापर करून रस्त्यावर लक्ष केंद्रित करू शकता. आणि टर्न-बाय-टर्न बोलले जाणारे दिशानिर्देश ऐकून, तुम्ही तुमचा iPad न पाहताही ड्रायव्हिंग, सायकलिंग आणि वॉकिंगचे दिशानिर्देश फॉलो करू शकता.

Siri : तुमच्या iPad वर, “Give me directions home” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा किंवा तुम्ही करू शकणाऱ्या विनंत्यांसाठी खालील कल्पना पहा.

ड्रायव्हिंग दिशानिर्देश प्राप्त करणे

  • “Give me driving directions home”

वॉकिंगचे दिशानिर्देश प्राप्त करणे

  • “Give me walking directions home”

सार्वजनिक वाहतुकीचे दिशानिर्देश प्राप्त करणे

  • “Give me transit directions to the Ferry Building”

सायकलिंगचे दिशानिर्देश प्राप्त करणे

  • “Give me cycling directions home”

टिप : Siri वापरत असताना किंवा नकाशा ॲपमध्ये सर्च करताना तुम्ही तुमचे ’घर’, ’कार्यस्थळ’ किंवा ‘शाळेचा पत्ता’ ह्यासाठी दिशानिर्देश विचारू शकता. तुमचे घर, कार्यस्थळ किंवा शाळेचा पत्ता सेट करणे पहा.

रस्त्यावर Siri वापरणे

तुम्ही रस्त्यावर असताना, तुम्ही Siri चा वापर रहदारीच्या घटना कळवण्यासाठी, निवडक देश किंवा प्रदेशातील घटनांची स्थिती कळवण्यासाठी, तुमच्या आगमनाची अंदाजित वेळ (ETA) आणि बरेच काही शेअर करण्यासाठी करू शकता.

Siri : तुमच्या iPad वर, Siri सक्रिय करा, नंतर तुम्ही करू शकणाऱ्या विनंत्यांसाठी खालील कल्पना पहा.

तुमचा ETA शेअर करणे

  • “Share my ETA”

रहदारीसंबंधी घटना कळवणे

  • “Report an accident”

  • “There’s something on the road”

  • “There’s a speed check here”

धोक्याच्या किंवा अपघाताच्या स्थितीचा अहवाल

  • “The hazard is gone”

  • “Clear the accident”

तुम्ही पोहोचण्याच्या आधी दिशानिर्देश समाप्त करणे

  • “Stop navigating”

जवळपासची आकर्षक ठिकाणे, रेस्टॉरंट्स किंवा सेवा शोधणे

Siri : तुमच्या iPad वर, Siri सक्रिय करा, नंतर तुम्ही करू शकणाऱ्या विनंत्यांसाठी खालील कल्पना पहा.

  • “Find coffee near me”

  • “Find a gas station”

  • “Find a charging station”

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.