ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर म्युझिक प्लेअर कंट्रोल वापरणे

तुम्ही संगीत ॲपमध्ये मिनीप्लेअर आणि ’आता प्ले होत आहे’ स्क्रीन अशा दोन वेगवेगळ्या प्रकारे संगीत प्ले करू शकता आणि नियंत्रित करू शकता.

टिप : मिनीप्लेअरमध्ये किंवा ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनवर ट्रॅकदरम्यान नॅव्हिगेट करण्यासाठी ट्रॅकच्या शीर्षकावर डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

मिनीप्लेअर वापरणे

मिनीप्लेअर सध्या प्ले होत असलेले गाणे दाखवतो. तुम्ही संगीत प्ले किंवा पॉज करण्यासाठी मिनीप्लेअर वापरू शकता किंवा पुढच्या ट्रॅकवर वगळू शकता.

खालच्या बाजूला ‘मिनीप्लेअर’ दाखवणारा ‘अल्बम्स’ टॅब. मिनीप्लेअर प्ले होत असलेल्या गाण्याचे शीर्षक दाखवतो.

‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनमध्ये कंट्रोल वापरणे

विविध कंट्रोल आणि बटणे दाखवणारी ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन.
  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. गाणे प्ले होत असताना, ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन उघडण्यासाठी मिनीप्लेअरवर टॅप करा.

  3. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • व्हॉल्यूम समायोजित करा : व्हॉल्यूम स्लायडर ड्रॅग करा.

      तुम्ही iPad च्या बाजूला असलेली व्हॉल्यूम बटणेदेखील वापरू शकता.

    • गाण्यातील कोणत्याही पॉइंटवर स्क्रब करा : प्लेहेड ड्रॅग करा.

    • कलाकार, अल्बम किंवा प्लेलिस्टमध्ये नॅव्हिगेट करा : गाण्याच्या शीर्षकाखालील कलाकाराच्या नावावर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

    • ॲनिमेटेड अल्बम कव्हर आर्ट चालू किंवा बंद करा : सेटिंग  > ॲप > ‘संगीत’ वर जा, त्यानंतर ‘ॲनिमेटेड आर्ट’ वर टॅप करा आणि पर्याय निवडा.

तुमच्या संगीतावरील अतिरिक्त नियंत्रणासाठी, ह्यापैकी कोणत्याही बटणावर टॅप करा :

कंट्रोल

वर्णन

‘’आता प्ले होत आहे’ स्क्रीन डिस्मिस करा’ बटण.

‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन डिस्मिस करा.

‘आवडते’ बटण.

गाण्याला ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करा. आयटम ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करा पहा.

अधिक बटण.

अधिक पर्यायांसाठी टॅप करा.

शफल बटण.

तुमची गाणी रॅंडम पद्धतीने (शफल) प्ले करण्यासाठी टॅप करा.

‘रिपीट करा’ बटण.

अल्बम, प्लेलिस्ट किंवा संपूर्ण यादी पुन्हा ऐकण्यासाठी टॅप करा. (किंवा एकच गाणे पुन्हा ऐकण्यासाठी डबल टॅप करा.)

’ऑटोप्ले करा’ बटण.

ऑटोप्ले वापरण्यासाठी टॅप करा, जी त्याच प्रकारची गाणी समाविष्ट करते आणि यादीच्या शेवटी ती प्ले करते.

AutoMix बटण.

AutoMix वापरण्यासाठी टॅप करा, जे DJ सारख्या गाण्यांमध्ये सुसंगतपणे ट्रांझिशन करते. (Apple Music सदस्यांसाठी उपलब्ध.)

‘क्रॉसफेड’ बटण.

’क्रॉसफेड’ वापरण्यासाठी टॅप करा, ज्यामुळे आधीचे गाणे फेड आउट होत असताना प्रत्येक गाणे फेड इन होते (हळूहळू गाण्याचा आवाज वाढतो).

‘भाषांतर आणि उच्चारण’ बटण.

जेव्हा तुम्हाला गाण्याचे बोल उच्चारण्यात किंवा भाषांतरित करण्यात मदत हवी असेल तेव्हा टॅप करा. हे बटण केवळ तेव्हाच दिसते जेव्हा तुमच्या iPad च्या प्राधान्य दिलेल्या भाषांच्या यादीशी जुळणारे भाषांतर किंवा उच्चारण उपलब्ध असते. (तुम्ही सेटिंग  > सामान्य > ‘भाषा व प्रदेश’ मध्ये ही यादी बघू शकता आणि थेट त्या यादीत भाषा समाविष्ट करू शकता.) सर्व भाषांमध्ये उपलब्ध नाही.

‘मागील ट्रॅक’ बटण.

गाण्याच्या सुरुवातीला परत जा. अल्बम किंवा प्लेलिस्टमधील मागील गाणे प्ले करण्यासाठी पुन्हा टॅप करा. सध्याच्या गाण्यात रिवाइंड करण्यासाठी टच आणि होल्ड करा.

‘पॉज करा’ बटण.

प्लेबॅक पॉज करा.

‘प्ले करा’ बटण.

सध्याचे गाणे प्ले करा.

‘पुढील ट्रॅक’ बटण.

वगळून पुढील गाण्यावर जा. सध्याच्या गाण्यात फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी टच आणि होल्ड करा.

‘गाण्याचे बोल’ बटण.

वेळेशी सिंक केलेले गाण्याचे बोल दाखवा (सर्व गाण्यांसाठी गाण्याचे बोल उपलब्ध नाहीत).

‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण.

Bluetooth किंवा AirPlay द्वारे एनेबल केलेल्या डिव्हाइसवर संगीत स्ट्रीम करा.

‘पुढील प्ले होत आहे’ बटण.

यादी दाखवा.

Bluetooth® किंवा AirPlay द्वारे एनेबल केलेल्या डिव्हाइसवर संगीत स्ट्रीम करणे

  1. तुमच्या iPad वर संगीत ॲपवर जा.

  2. गाणे प्ले होत असताना, ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन उघडण्यासाठी मिनीप्लेअरवर टॅप करा.

  3. ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर टॅप करा, त्यानंतर डिव्हाइस निवडा.

HomePod आणि इतर वायरलेस स्पीकर्सवर ऑडिओ प्ले करा पहा.

नोट : तुम्ही एकच संगीत अनेक AirPlay 2-द्वारे एनेबल केलेल्या डिव्हाइसवर प्ले करू शकता, जसे की दोन किंवा अधिक HomePod स्पीकर. तुम्ही AirPods चे दोन सेट एका iPad शी पेअर देखील करू शकता आणि त्याच गाण्याचा किंवा चित्रपटाचा फ्रेंडबरोबर आनंद घेऊ शकता. ह्या यूझर गाइडमध्ये अनेक AirPlay 2-एनेबल केलेल्या डिव्हाइसवर ऑडिओ प्ले करणे पहा आणि AirPods यूझर गाइडमध्ये AirPods आणि Beats हेडफोनसह ऑडिओ शेअर करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.