ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ’आरोग्य’ मध्ये तुमच्या मनाची स्थिती लॉग करणे

तुम्हाला कसे वाटत आहे ह्याबद्दल तुम्ही चिंतन करू शकता आणि तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा मागोवा घेण्यासाठी तुमच्या क्षणिक भावना आणि दैनंदिन मूड लॉग करू शकता. व्यायाम, झोप, सूर्यप्रकाशात घालवलेला वेळ आणि एकाग्रतेचा वेळ ह्यासारख्या जीवनशैली घटकांशी तुमच्या मनाची स्थिती कशा प्रकारे संबंधित असू शकते हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता.

तुमच्या मनाची स्थिती लॉग करणे

’आरोग्य’ ॲपमध्ये सध्याचा मूड ’किंचित सुखद’ म्हणून ओळखणारी स्क्रीन. स्क्रीनच्या तळाशी भावनांची पातळी ॲडजस्ट करण्यासाठी स्लायडर आहे.
  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ’मानसिक स्वास्थ्य’ वर टॅप करा, नंतर ’मनाची स्थिती’ वर टॅप करा.

  3. जर ही तुमची लॉग करण्याची पहिली वेळ असेल, तर ‘प्रारंभ करा’ वर टॅप करा. अन्यथा, ‘लॉग करा’ वर टॅप करा.

    टिप : मागील दिवसाची तुमच्या मनाची स्थिती लॉग करण्यासाठी, वरच्या उजव्या कोपऱ्यात दिनदर्शिका बटण वर टॅप करा, दिवसावर वर टॅप करा, नंतर ‘लॉग’ वर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक निवडा :

    • भावना लॉग करा : “तुम्हाला आत्ता कसे वाटते” वर टॅप करा, त्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

    • मूड लॉग करा : “तुम्हाला एकूण आज कसे वाटले” वर टॅप करा, त्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

  5. तुम्हाला कसे वाटत आहे हे दर्शवण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा, त्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

  6. तुम्हाला कसे वाटत आहे ह्याचे वर्णन करणाऱ्या कोणत्याही शब्दावर टॅप करा (ऐच्छिक), नंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

  7. कोणत्या गोष्टीचा तुमच्यावर सर्वात जास्त परिणाम होत आहे ह्याचे वर्णन करणाऱ्या कोणत्याही शब्दावर टॅप करा (ऐच्छिक), त्यानंतर ’पूर्ण’ वर टॅप करा.

जर तुम्ही वर्णन केले असेल की तुमच्यावर सर्वात जास्त परिणाम कशामुळे होत आहे, तर तुम्ही अधिक माहिती प्रविष्ट करण्यासाठी ‘अतिरिक्त संदर्भ’ वर टॅप करू शकता.

तुमच्या मनाच्या स्थितीची हिस्ट्री बघणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, ’मानसिक स्वास्थ्य’ वर टॅप करा, नंतर ’मनाची स्थिती’ वर टॅप करा.

  3. ‘चार्टमध्ये दाखवा’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वेळोवेळी तुमच्या मनाची स्थिती बघणे : चार्टच्या शीर्षस्थानी असलेल्या टाइम रेंज सिलेक्शनमधील पर्याय टॅप करा.

    • तुम्ही लॉग केलेले नोंदींचे प्रकार बघा : ‘स्थिती’ वर टॅप करा, त्यानंतर आलेखावरील त्या नोंदी पाहण्यासाठी ’दैनंदिन मूड’ किंवा ’क्षणिक भावना’ वर टॅप करा.

    • तुमच्या नोंदींशी संबंधित घटक बघा : ’संघटना’ वर टॅप करा, नंतर तुम्ही तुमच्या मनाची स्थिती नोंदींमध्ये लॉग केलेल्या विविध घटकांमध्ये स्क्रोल करा.

    • तुमच्या नोंदींशी संबंधित जीवनशैलीचे घटक बघा : ’जीवन घटक’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या मनाच्या स्थितीच्या नोंदींसह ते पाहण्यासाठी जीवनशैली घटकावर टॅप करा.

      तुमच्या मानसिक आरोग्यावर जीवनशैली घटकाचा कसा परिणाम होऊ शकतो ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रत्येक जीवनशैली घटकाच्या पुढे ‘माहिती दाखवा’ बटण वर टॅप देखील करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.