ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कॅल्क्युलेटर ॲपसह सुरुवात करणे

कॅल्क्युलेटर ॲपमध्ये , तुम्ही मूलभूत किंवा सायंटिफिक मोडमध्ये गणिते सोडवू शकता, एकके रूपांतरित करू शकता किंवा गणिते हाताने लिहू शकता आणि ‘गणितीय नोट्स’ वापरून आलेख काढू शकता.

iPad मेमरी, एक्स्पोनेन्शियल, लॉगॅरिदमिक आणि त्रिकोणमितीय फंक्शन्ससह सायंटिफिक कॅल्क्युलेटर दाखवत आहे.

टास्कसाठी कॅल्क्युलेटर निवडणे

मूलभूत गणित सोडवा किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटरवर स्विच करा जिथे तुम्ही घात, मूळ, घातांक, अपूर्णांक, लॉगरिदम, त्रिकोणमिती आणि बरेच काही समाविष्ट असलेली ॲडव्हांस्ड कॅल्क्युलेशन्स करू शकता. ‘मोड बदला’ बटण वर टॅप करा, ‘मूलभूत’ किंवा ‘सायंटिफिक’ वर टॅप करा, नंतर तुमची पदावली प्रविष्ट करा.

iPad वर चलन रुपांतरणासह मूलभूत कॅल्क्युलेटर.

एकके सहजपणे रूपांतरित करणे

‘मैल’ चे ‘मिलिमीटर’ मध्ये? ‘येन’ चे ‘युरो’ मध्ये? एकक रुपांतरण मोडसह लांबी, वजन, शक्ती, दाब, गती, चलन आणि ह्यासारखी बरीच एकके बदला. ‘मोड बदला’ बटण वर टॅप करा, ‘रुपांतरित करा’ सुरू करा, नंतर युनिट्स किंवा चलने निवडण्यासाठी युनिट बटण वर टॅप करा.

iPad वरील ‘कॅल्क्युलेटर’ ॲपमध्ये ‘गणितीय नोट्स’ दोन 3 चल समीकरणे आणि त्यांचे संबंधित 3D आलेख दाखवत आहे, त्यानंतर दोन आलेख एकत्रित असलेला तिसरा आलेख दाखवत आहे.

तुमची पदावली आलेखासह व्हिज्युअलाइज करणे

‘गणितीय नोट्स’ मध्ये पदावल्यांचे मूल्य काढा, चले असाइन करा आणि आलेख काढा. ‘मोड बदला’ बटण वर टॅप करा, 'गणितीय नोट्स' वर टॅप करा, त्यानंतर दोन किंवा तीन चलांसह समीकरण लिहा. तुमचा आलेख डिझाइन करण्यासाठी समीकरणाच्या बरोबर चिन्हावर टॅप करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.