ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘रिमाइंडर’ मध्ये अकाउंट समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

रिमाइंडर ॲपमध्ये, तुम्ही—iCloud, एन्टरप्राइझने मॅनेज केलेले iCloud, Microsoft Exchange आणि Yahoo ह्यासारखे अनेक अकाउंट वापरू शकता—आणि तुमच्या सर्व कामाच्या याद्या एकाच ठिकाणी ठेवू शकता. समान अकाउंट वापरणाऱ्या तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर तुमचे रिमाइंडर अद्ययावत राहतात.

नोट : जेव्हा तुम्ही iCloud मधील अपडेट केलेले रिमाइंडर वापरता तेव्हा ह्या गाइडमध्ये वर्णन केलेले सर्व ‘रिमाइंडर’ फीचर उपलब्ध असतात. इतर अकाउंटचा वापर करताना काही फीचर उपलब्ध नसतात.

iCloud सह तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे रिमाइंडर अद्ययावत ठेवणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘iCloud’ वर टॅप करा, ‘सर्व पहा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘रिमाइंडर’ चालू करा.

iCloud मध्ये स्टोअर केलेले तुमचे रिमाइंडर—आणि तुम्ही त्यामध्ये केलेले कोणतेही बदल—तुमच्या iPhone, iPad, Apple Watch आणि Mac वर दिसतील, जेथे तुम्ही एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल.

iCloud मध्ये स्टोअर केलेले तुमचे रिमाइंडर अपडेट करणे

तुम्ही iOS 12 किंवा आधीच्या व्हर्जनसह ‘रिमाइंडर’ वापरत असाल, तर कदाचित तुम्हाला अटॅचमेंट, फ्लॅग, ‘यादीचे रंग आणि आयकॉन’ आणि ह्यासारखे बरेच फीचर वापरण्यासाठी iCloud मध्ये स्टोअर केलेले तुमचे रिमाइंडर अपडेट करावे लागतील.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘iCloud’ वर टॅप करा, ‘सर्व पहा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘रिमाइंडर’ चालू असल्याची खात्री करा.

  4. ‘रीमाइंडर’ ॲप वर जा.

  5. ‘रिमाइंडर’ मध्ये स्वागत आहे’ ह्या स्क्रीनवर, पुढील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा :

    • आत्ता अपडेट करा : अपडेटची प्रक्रिया सुरू करा.

    • नंतर अपडेट करा : तुमच्या याद्यांच्या वरच्या बाजूला निळे ‘अपडेट करा’ बटण दिसेल; तुम्ही तुमचे रिमाइंडर अपडेट करण्यासाठी तयार असाल तेव्हा त्यावर टॅप करा.

नोट : अपडेट केलेले रिमाइंडर iOS आणि macOS च्या आधीच्या व्हर्जनमधील रिमाइंडर ॲपला बॅकवर्ड सुसंगत नसतात. iOS 13 किंवा नंतरच्या व्हर्जनवर रिमाइंडर ॲप अपडेट करणे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

इतर अकाउंट समाविष्ट करणे

तुम्ही इतर अकाउंटमध्ये, जसे की Microsoft Exchange आणि Yahoo मध्ये तुमच्या कामांच्या याद्या मॅनेज करण्यासाठी रिमाइंडर ॲप वापरू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’रिमाइंडर’ ॲपवर टॅप करा.

  3. अकाउंटवर टॅप करा, त्यानंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • अकाउंट प्रदाता निवडा, नंतर तुमच्या अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    • तुमचा अकाउंट प्रदाता यादीमध्ये नसल्यास, ‘इतर’ वर टॅप करा, ‘CalDAV अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुमची ईमेल अकाउंट माहिती प्रविष्ट करा, नंतर त्या अकाउंटसाठी ‘रिमाइंडर’ चालू करा.

अकाउंट काढून टाकणे

जेव्हा तुम्ही अकाउंट काढून टाकता किंवा हटवता, तेव्हा त्यापुढे त्या अकाउंटमधील रिमाइंडर तुमच्या iPad वर दिसत नाहीत. रिमाइंडर तुमच्या इंटरनेट अकाउंट (उदाहरणार्थ, iCloud.com किंवा Microsoft Exchange) मध्ये आणि तुम्ही आधीपासून सेट अप केलेल्या इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये असतात.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’रिमाइंडर’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘रिमाइंडर अकाउंट’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला काढून टाकायचे असलेल्या अकाउंटवर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • अकाउंटवर रिमाइंडर वापरणे थांबवा : रिमाइंडर बंद करा.

      तुम्ही ‘दिनदर्शिका’ सारख्या इतर सेवांसाठी अकाउंटचा वापर चालू ठेवू शकता.

    • अकाउंटवर सर्व सेवा वापरणे थांबवा : ‘साइन आउट’ वर टॅप करा (iCloud अकाउंटसाठी) किंवा ‘अकाउंट हटवा’ वर टॅप करा (इतर अकाउंटसाठी).

      तुम्हाला ‘साइन आउट करा’ किंवा ‘अकाउंट हटवा’ दिसत नसल्यास, तुमचे अकाउंट तुमच्या संस्थेद्वारे मॅनेज केलेले असू शकते. काढून टाकण्याच्या सूचनांसाठी ॲडमिनिस्ट्रेटर पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.