ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर फॉर्म भरणे, डॉक्युमेंट्सवर स्वाक्षरी करणे आणि स्वाक्षऱ्या तयार करणे

तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्या iPad वर तुम्हाला प्राप्त झालेल्या डॉक्युमेंटवर स्वाक्षरी करू शकता. तुम्ही फॉर्म पूर्ण भरल्यानंतर, तुम्ही तुमची स्वाक्षरी समाविष्ट करू शकता आणि ती इतरांबरोबर शेअर करू शकता. तुम्ही संपर्क ॲपमध्ये जतन केलेल्या माहितीसह फॉर्म त्वरित भरण्यासाठी देखील तुम्ही ‘ऑटोफिल’ वापरू शकता. सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये, तुम्ही डॉक्युमेंटमध्ये तुमची स्वाक्षरी समाविष्ट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या इमेज आणि डॉक्युमेंटमध्ये वापरण्यासाठी अनेक स्वाक्षऱ्या तयार करण्यासाठी ‘मार्कअप’ चा वापर करू शकता.

फॉर्म भरणे आणि स्वाक्षऱ्या समाविष्ट करणे

  1. तुम्हाला उघडायची असलेल्या फाइलवर जा.

  2. डॉक्युमेंट उघडण्यासाठी फाइलवर टॅप करा.

    प्रॉम्प्ट केले गेल्यास, डॉक्युमेंट फाइल ॲपमध्ये उघडा, त्यानंतर ’जतन करा’ वर टॅप करा.

  3. ऑटोफिल बटण वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन कीबोर्डचा वापर करून टेक्स्ट प्रविष्ट करण्यासाठी रिक्त फील्डवर टॅप करा.

  4. दुसरी फील्ड भरण्यासाठी, त्यावर टॅप करा, नंतर टेक्स्ट प्रविष्ट करा.

  5. अतिरिक्त टेक्स्ट किंवा तुमची स्वाक्षरी समाविष्ट करण्यासाठी, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी एक कृती करा :

    • टेक्स्ट समाविष्ट करा : ’टेक्स्ट फॉर्म बॉक्स समाविष्ट करा’ वर टॅप करा, टेक्स्ट बॉक्स तुम्हाला फॉर्मवर हवा आहे अशा ठिकाणी ड्रॅग करा, त्यानंतर ऑनस्क्रीन कीबोर्ड वापरून टेक्स्ट प्रविष्ट करा.

    • तुमची स्वाक्षरी समाविष्ट करा : ’स्वाक्षरी समाविष्ट करा’ वर टॅप करा, तुमच्या बोटाने किंवा Apple Pencil ने तुमच्या नावावर स्वाक्षरी करा, त्यानंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा. तुमची स्वाक्षरी जिथे तुम्हाला डॉक्युमेंटवर दिसावी असे वाटते तिथे ड्रॅग करा.

  6. तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर, ‘Mail’, ‘संदेश’ किंवा ‘AirDrop’ वापरून पूर्ण झालेले डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा.

  7. डॉक्युमेंट बंद करण्यासाठी ’झाले’ वर टॅप करा.

ऑटोफिलसह फॉर्म भरणे

जोपर्यंत तुम्ही संपर्क ॲपमध्ये तुमचे ‘माझे कार्ड’ पूर्ण केलेले आहे तोपर्यंत तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती सपोर्ट केलेल्या फॉर्ममध्ये आणि डॉक्युमेंटमध्ये त्वरित प्रविष्ट करण्यासाठी ‘ऑटोफिल’ वापरू शकता.

  1. तुम्हाला उघडायची असलेल्या फाइलवर जा.

  2. डॉक्युमेंट उघडण्यासाठी फाइलवर टॅप करा.

    प्रॉम्प्ट केले गेल्यास, डॉक्युमेंट फाइल ॲपमध्ये उघडा, त्यानंतर ’जतन करा’ वर टॅप करा.

  3. ऑटोफिल बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘रिक्त फील्ड’ वर टॅप करा.

  4. फील्ड पूर्ण करण्यासाठी तुमच्या ‘जतन केलेल्या संपर्काची माहिती’ मधील पर्यायावर टॅप करा.

    तुमच्या संपर्क यादीमधून दुसऱ्या व्यक्तीची, जसे की कुटुंबातील सदस्याची किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीची माहिती प्रविष्ट करण्यासाठी ऑटोफिल वापरण्यासाठी ‘इतर निवडा’ वर टॅप करा.

  5. कोणतेही फील्ड सिलेक्ट करण्यासाठी त्यावर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन कीबोर्डचा वापर करून बदल करण्यासाठी पुन्हा टॅप करा.

  6. डॉक्युमेंट बंद करण्यासाठी ’झाले’ वर टॅप करा.

मार्कअपसह तुमची स्वाक्षरी समाविष्ट करणे

नोट्स आणि छायाचित्र ह्यासारख्या सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये, तुम्ही इमेजमध्ये आणि डॉक्युमेंटमध्ये तुमची स्वाक्षरी समाविष्ट करण्यासाठी ‘मार्कअप टूल’ वापरू शकता.

  1. सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये, मार्कअप बटण किंवा 'मार्कअप' वर टॅप करा.

  2. मार्कअप टूलबारमध्ये, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’स्वाक्षरी समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. तुमच्या नावावर स्वाक्षरी करण्यासाठी तुमचे बोट किंवा Apple Pencil वापरा.

    तुमची स्वाक्षरी पुन्हा करण्यासाठी, ‘क्लिअर करा’ वर टॅप करा, नंतर तुमच्या नावावर पुन्हा स्वाक्षरी करा.

  4. ‘पूर्ण’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणत्याही ॲडजस्टमेंट करा :

    • स्वाक्षरी मूव्ह करा : ती ड्रॅग करा.

    • स्वाक्षरीचा आकार बदला : आउटलाइनच्या बाजूने कोणताही डॉट ड्रॅग करा.

    • स्वाक्षरीच्या रेषेची जाडी किंवा रंग बदला : मार्कअप टूलबारमधील पर्यायावर टॅप करा.

    • स्वाक्षरी कट करा, कॉपी करा, डुप्लिकेट करा, शेअर करा किंवा हटवा : स्वाक्षरीच्या पुढे अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर पर्यायावर टॅप करा.

  5. जेव्हा तुम्ही स्वाक्षरी ॲडजस्ट करणे पूर्ण कराल, तेव्हा टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर टॅप करा.

स्वाक्षऱ्या समाविष्ट करणे किंवा हटवणे

तुम्ही स्वाक्षरी तयार केल्यानंतर, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मार्कअपसह स्वाक्षरी समाविष्ट कराल तेव्हा ती वापरण्यासाठी iPad द्वारे स्वाक्षरी जतन केली जाते. तुम्ही अनेक स्वाक्षऱ्या तयार करू शकता, जसे की टोपणनाव किंवा आद्याक्षरे आणि स्वाक्षऱ्या हटवू शकता.

  1. सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये, मार्कअप बटण किंवा 'मार्कअप' वर टॅप करा.

  2. मार्कअप टूलबारमध्ये, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’स्वाक्षरी समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. नवीन स्वाक्षरी तयार करण्यासाठी, ’स्वाक्षरी समाविष्ट करा किंवा काढून टाका’ वर टॅप करा, नंतर ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  4. ‘नवीन स्वाक्षरी’ च्या पुढे असलेल्या ॲरोवर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला समाविष्ट करायची आहे त्या स्वाक्षरीच्या प्रकारावर टॅप करा, जसे की दिलेले नाव, टोपणनाव किंवा आद्याक्षरे.

  5. स्वाक्षरी करण्यासाठी तुमचे बोट किंवा Apple Pencil वापरा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

स्वाक्षरी हटवण्यासाठी, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’स्वाक्षरी समाविष्ट करा’ वर टॅप करा. ’स्वाक्षरी समाविष्ट करा किंवा काढून टाका’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला हटवायच्या असलेल्या कोणत्याही स्वाक्षऱ्यांच्या पुढे हटवा बटण वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.