ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर गट FaceTime कॉल करणे

FaceTime ॲपमध्ये, तुम्ही गटाच्या FaceTime कॉलमध्ये जास्तीत जास्त 32 सहभागींशी बोलू शकता.

नोट : गट FaceTime कॉल्स सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

स्क्रीनच्या शीर्षस्थानी स्वतंत्र टाइल्समध्ये चार सहभागी दर्शवणारा गटाचा FaceTime कॉल. तळाशी डावीकडे असलेल्या टाइलमध्ये दोन अतिरिक्त सहभागी एकत्र दिसतात. तळाशी उजवीकडे FaceTime कंट्रोल्स आहेत : ‘व्हिडिओ’, ‘मायक्रोफोन’, ‘अधिक’ आणि ’कॉल समाप्त करा’ बटणे.

गटाचा FaceTime कॉल सुरू करणे

  1. तुमच्या iPad वरील FaceTime ॲपवर  जा.

  2. ’नवीन’ वर टॅप करा.

  3. स्क्रीनच्या शीर्षस्थानाजवळील फील्डमध्ये, तुम्हाला कॉल करायचा असलेल्या लोकांची नावे, नंबर्स किंवा ईमेल्स प्रविष्ट करा.

    तुम्ही संपर्क उघडण्यासाठी आणि तेथून लोकांना समाविष्ट करण्यासाठी ‘संपर्क समाविष्ट करा’ बटण वर टॅप देखील करू शकता, किंवा सुचवलेल्या संपर्कांवर टॅप करू शकता.

  4. व्हिडिओ कॉल करण्यासाठी FaceTime वर टॅप करा किंवा FaceTime ऑडिओ कॉल करण्यासाठी कॉल बटण वर टॅप करा.

प्रत्येक सहभागी स्क्रीनवरील टाइलमध्ये दिसतात. जेव्हा एखादा सहभागी बोलतो (तोंडी किंवा सांकेतिक भाषा वापरून) किंवा तुम्ही ‘टाइल’ वर टॅप करता, तेव्हा ती टाइल हायलाइट होते किंवा अधिक ठळक होते. स्क्रीनवर फिट होऊ शकत नाहीत अशा टाइल सर्वात खाली एका ओळीत दिसतात. तुम्हाला दिसत नसलेला सहभागी शोधण्यासाठी, ओळीमध्ये स्वाइप करा. जर इमेज उपलब्ध नसेल तर सहभागीची आद्याक्षरे टाइलमध्ये दिसू शकतात.

गटाच्या FaceTime कॉलदरम्यान बोलत असलेल्या व्यक्तीची टाइल अधिक ठळक होणे टाळण्यासाठी, ‘सेटिंग’ ॲपवर जा, ‘ॲप्स’ वर टॅप करा, FaceTime वर टॅप करा, नंतर ‘ऑटोमॅटिक प्रॉमिनन्स’ च्या खाली ‘बोलणे’ बंद करा.

नोट : सांकेतिक भाषा ओळखण्यासाठी प्रस्तूतकर्त्यासाठी सपोर्ट केलेले मॉडेल आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, सादरकर्ते आणि सहभागी व्यक्ती या दोहोंकडे iOS 14, iPadOS 14, macOS 11 किंवा त्यानंतरचे व्हर्जन असणे आवश्यक आहें.

गट संदेश संभाषणातून गटाचा FaceTime कॉल सुरू करणे

गटाच्या iMessage संभाषणात, तुम्ही ‘संदेश’ मध्ये चॅट करत असलेल्या सर्व लोकांबरोबर गटाचा FaceTime कॉल सुरू करू शकता.

  1. iMessage संभाषणाच्या वरच्या उजव्या बाजूला FaceTime बटण वर टॅप करा.

  2. ‘FaceTime ऑडिओ’ किंवा ‘FaceTime व्हिडिओ’ वर टॅप करा.

कॉलमध्ये दुसऱ्या व्यक्तीला समाविष्ट करणे

FaceTime कॉल दरम्यान कोणीही सहभागी कोणत्याही क्षणी दुसऱ्या व्यक्तीला समाविष्ट करू शकतो.

  1. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वन टू वन FaceTime कॉलदरम्यान : FaceTime कंट्रोल्स दाखवण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा (ते दिसत नसल्यास), अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘लोकांना समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • गटाच्या FaceTime कॉल दरम्यान : स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या लोकांच्या संख्येवर टॅप करा, नंतर ‘लोकांना समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  2. तुम्हाला समाविष्ट करायच्या असलेल्या व्यक्तीचे नाव, ईमेल किंवा फोन नंबर प्रविष्ट करा किंवा ‘संपर्क’ ॲपमधून कोणालातरी समाविष्ट करण्यासाठी ‘संपर्क समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा. तुम्ही अनेक लोकांना समाविष्ट करू शकता.

  3. ‘लोक समाविष्ट करा’ वर टॅप करा.

गटाचा FaceTime कॉल जॉइन करणे

तुम्हाला कुणीतरी गटाचा FaceTime कॉल जॉइन करण्यासाठी आमंत्रित केल्यास, तुम्हाला इनकमिंग कॉलसंबंधी नोटिफिकेशन मिळते—तुम्ही तो जॉइन करू शकता किंवा नाकारू शकता. FaceTime कॉलला उत्तर देणे पहा.

गटाच्या FaceTime कॉलमधून बाहेर पडणे

गटाचा कॉल कोणत्याही वेळी सोडण्यासाठी, ’सोडा’ वर टॅप करा.

एक किंवा अधिक सहभागी राहिल्यास कॉल सक्रिय राहतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.