ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वरील ‘नोट्स’ ॲपमध्ये Apple Intelligence वापरणे

तुम्ही ‘नोट्स’ ॲपमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करू शकता—जसे की क्लास लेक्चर किंवा महत्त्वाची मीटिंग—त्यानंतर Apple Intelligence वापरुन ट्रान्सक्रिप्टचा सारांश तयार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एका दृष्टीक्षेपात सर्वात महत्त्वाची माहिती मिळू शकेल. तुम्ही सारांश कॉपी आणि शेअर देखील करू शकता.

नोट : Apple Intelligence सर्व iPad मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. ** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iPadOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची आणि Apple Intelligence सुरू केलेले असल्याची खात्री करा.

नोट्समध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचा सारांश बघणे

तुम्ही नोट्स ॲपमध्ये ऑडिओ नोट रेकॉर्ड केल्यानंतर, तुम्ही रेकॉर्डिंगचा सारांश पाहू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. रेकॉर्डिंगसह नोट उघडा.

  3. ‘रेकॉर्डिंग’ वर टॅप करा, नंतर ‘सारांश’ वर टॅप करा.

टिप : तुम्ही लेखन साधने वापरून ‘व्हॉइस मेमोज’ मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सारांशित देखील करू शकता. रेकॉर्डिंगवर टॅप करा, अधिक बटण वर टॅप करा, ’ट्रान्सक्रिप्ट बघा’ वर टॅप करा, त्यानंतर टेक्स्ट सारांशित आणि व्यवस्थापित करण्यासाठी सूचनांचे पालन करा

सारांश कॉपी किंवा शेअर करणे

  1. तुमच्या iPad वर ‘नोट्स’ ॲपवर जा.

  2. रेकॉर्डिंगसह नोट उघडा.

  3. ‘रेकॉर्डिंग’ वर टॅप करा, नंतर ‘सारांश’ वर टॅप करा.

  4. सारांशाच्या शीर्षस्थानी अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘सारांश कॉपी करा’ किंवा ‘सारांश शेअर करा’ वर टॅप करा.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेलचा वापर करते आणि आउटपुट बदलू शकतात. अचूकतेसाठी महत्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपरिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.