ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर FaceTime कॉलदरम्यान Live Photo घेणे

जेव्हा तुम्ही FaceTime ॲपवर व्हिडिओ कॉलवर असता, तेव्हा तुमच्या संभाषणाचा क्षण टिपण्यासाठी तुम्ही FaceTime Live Photo घेऊ शकता (सर्व देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही). तुम्ही छायाचित्र काढण्याच्या अगदी आधी आणि नंतर जे घडते ते कॅमेरा ऑडिओसह कॅप्चर करतो, जेणेकरून ज्याप्रकारे घडले ते तुम्ही नंतर पाहू आणि ऐकू शकता.

FaceTime Live Photo काढण्यासाठी, प्रथम सेटिंग  > ॲप्स > ‘FaceTime’ मध्ये ‘FaceTime Live Photos’ सुरू केलेले असल्याची खात्री करा, त्यानंतर पुढीलपैकी एक कृती करा :

  • वन-टू-वन FaceTime कॉल दरम्यान : ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

  • गटाच्या FaceTime कॉल दरम्यान : तुम्हाला ज्या व्यक्तीचे छायाचित्र घ्यायचे आहे त्याच्या टाइलवर टॅप करा, नंतर ‘टेक पिक्चर’ बटण वर टॅप करा.

छायाचित्र घेतले गेल्याची आणि Live Photo तुमच्या छायाचित्र ॲपमध्ये जतन केले गेल्याचे नोटिफिकेशन तुम्हा दोघांनाही प्राप्त होते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.