ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad मधून स्टोरेज डिव्हाइस, सर्व्हर किंवा क्लाउडवर फाइल ट्रान्सफर करणे

iPad आणि संगणकासह, तुम्ही बाह्य स्टोरेज डिव्हाइस, फाइल सर्व्हर किंवा iCloud, ‘बॉक्स’ किंवा ‘ड्रॉपबॉक्स’ ह्यासारख्या क्लाउड स्टोरेज सेवेचा वापर करून फाइल ट्रान्सफर करू शकता.

बाह्य स्टोरेज डिव्हाइससह फाइल ट्रान्सफर करणे

  1. तुमचा iPad किंवा संगणक USB ड्राइव्ह किंवा SD कार्ड ह्यासारख्या बाह्य स्टोरेज डिव्हाइसशी कनेक्ट करा.

    iPad ला कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला कदाचित केबल अडॅप्टरची गरज भासेल. बाह्य स्टोरेज डिव्हाइस कनेक्ट करा पहा.

    नोट : तुमच्या iPad वर ‘ह्या संगणकावर विश्वास ठेवायचा की नाही’ असे विचारणारा अलर्ट दिसत असल्यास, ‘विश्वास ठेवा’ सिलेक्ट करा. ‘ह्या संगणकावर विश्वास ठेवा’ बाबतच्या अलर्टविषयी माहिती ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

  2. स्टोरेज डिव्हाइसमध्ये फाइल कॉपी करण्यासाठी सपोर्ट असलेले ॲप (जसे की ‘फाइल’ किंवा ‘Pages’) वापरा. फाइल्स आणि फोल्डर्स व्यवस्थापित करा पहा.

  3. स्टोरेज डिव्हाइस डिस्कनेक्ट करा, नंतर कॉपी केलेल्या फाइल ज्या डिव्हाइसवर दिसाव्यात असे तुम्हाला वाटते, त्या डिव्हाइसशी ते कनेक्ट करा.

  4. कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमध्ये फाइल कॉपी करा. Mac यूझर गाइडमध्ये Mac सह इतर स्टोरेज डिव्हाइस कनेक्ट करणे आणि वापरणे पहा.

बाह्य स्टोरेज डिव्हाइस ॲक्सेस करणे

तुम्ही कनेक्ट केलेला बाह्य स्टोरेज डिव्हाइस उघडू शकता, त्याचे नाव बदलू शकता, इरेझ करू शकता आणि त्याबद्दल माहिती प्राप्त करू शकता.

  1. तुमच्या iPad वर फाइल ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा.

  3. ‘स्थाने’ च्या खाली असलेल्या स्टोरेज डिव्हाइसच्या नावाला टच आणि होल्ड करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतीही कृती करा :

    • स्टोरेज डिव्हाइसचा कॉण्टेण्ट बघा : ‘नवीन विंडोमध्ये उघडा’ वर टॅप करा.

    • स्टोरेज डिव्हाइसचे नाव बदला : ‘[डिव्हाइसचे] नाव बदला’ वर टॅप करा.

    • स्टोरेज डिव्हाइस इरेझ करा : ‘इरेझ करा’ वर टॅप करा.

    • स्टोरेज डिव्हाइसबद्दल माहिती मिळवा : ‘माहिती मिळवा’ वर टॅप करा.

बाह्य स्टोरेज डिव्हाइसचे फॉरमॅटिंग बदलणे

तुम्ही बाह्य ड्राइव्हला USB-C पोर्ट असलेल्या iPad मॉडेल्सवर त्वरित APFS (Apple File System), ExFAT किंवा MS-DOS (FAT) फाइल फॉरमॅटमध्ये बदलण्यासाठी फाइल ॲपचा वापर करू शकता.

  1. तुमच्या iPad वर फाइल ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी ’साइडबार टॉगल करा’ बटण वर टॅप करा.

  3. ‘स्थान’ च्या खाली स्टोरेज डिव्हाइसच्या नावावर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’इरेझ करा’ वर टॅप करा.

  4. डिव्हाइससाठी फॉरमॅट सिलेक्ट करा, उदाहरणार्थ, APFS, ExFAT किंवा MS-DOS (FAT), नंतर ’इरेझ करा’ वर पुन्हा टॅप करा.

संगणक किंवा फाइल सर्व्हरशी कनेक्ट करणे

  1. तुमच्या iPad वर फाइल ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा.

  3. साइडबारच्या शीर्षस्थानी अधिक बटण वर टॅप करा.

  4. ‘सर्व्हरशी कनेक्ट करा’ वर टॅप करा.

  5. स्थानिक होस्टनेम किंवा नेटवर्कचा ॲड्रेस प्रविष्ट करा, त्यानंतर ‘कनेक्ट करा’ वर टॅप करा.

    टिप : तुम्ही संगणक किंवा फाइल सर्व्हरला कनेक्ट केल्यानंतर, ते ‘सर्व्हरशी कनेक्ट करणे’ स्क्रीनवर नुकत्याच उपलब्ध झालेल्या सर्व्हरच्या यादीमध्ये दिसेल. अलीकडील सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी, त्याच्या नावावर टॅप करा.

  6. तुम्हाला कसे कनेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट करा :

    • अतिथी : शेअर केलेल्या संगणकाने अतिथी ॲक्सेसला परवानगी दिल्यास तुम्ही ‘अतिथी यूझर’ म्हणून कनेक्ट करू शकता.

    • नोंदणीकृत यूझर : जर तुम्ही ‘नोंदणीकृत यूझर’ सिलेक्ट केला, तर तुमचे यूझरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

  7. ‘पुढील’ वर टॅप करा, त्यानंतर ‘ब्राउझ करा’ साइडबारमध्ये (‘शेअर केलेले’च्या खाली) सर्व्हर व्हॉल्यूम किंवा शेअर केलेला फोल्डर सिलेक्ट करा.

फाइल सर्व्हरवरून डिस्कनेक्ट करण्यासाठी, ‘ब्राउझ करा’ साइडबारमध्ये सर्व्हरच्या बाजूला असलेल्या इजेक्ट बटण वर टॅप करा.

फाइल शेअर करण्यासाठी तुमचा Mac कसा सेट अप करायचा ह्याबद्दलच्या माहितीसाठी, Mac यूझर गाइडमध्ये Mac वर फाइल शेअरिंग सेट अप करणे पहा.

‘बॉक्स’ किंवा ‘ड्रॉपबॉक्स’ ह्यासारख्या क्लाउड स्टोरेज सेवेसह फाइल ट्रान्सफर करणे

नोट : सदस्यता शुल्क लागू होऊ शकते.

  1. तुमच्या iPad किंवा संगणकावर, तुम्हाला शेअर करायच्या असलेल्या फाइल अपलोड करण्यासाठी तुमच्या क्लाउड स्टोरेज सेवा सूचनांचे पालन करा.

  2. तुमच्या शेअर केलेल्या फाइल iPad वर ॲक्सेस करण्यासाठी, फाइल ॲप वर जा, स्क्रीनच्या शीर्षस्थानी साइडबार बटण वर टॅप करा, नंतर ‘स्थान’ च्या खाली स्टोरेज सेवेच्या नावावर टॅप करा.

    शेअर केलेल्या फाइल संगणकावर ॲक्सेस करण्यासाठी, सेवा सूचनांचे पालन करा.

सिलेक्ट केलेल्या फाइल डाउनलोड करून ठेवणे

तुमच्या iPad वर तुम्हाला नेहमी ॲक्सेस करता येण्यासारख्या फाइल तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. जर तुम्ही ऑफलाइन असताना या फाइलमध्ये बदल केले, तर तुम्ही जेव्हा पुन्हा ऑनलाइन याल, तेव्हा तुमचे बदल iCloud सह सिंक होतील.

  1. तुमच्या iPad वर फाइल ॲपवर जा.

  2. तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे ती फाइल शोधा.

  3. तुम्हाला डाउनलोड करून ठेवायच्या असलेल्या फाइलला टच आणि होल्ड करा, त्यानंतर उघडलेल्या मेन्यूमध्ये ’डाउनलोड करून ठेवा’ वर टॅप करा.

    जर मेन्यूमध्ये ’डाउनलोड करून ठेवा’ दिसत नसेल, तर फाइल तुमच्या iPad वर आधीपासूनच आहे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.