ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad आणि तुमच्या इतर डिव्हाइसेस दरम्यान टास्क हॅण्ड ऑफ करणे

Handoff सह, तुम्ही एका डिव्हाइसवर काम सुरू करू शकता आणि ते दुसऱ्या डिव्हाइसवर पूर्ण करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या iPad वर ईमेल सुरू करू शकता परंतु नंतर तो तुमच्या Mac संगणकाच्या मोठ्या स्क्रीनवर समाप्त करू शकता.

तुम्ही Handoff अनेक Apple ॲपसह वापरू शकता—उदाहरणार्थ, Safari, Mail, FaceTime आणि नकाशा. काही थर्ड पार्टी ॲप Handoff सह देखील काम करतात.

तुम्ही तुमच्या iPhone, iPad आणि Mac मध्ये Handoff वापरू शकता. तुम्ही तुमच्या Apple Watch आणि iPhone मध्ये टास्कदेखील हॅण्ड ऑफ करू शकता.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

खालील गोष्टींची खात्री करा :

तुम्ही VPN वापरत असल्यास, खात्री करा की त्याचे कॉन्फिगरेशन स्थानिक नेटवर्किंगला प्रतिबंध करणार नाही कारण त्यामुळे काही ‘कंटिन्यूटी’ फीचर्समध्ये व्यत्यय येऊ शकतो.

Handoff चालू करणे

तुमचा iPad आणि तुमच्या इतर Apple डिव्हाइस दोन्हीवर Handoff चालू करा.

  • तुमच्या iPhone किंवा iPad वर : सेटिंग  > सामान्य > 'AirPlay व कंटिन्यूटी’ वर जा, नंतर Handoff सुरू करा.

  • तुमच्या Mac वर : Apple मेन्यू > ‘सिस्टीम सेटिंग’ निवडा, नंतर साइडबारमध्ये ‘सामान्य’ वर क्लिक करा. (कदाचित तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.) ’Airplay व कंटिन्यूटी’ वर क्लिक करा, त्यानंतर ’Handoff’ सुरू करा.

    नोट : तुमच्या Mac वर macOS 12.5 किंवा त्याआधीचे व्हर्जन असल्यास, Apple मेन्यू > ‘सिस्टीम प्राधान्ये’ निवडा, ‘सामान्य’ वर क्लिक करा, नंतर ‘हा Mac आणि तुमच्या iCloud डिव्हाइसमध्ये Handoff ला अनुमती द्या’ सिलेक्ट करा.

तुमच्या iPad आणि इतर डिव्हाइसेस दरम्यान कार्य हॅण्ड ऑफ करणे

जेव्हा तुमची डिव्हाइसेस एकमेकांच्या जवळ असतात, तेव्हा एखादा टास्क हॅण्ड ऑफ केला जाऊ शकतो त्यावेळी एक आयकॉन दिसेल. तुमच्या दुसऱ्या डिव्हाइसवर काम चालू ठेवण्यासाठी फक्त Handoff आयकॉन वर टॅप किंवा क्लिक करा.

Handoff आयकॉन पुढील स्थानांवर दिसेल :

  • iPhone वर : ॲप स्विचर स्क्रीनच्या तळाशी.

    iPhone वर स्क्रीनच्या तळाशी Handoff नोटिफिकेशन दाखवणारा ‘ॲप स्विचर’.
  • iPad वर : Dock च्या उजव्या टोकाला.

    iPad वर Dock मध्ये दिसणारे Handoff आयकॉन.
  • Mac वर : Dock स्क्रीनच्या तळाशी असल्यास, Dock च्या उजव्या टोकाकडे. तुमच्या स्क्रीनच्या डावीकडे किंवा उजवीकडे दिसण्यासाठी तुम्ही Dock सेट अप केलेले असल्यास, Handoff आयकॉन Dock च्या तळाशी दिसतो.

Handoff काम करत नसल्यास

  • दोन्ही डिव्हाइसेसमध्ये Wi-Fi आणि Bluetooth सुरू केलेले असल्याची, आणि तुम्ही एकाच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असल्याची खात्री करा.

  • तुमचे ॲप Handoff ला सपोर्ट करते हे तपासा. दिनदर्शिका, संपर्क, FaceTime, Keynote, Mail, नकाशा, Pages, Numbers, रिमाइंडर आणि Safari, तसेच अनेक थर्ड पार्टी ॲप, Handoff ला अनुमती देतात.

टिप : Handoff चालू असताना, सर्व डिव्हाइसेसवर टेक्स्ट, इमेज, छायाचित्रे आणि व्हिडिओ कॉपी आणि पेस्ट करण्यासाठी तुम्ही ’युनिव्हर्सल क्लिपबोर्ड’ चा वापर करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.