ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमच्या दिनदर्शिका सेटिंग बदलणे

दिनदर्शिका ॲपमध्ये , तुम्ही iCloud, Google, Microsoft Exchange आणि Yahoo ह्यासारखे अनेक अकाउंट समाविष्ट करू शकता. नवीन इव्हेंट तयार करणे सोपे करण्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करेल अशाप्रकारे तुमची दिनदर्शिका डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही डिफॉल्ट सेटिंग बदलू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन इव्हेंटसाठी डिफॉल्ट दिनदर्शिका निवडू शकता, नवीन इव्हेंटचा कालावधी बदलू शकता, आणि बरेच काही करू शकता.

iCloud, Google, Exchange किंवा Yahoo दिनदर्शिका अकाउंट सेट अप करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. ’दिनदर्शिका अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. सेवेवर टॅप करा (उदाहरणार्थ iCloud, Microsoft Exchange किंवा Google), नंतर साइन इन करा.

CalDAV अकाउंट समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. ’दिनदर्शिका अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. ’इतर अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, नंतर ‘CalDAV अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  5. तुमच्या सर्व्हरची आणि अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

नोट : जर तुम्ही Push नोटिफिकेशन्सला सपोर्ट करत नसलेले अकाउंट समाविष्ट केले, तर तुम्ही अकाउंटमधील तुमची दिनदर्शिका अपडेट करण्यासाठी फेच शेड्यूल सेट करू शकता. सेटिंग  > ॲप > ‘दिनदर्शिका’ वर जा. ’दिनदर्शिका अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’नवीन डेटा फेच करा’ वर टॅप करा. ’फेच’ च्या खाली, शेड्यूल निवडा. तुम्ही ‘ऑटोमॅटिकली’ निवडल्यास, तुमचा iPad चार्ज होत असताना आणि Wi-Fi ला कनेक्ट केलेला असताना नवीन डेटा डाउनलोड केला जातो.

डिफॉल्ट दिनदर्शिका निवडणे

तुमच्याकडे अनेक दिनदर्शिका असल्यास, तुम्ही डिफॉल्ट दिनदर्शिका निवडू शकता आणि तुम्ही तयार केलेले कोणतेही नवीन इव्हेंट त्या दिनदर्शिकेमध्ये ऑटोमॅटिकली समाविष्ट केले जातात.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. ‘डिफॉल्ट दिनदर्शिका’ वर टॅप करा, नंतर तुम्हाला तुमची डिफॉल्ट दिनदर्शिका म्हणून वापरायची असलेली दिनदर्शिका सिलेक्ट करा.

नोट : तुम्ही एखादा इव्हेंट तयार केल्यानंतर तो नेहमी वेगळ्या दिनदर्शिकेमध्ये मूव्ह करू शकता. अनेक दिनदर्शिका वापरण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, अनेक दिनदर्शिका सेट अप करा पहा.

डिफॉल्ट इव्हेंट सेटिंग सेट करणे

नवीन इव्हेंटचा कालावधी, आगामी इव्हेंटची निघण्याची वेळ जवळ आल्यावर अलर्ट करावे की नाही आणि बरेच काही करण्यासाठी तुम्ही दिनदर्शिका इव्हेंटसाठी डिफॉल्ट सेटिंग बदलू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • इव्हेंटसाठी डिफॉल्ट अलर्ट वेळा सेट करा : ‘डिफॉल्ट अलर्ट वेळ’ वर टॅप करा, ‘वाढदिवस,’ ‘इव्हेंट’ किंवा ‘पूर्ण दिवसाचे इव्हेंट’ वर टॅप करा, नंतर पर्याय निवडा.

    • आगामी इव्हेंटसाठी निघण्याची वेळ जवळ आल्यावर अलर्ट करावे की नाही हे निवडा : ‘डिफॉल्ट अलर्ट वेळ’ वर टॅप करा, नंतर ‘निघण्याची वेळ’ चालू किंवा बंद करा.

    • नवीन इव्हेंटसाठी डिफॉल्ट कालावधी बदला : ‘नवीन इव्हेंटसाठी कालावधी’ वर टॅप करा, नंतर वेळ निवडा.

    • तुम्ही नवीन इव्हेंट तयार करता तेव्हा दिनदर्शिका स्थान सुचवते की नाही ते निवडा : स्थान सूचना चालू किंवा बंद करा.

तुमची दिनदर्शिका कशी डिस्प्ले केली जाते ते बदलणे

तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती हायलाइट करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही तुमची दिनदर्शिका डिस्प्ले करण्याची पद्धत कस्टमाइझ करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला आठवड्याची सुरुवात कोणत्या दिवसाने करायची आहे ते तुम्ही निवडू शकता, चीनी, हिब्रू किंवा हिजरी दिनदर्शिका (ग्रेगोरियन दिनदर्शिकेसह) आणि बरेच काही डिस्प्ले करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • चीनी, हिब्रू किंवा हिजरी दिनदर्शिका डिस्प्ले करा : ‘पर्यायी दिनदर्शिका’ वर टॅप करा, नंतर दिनदर्शिका निवडा.

    • वर्षभरातील प्रत्येक आठवड्याच्या पुढील आठवड्याचा नंबर डिस्प्ले करा : आठवड्याची संख्या चालू करा.

    • सध्याचा दिवस हा पहिला दिवस म्हणून ‘आठवड्याचा व्ह्यू’ मध्ये दाखवा : ’आठवड्याचा व्ह्यू आज सुरू होत आहे’ सुरू करा.

    • आठवडा सुरू करण्यासाठी वेगळा दिवस निवडा : ‘ह्या दिवसापासून आठवडा सुरू करा’ वर टॅप करा, नंतर ‘दिवस’ वर टॅप करा.

दिनदर्शिका वापरण्याच्या तुमच्या पद्धतीवर आधारित असलेल्या ॲपवर सूचना देण्यासाठी तुम्ही Siri ला अनुमती देऊ शकता. सेटिंग > ॲप > ‘दिनदर्शिका’ वर जा, ‘Siri’ वर टॅप करा, नंतर “ह्या ॲपमधून जाणून घ्या” चालू करा. ‘दिनदर्शिका’ मधील सूचना आणि कॉण्टेण्ट सर्च, विजेट मध्ये नोटिफिकेशन म्हणून दिसण्यासाठी देखील तुम्ही अनुमती देऊ शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.