ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’शोधाशोध’ मध्ये AirTag किंवा इतर आयटम शेअर करणे

जर तुम्हाला आयटम शेअर करायचा असेल, जो AirTag बरोबर पेअर केलेला असेल (किंवा थर्ड पार्टी आयटम जो ’शोधाशोध’ सह काम करतो), तर तुम्ही त्याला ’शोधाशोध’ मध्ये शेअर करू शकता, जेणेकरून उधार घेणारा त्याला नकाशावर पाहू आणि शोधू शकेल. ते जवळपास असल्यास ’शोधाशोध’ आवाज प्ले करू शकते. जेव्हा आयटम त्यांच्याबरोबर मूव्ह होत असतात तेव्हा तुम्ही आयटम शेअर करत आहात त्यांना ट्रॅकिंग नोटिफिकेशन मिळत नाहीत.

जोपर्यंत पुढील आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत, तोपर्यंत तुम्ही प्रत्येक आयटमसाठी एकूण सहा यूझरसाठी, तुमच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच उधार घेणाऱ्यांबरोबर तुम्ही AirTag किंवा इतर आयटम शेअर करू शकाल :

  • तुमच्या Apple अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे आवश्यक आहे.

  • तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर शेअर करत आहात त्याच्याकडे Apple अकाउंट असायला हवे आणि साइन इन केलेले असले पाहिजे. ते iCloud देखील वापरत असावेत. तुम्ही लहान मुलांच्या अकाउंटसह शेअर करू शकत नाही.

  • ओनर आणि उधार घेणाऱ्यांनी iCloud कीचेन चालू केलेले असणे आवश्यक आहे.

  • ओनर आणि बॉरोअर iOS 17, iPadOS 17, macOS 14 किंवा नंतरचे व्हर्जन वापरत असावेत.

नोट : तुम्ही AirTag शेअर करता तसेच थर्ड पार्टीचे आयटम शेअर करता.

AirTag शेअर करा

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. ‘आयटम’ वर टॅप करा, तुम्हाला शेअर करायचे असलेल्या AirTag च्या नावावर टॅप करा, त्यानंतर ‘हा AirTag शेअर करा’ (किंवा ‘हा आयटम शेअर करा’) च्या खाली ‘व्यक्ती समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. तुम्ही समाविष्ट करायच्या असलेल्या व्यक्तीची Apple अकाउंट माहिती प्रविष्ट करा.

    अधिक लोकांना समाविष्ट करण्यासाठी, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा.

  4. ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला शेअर करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावावर टॅप करा, त्यानंतर त्यांच्या Apple अकाउंटवर टॅप करा.

    तुम्हाला समाविष्ट करायच्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिसऱ्या आणि चौथ्या पायरीची पुनरावृत्ती करा.

  5. जेव्हा तुम्ही सर्व उधार घेणाऱ्या व्यक्ती समाविष्ट कराल, वरच्या उजव्या कोपऱ्यात ’शेअर करा’ वर टॅप करा.

    तुम्ही आमंत्रित केलेल्या सर्वांची यादी, त्यांच्या आमंत्रणांच्या स्टेटससह, आयटमच्या मुख्य स्क्रीनवर दिसते.

    जेव्हा एखादी व्यक्ती आमंत्रण स्वीकारते, तेव्हा शेअर केलेला AirTag आयटमच्या खाली ‘शोधाशोध’ मध्ये दिसतो आणि प्राप्तकर्त्याला सूचित केले जाते की आयटम त्यांच्याबरोबर शेअर केला जात आहे. जर एखाद्या व्यक्तीने आमंत्रण नाकारले, तर त्यांचे नाव यादीमधून काढून टाकले जाते आणि तुम्हाला ते दिसत नाही.

AirTag च्या ओनरला ते ’शोधाशोध’ मध्ये शेअर करायला सांगणे

जर AirTag च्या ओनरने ते तुमच्याबरोबर शेअर केले परंतु ’शोधाशोध’ मध्ये तसे केले नाही, तर तुम्हाला अज्ञात AirTag नोटिफिकेशन आणि ट्रॅकिंग नोटिफिकेशन प्राप्त होतील. AirTag चे ट्रॅकिंग नोटीफिकेशन प्राप्त होणे थांबवण्यासाठी, ओनरला ’शोधाशोघ’ मध्ये ते तुमच्याबरोबर शेअर करण्यास सांगा.

नोट : जर तुम्ही एकाच ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटात असाल तरच तुम्ही ओनरला शेअर करण्यास सांगू शकता. ’कौटुंबिक शेअरिंग’ गटामध्ये सदस्य समाविष्ट करा पहा.

  1. तुम्हाला प्राप्त होणाऱ्या ट्रॅकिंग नोटिफिकेशनमध्ये, ‘AirTag शेअर करण्यासाठी ओनरला विचारा’ वर टॅप करा.

  2. ‘ओनरला विचारा’ वर टॅप करा.

    जर ओनरला तुम्हाला उसने घेणारे म्हणून समाविष्ट करायचे असेल, तर तुम्हाला AirTag शेअर करण्यासाठी आमंत्रण प्राप्त होईल.

शेअर करण्यासाठीचे आमंत्रण स्वीकारणे किंवा नाकारणे

जर तुम्हाला AirTag शेअर करण्यासाठी आमंत्रित केले असेल, तर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल.

’शोधाशोध’ मध्ये आमंत्रण पाहण्यासाठी, ’आयटम’ वर टॅप करा, नंतर पुढीलपैकी एक करा :

  • आमंत्रण स्वीकारा : ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    [शेअर करणारे]’ च्या आयटमच्या खाली, तुमच्या आयटम लिस्टमध्ये AirTag दिसेल. तुम्ही जोपर्यंत AirTag उधार घेत आहात तोपर्यंत तुम्ही ट्रॅकिंग नोटिफिकेशन प्राप्त करणे थांबवता.

  • आमंत्रण नाकारा : ’समाविष्ट करू नका’ वर टॅप करा.

AirTag शेअर करणे थांबवा

जर तुम्ही AirTag चे ओनर असाल आणि ह्यापुढे तो शेअर करायचा नसेल, तर तुम्ही ’शोधाशोध’ मध्ये शेअर करणे थांबवू शकता.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. ’आयटम’ वर टॅप करा, तुम्ही शेअर करत असलेल्या आयटमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर तुम्ही तो ज्या व्यक्तीबरोबर शेअर करत आहात त्या व्यक्तीच्या नावावर टॅप करा.

  3. ‘शेअर करणे थांबवा’ वर टॅप करा, नंतर ‘शेअर करणे थांबवा’ वर पुन्हा टॅप करा.

    तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर AirTag शेअर करत होता तिला आता त्यांचे स्थान दिसत नाही, परंतु AirTag त्यांच्याबरोबर मूव्ह होत असताना ट्रॅकिंग नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकतील.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.