ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर स्क्रीन टाइम पासकोड तयार करणे, मॅनेज करणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे

तुम्ही स्वतःसाठी किंवा 18 वर्षांखालील अपत्यासाठी सिलेक्ट केलेल्या स्क्रीन टाइम सेटिंग बदलण्यापूर्वी प्रविष्ट करणे आवश्यक असलेला पासकोड तुम्ही तयार करू शकता (वय देश किंवा प्रदेशानुसार बदलते). एकदा तुम्ही स्वतःसाठी किंवा अपत्यासाठी पासकोड सेट केल्यानंतर, तुम्ही तो ‘सेटिंग’ ॲपमध्ये नंतर बदलू शकता किंवा काढून टाकू शकता. तुमच्या अपत्याचा पासकोड वापरल्यास तुम्हाला नोटिफिकेशन्सदेखील मिळू शकतात.

कुटुंबातील अपत्यासाठी ‘स्क्रीन टाइम मॅनेज करा’ स्क्रीन, जी पासकोड शेवटचा कधी वापरला होता आणि कोणत्या डिव्हाइसवर वापरला होता हे दर्शवते.

स्क्रीन टाइम पासकोड तयार करणे

जेव्हा तुम्ही ‘स्क्रीन टाइम’ पासकोड सेट अप करता, तेव्हा तुम्ही तुमच्यासाठी किंवा अपत्यासाठी निवडलेल्या सेटिंग बदलू शकण्यापूर्वी तो प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • तुमच्यासाठी पासकोड सेट अप करा : खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम सेटिंग लॉक करा’ वर टॅप करा.

    • अपत्यासाठी पासकोड सेट अप करा : ‘खाली’ स्क्रोल करा, त्यानंतर तुमच्या ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटातून कुटुंबातील सदस्य सिलेक्ट करा. खाली स्क्रोल करा, ’स्क्रीन टाइम मॅनेज करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम सेटिंग लॉक करा’ वर टॅप करा.

      तुम्हाला तुमचा कौटुंबिक शेअरिंग गट दिसत नसल्यास, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केल्याची आणि कौटुंबिक शेअरिंग सेट अप केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आणि iPad वर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे पहा.

  3. चार अंकी पासकोड प्रविष्ट करा, नंतर पडताळणी करण्यासाठी पुन्हा पासकोड प्रविष्ट करा.

    नोट : तुमच्यासाठी पासकोड सेट केल्यानंतर, तुम्ही स्क्रीन टाइम पासकोड रिकव्हरी देखील सेट करू शकता. तुम्ही हे फीचर सेट अप केल्यास, तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम पासकोड कधीही विसरल्यास तो रीसेट करण्यासाठी तुमचे Apple अकाउंट वापरू शकता.

स्क्रीन टाइम पासकोड बदलणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • तुमच्यासाठी पासकोड बदला : खाली स्क्रोल करा, ’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ वर टॅप करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ सिलेक्ट करा.

    • अपत्यासाठी पासकोड बदला : ‘खाली’ स्क्रोल करा, त्यानंतर तुमच्या ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटातून कुटुंबातील सदस्य सिलेक्ट करा. खाली स्क्रोल करा, ’स्क्रीन टाइम मॅनेज करा’ वर टॅप करा, ’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ वर टॅप करा, त्यानंतर’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ सिलेक्ट करा.

      तुम्हाला तुमचा कौटुंबिक शेअरिंग गट दिसत नसल्यास, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केल्याची आणि कौटुंबिक शेअरिंग सेट अप केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आणि iPad वर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे पहा.

  3. तुमचा सध्याचा पासकोड (तुमच्यासाठी पासकोड बदलत असल्यास) किंवा तुमच्या iPad साठीचा तुमचा सहा अंकी पासकोड (कुटुंबातील सदस्यासाठी पासकोड बदलत असल्यास) प्रविष्ट करा.

  4. नवीन चार अंकी पासकोड प्रविष्ट करा, नंतर त्याची पडताळणी करण्यासाठी नवीन पासकोड पुन्हा प्रविष्ट करा.

    टिप : जर तुमच्या अपत्याला त्याचा स्क्रीन टाइम पासकोड कळला, तर तुम्ही तो बदलू शकता आणि नंतर दिवसाच्या उर्वरित वेळेसाठी डाउनटाइम चालू करू शकता. स्क्रीनपासून दूर रहाण्याचा वेळ शेड्यूल करणे पहा.

स्क्रीन टाइम पासकोड काढून टाकणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • तुमच्यासाठी पासकोड काढून टाका : खाली स्क्रोल करा, ’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ वर टॅप करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम पासकोड बंद करा’ सिलेक्ट करा.

    • अपत्यासाठी पासकोड काढून टाका खाली स्क्रोल करा, नंतर तुमच्या ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटातून कुटुंबातील सदस्य सिलेक्ट करा. खाली स्क्रोल करा, ’स्क्रीन टाइम मॅनेज करा’ वर टॅप करा, ’स्क्रीन टाइम पासकोड बदला’ वर टॅप करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम पासकोड बंद करा’ सिलेक्ट करा.

      तुम्हाला तुमचा कौटुंबिक शेअरिंग गट दिसत नसल्यास, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केल्याची आणि कौटुंबिक शेअरिंग सेट अप केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आणि iPad वर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे पहा.

  3. तुमचा सध्याचा पासकोड (तुमच्यासाठी पासकोड बदलत असल्यास) किंवा तुमच्या iPad साठीचा तुमचा सहा अंकी पासकोड (कुटुंबातील अपत्यासाठी पासकोड बदलत असल्यास) प्रविष्ट करा.

शेवटच्या वेळी स्क्रीन टाइम पासकोड कधी वापरला गेला हे तपासणे

तुम्ही अपत्यासाठी स्क्रीन टाइम पासकोड सेट अप केल्यास, तुम्ही हा पासकोड शेवटचा कधी आणि कोणत्या डिव्हाइसवर वापरला गेला हे देखील बघू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ’स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा, त्यानंतर तुमच्या ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटातून कुटुंबातील अपत्य निवडा.

    तुम्हाला तुमचा कौटुंबिक शेअरिंग गट दिसत नसल्यास, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केल्याची आणि कौटुंबिक शेअरिंग सेट अप केलेले असल्याची खात्री करा. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आणि iPad वर कौटुंबिक शेअरिंग सेट अप करणे पहा.

  3. खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम मॅनेज करा’ वर टॅप करा.

    लहान मुलाचा स्क्रीन टाइम पासकोड त्याच्या डिव्हाइसवर वापरला गेला असल्यास, आईवडील/पालकांना नोटिफिकेशन प्राप्त होईल. सेटिंग > > स्क्रीन टाइम > [लहान मुलाचे नाव] > स्क्रीन टाइम मॅनेज करा > नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करा > ‘स्क्रीन टाइम पासकोड बंद करा’ वर जाऊन स्क्रीन टाइम पासकोड वापराची नोटिफिकेशन्स बंद केली जाऊ शकतात.

    नोट : जेव्हा लहान मुलाचा पासकोड iPadOS 18.5, iOS 18.5, macOS 15.5 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या डिव्हासवर वापरलेला असेल तेव्हाच स्क्रीन टाइम पासकोड वापर iPadOS 18.5 किंवा नंतरचे व्हर्जन असलेल्या iPad वर दिसेल.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.