ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

HomePod आणि इतर वायरलेस स्पीकर्सवर iPad वरून ऑडिओ प्ले करणे

HomePod, Apple TV 4K, AirPlay 2 एनेबल केलेले स्मार्ट TV आणि Bluetooth® हेडफोन्स आणि स्पीकर्स ह्यासारख्या वायरलेस डिव्हाइसेसवर तुम्ही iPad वरून ऑडिओ प्ले करू शकता.

वायरलेस डिव्हाइसवर iPad वरून ऑडिओ प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर, पॉडकास्ट किंवा संगीत ह्यासारखे ऑडिओ ॲप उघडा, त्यानंतर प्ले करण्यासाठी आयटम निवडा.

  2. ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर टॅप करा, नंतर प्लेबॅक गंतव्यस्थान निवडा.

    नोट : तुमचे AirPlay 2-एनेबल केलेले डिव्हाइस प्लेबॅक डेस्टिनेशनच्या यादीमध्ये दिसत नसल्यास, ते एकाच Wi-Fi नेटवर्कवर असल्याची खात्री करा. तुम्ही डिव्हाइसला Bluetooth रेंजच्या बाहेर मूव्ह केल्यास, प्लेबॅक डेस्टिनेशन Bluetooth डिव्हाइससह iPad वर परत येते.

प्लेबॅक डेस्टिनेशन सिलेक्ट करण्यासाठी, तुम्ही लॉक स्क्रीनवर किंवा कंट्रोल सेंटरमध्ये ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर देखील टॅप करू शकता.

नोट : Bluetooth ऑडिओ डिव्हाइस सेट अप करण्याबाबतच्या माहितीसाठी, Bluetooth ॲक्सेसरीबरोबर तुमचा iPad पेअर करणे पहा.

अनेक AirPlay 2-एनेबल केलेल्या डिव्हाइसवर ऑडिओ प्ले करणे

AirPlay 2 आणि iPad सह, तुम्ही एकाच Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट केलेल्या अनेक AirPlay 2-एनेबल केलेल्या डिव्हाइसवर ऑडिओ प्ले करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही बैठकीच्या खोलीत आणि स्वयंपाकघरात HomePod स्पीकर्सवर, बेडरूममध्ये Apple TV 4K वर, आणि डेनमध्ये AirPlay 2 एनेबल केलेल्या स्मार्ट TV वर पार्टी प्लेलिस्ट प्ले करू शकता.

Siri : असे काहीतरी Siri ला सांगा :

  • “Stop playing music everywhere”

  • “Set the dining room volume to 10 percent”

  • “What’s playing in the kitchen?”

  • “Play a song I like in the kitchen”

  • “Add the living room speaker”

  • “Remove the music from the kitchen”

  • “डेनकडे संगीत मूव्ह करा”

तुम्ही iPad स्क्रीनवरून प्लेबॅक डेस्टिनेशन देखील निवडू शकता.

  1. लॉक स्क्रीनवर किंवा तुम्ही ऐकत असलेल्या ॲपच्या ‘सध्या प्ले होत आहे’ स्क्रीनवर कंट्रोल सेंटरमध्ये ‘प्लेबॅक डेस्टिनेशन’ बटण वर टॅप करा.

  2. तुम्हाला वापरायचे असलेले प्रत्येक डिव्हाइस सिलेक्ट करा.

नोट : स्टिरिओ पेअरमध्ये व्यवस्था केलेली डिव्हाइस सिंगल ऑडिओ डिव्हाइस मानली जातात.

HomePod स्पीकर्स आणि Apple TV 4K वापरण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, HomePod यूझर गाइड आणि Apple TV 4K यूझर गाइड पहा.

AirPlay 2-एनेबल केलेल्या स्मार्ट TV च्या यादीसाठी, होम ॲक्सेसरी संकेतस्थळ पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.