ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर कौटुंबिक शेअरिंग गटामध्ये सदस्य समाविष्ट करणे

कौटुंबिक शेअरिंग सह, कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या स्वतःच्या Apple अकाउंट सह कुटुंब गटामध्ये जॉइन होतो. अशा प्रकारे तुम्ही छायाचित्रे किंवा डॉक्युमेंटसारखी वैयक्तिक माहिती शेअर न करता सदस्यता आणि इतर फीचरचा ॲक्सेस शेअर करू शकता.

कुटुंब आयोजक Apple अकाउंट असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना सहजपणे आमंत्रित करू शकतो किंवा ज्यांच्याकडे अद्याप अकाउंट नसेल अशा मुलांसाठी Apple अकाउंट तयार करू शकतो.

कौटुंबिक शेअरिंग सदस्यांच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या.

Apple अकाउंटसह कुटुंबातील सदस्याला समाविष्ट करणे

कौटुंबिक शेअरिंग गटाचा आयोजक कुटुंबातील अशा सदस्याला समाविष्ट करू शकतो ज्याचे स्वतःचे Apple अकाउंट आहे.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’कुटुंब’ वर टॅप करा, त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात ’सदस्य समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. ‘इतरांना आमंत्रित करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    तुम्ही ‘AirDrop’, ‘संदेश’ किंवा ‘Mail’ वापरून आमंत्रण पाठवू शकता. जर तुम्ही कुटुंबातील सदस्याच्या जवळ असाल, तर तुम्ही ‘स्वतः आमंत्रित करा’ वर देखील टॅप करू शकता आणि कुटुंबातील सदस्याला त्यांचा Apple अकाउंट ईमेल ॲड्रेस (किंवा फोन नंबर) आणि पासवर्ड तुमच्या डिव्हाइसवर प्रविष्ट करण्यास सांगू शकता.

तुम्ही आमंत्रित केलेल्या लोकांना कुटुंबाच्या रांगेमध्ये सेटिंगच्या शीर्षस्थानी तुमचे आमंत्रण दिसते. जर त्यांनी तुमचे आमंत्रण स्वीकारले नसेल, तर तुम्ही रिमाइंडरसह फॉलो अप देखील करू शकता.

लहान मुलासाठी Apple अकाउंट तयार करणे

13 वर्षाखालील मुले स्वतः त्यांचे Apple अकाउंट तयार करू शकत नाहीत. (हे वय देश किंवा प्रदेशानुसार बदलते.) पण जर तुम्ही कुटुंब आयोजक किंवा आईवडील किंवा पालक असाल, तर तुम्ही अपत्यासाठी Apple अकाउंट तयार करू शकता आणि त्यांना कौटुंबिक शेअरिंग गटामध्ये समाविष्ट करू शकता.

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘कुटुंब’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • जर तुम्ही आईवडील किंवा पालक असाल : ‘सदस्य समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • जर तुम्ही आयोजक असाल : ‘सदस्य समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘अपत्यासाठी अकाउंट तयार करा’ वर टॅप करा.

      नोट : जर तुमच्या मुलाचे आधीपासूनच Apple अकाउंट असेल, तर ‘इतरांना आमंत्रित करा’ वर टॅप करा. आमंत्रण स्वीकारण्यासाठी ते तुमच्या डिव्हाइसवर त्यांचे Apple अकाउंट आणि पासवर्ड प्रविष्ट करू शकतात.

  3. अपत्याचे नाव आणि वाढदिवस प्रविष्ट करा. अपत्याच्या वाढदिवसाचा वापर सुचवलेलले कॉण्टेण्ट निर्बंध सेट करण्यासाठी केला जातो, ह्यामुळे ते कोणते कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकतात हे निर्धारित केले जाते.

    तुम्ही कॉण्टेण्ट ब्लॉक करू शकता आणि iTunes व App Store खरेदी रोखू शकता, विशिष्ट संपर्कांकडून येण्याऱ्या कॉल्स आणि संदेशांना अनुमती देऊ शकता किंवा ब्लॉक करू शकता, आणि सेटिंग  > ‘स्क्रीन टाइम’ मध्ये स्क्रीनपासून दूर रहाण्याचा वेळ शेड्यूल करणेस्क्रीनपासून दूर राहण्याची वेळ शेड्यूल करू शकता, ‘कौटुंबिक शेअरिंग गट’ मधील सर्व सदस्यांबरोबरच नंतर नव्याने समाविष्ट झालेल्या सदस्यांबरोबर तुमच्या अपत्याचे स्थान शेअर करू शकता; आणि ‘खरेदीसाठी विचारा’ वापरू शकता. तुम्ही हे सेटिंग कधीही बदलू शकता. अधिक माहितीसाठी, पुढीलपैकी कोणतेही एक पहा :

  4. ‘अपत्याचे अकाउंट तयार करणे’ पूर्ण करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

मुलाचे अकाउंट आणि ज्या वयात लहान मुल त्यांचे स्वतःचे Apple अकाउंट तयार करू शकते त्याबद्दल अधिक माहितीसाठी, Apple सपोर्ट लेख तुमच्या मुलासाठी Apple अकाउंट तयार करा पहा.

इमेज निर्मिती, रायटिंग टूल्स आणि इंटेलिजन्स एक्स्टेंशन्ससह Apple Intelligence* फीचर्स ॲक्सेस करण्याची अनुमती द्या. ’स्क्रीन टाइम’ मध्ये Apple Intelligence फीचर्सचा ॲक्सेस ब्लॉक करा पहा.

जर तुम्हाला सध्याच्या कौटुंबिक शेअरिंग गटात सामील व्हायचे असेल, तर आयोजकाला तुम्हाला गटात समाविष्ट करण्यास सांगा. तुम्ही एका वेळी फक्त एकाच कौटुंबिक शेअरिंग गटाचे सदस्य होऊ शकता. जर तुम्हाला दुसऱ्या गटात सामील व्हायचे असेल, तर आधी तुमचा सध्याचा गट सोडा. कौटुंबिक शेअरिंग गटातून बाहेर पडणे पहा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, टर्किश, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपरिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.