iPad वर संपर्क माहिती समाविष्ट करणे आणि वापरणे

तुम्ही संपर्क ॲपचा वापर करून संपर्क तयार करू शकता, शोधू शकता, शेअर करू शकता आणि हटवू शकता.

Siri : Siri संपर्कातील व्यक्तीबद्दल माहिती अपडेट करू शकते. “Sarah Milos is my sister.” ह्यासारखे काहीतरी म्हणा,  Siri कसे वापरावे हे जाणून घ्या.

संपर्क तयार करणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

‘Mail’ मध्ये तुम्हाला आलेले ईमेल आणि ‘दिनदर्शिका’ ॲपमधील तुम्हाला आलेली आमंत्रणे ह्यासारख्या इतर ॲपच्या तुमच्या वापरानुसार, Siri तुम्हाला नवीन संपर्कही सुचवते. (हे फीचर बंद करण्यासाठी, सेटिंग  > ॲप > संपर्क > Siri वर जा, त्यानंतर ‘संपर्क सूचना दाखवा’ बंद करा.)

तुम्ही ज्याप्रकारे ‘संपर्क’ वापरता त्या पद्धतीवर आधारित, Siri इतर ॲपमध्ये संपर्क माहिती सूचना देखील प्रदान करते. (हे फीचर बंद करण्यासाठी, सेटिंग  > ॲप > संपर्क > Siri वर जा, त्यानंतर “ह्या ॲपमधून जाणून घ्या” बंद करा.) Siri सूचना पहा.

संपर्क शोधणे

संपर्क यादीच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘सर्च फील्ड’ वर टॅप करा, त्यानंतर नाव, पत्ता, फोन नंबर किंवा संपर्काची इतर माहिती प्रविष्ट करा.

तुम्ही ‘सर्च’ चा वापर करूनही तुमचे संपर्क सर्च करू शकता ( Spotlight सह सर्च करापहा).

संपर्क शेअर करणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. संपर्कावर टॅप करा, ’संपर्क शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला शेअर करायचे असलेल्या फील्ड्स निवडा.

  3. पूर्ण बटण वर टॅप करा त्यानंतर ‘संदेश’ किंवा ‘Mail’ ह्यासारखे शेअरिंग पर्याय निवडा.

संपर्कापर्यंत त्वरित पोहोचणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. संपर्कावर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही काम करण्यासाठी संपर्काच्या नावाच्या खाली असलेल्या बटणावर टॅप करा : संदेश सुरू करा, फोन कॉल करा किंवा FaceTime कॉल करा; किंवा ईमेल लिहा.

संपर्क पद्धतीसाठी डिफॉल्ट फोन नंबर किंवा ईमेल ॲड्रेस बदलण्यासाठी, संपर्काच्या नावाखाली त्या पद्धतीच्या बटणावर टच आणि होल्ड करा, नंतर यादीमधील सिलेक्शनवर टॅप करा.

संपर्क हटवणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. ‘संपर्क कार्ड’ वर जा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  3. खाली स्क्रोल करा, नंतर ‘संपर्क हटवा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.