ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर FaceTime ॲपमध्ये ‘लाइव्ह कॅप्शन्स’ आणि ‘लाइव्ह भाषांतर’ वापरणे

FaceTime ॲपमधील व्हिडिओ कॉलदरम्यान, बोललेले संभाषण रिअल टाइममध्ये ट्रान्सक्राइब केलेले आणि डिस्प्ले केलेले पाहण्यासाठी तुम्ही ’लाइव्ह कॅप्शन्स’ सुरु करू शकता. Apple Intelligence* असलेल्या iPad वर, तुम्ही ‘लाइव्ह भाषांतर’ सुरू करू शकता, जेणेकरून इतर व्यक्तीचे शब्द त्यांच्या भाषेतून तुमच्या पसंतीच्या भाषेत भाषांतरित होतील आणि ते बोलत असताना तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केले जातील.

लाइव्ह कॅप्शन्स चालू करणे

जर तुम्हाला संभाषण ऐकण्यात अडचण येत असेल, तर ‘लाइव्ह कॅप्शन्स’ मुळे (सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर उपलब्ध) संभाषण ऐकणे सोपे होऊ शकते.

नोट : ‘लाइव्ह कॅप्शन्स’ सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

  1. FaceTime व्हिडिओ कॉलदरम्यान, FaceTime कंट्रोल (ते दिसत नसल्यास) दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.

  2. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘लाइव्ह कॅप्शन्स’ वर टॅप करा.

    लाइव्ह कॅप्शन विंडो दिसते, जी स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेला कॉल आणि कोण बोलत आहे ह्याचा ऑटोमॅटिकली ट्रान्सक्राइब केलेला डायलॉग दाखवते.

महत्त्वाचे : लाइव्ह कॅप्शनची अचूकता बदलू शकते आणि जास्त जोखीम किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्यावर अवलंबून राहू नये. लाइव्ह कॅप्शनमध्ये अतिरिक्त बॅटरी वापरली जाते.

लाइव्ह भाषांतर चालू करणे

जेव्हा तुम्ही वेगळी भाषा बोलणाऱ्या कोणालातरी FaceTime कॉल करता, तेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीच्या भाषेत कॅप्शन्स पाहण्यासाठी Apple Intelligence* वापरू शकता. संदेश आणि कॉल्स भाषांतरित करा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.