ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘संपर्क’ ॲपसह सुरुवात करणे

फोन नंबर, ईमेल ॲड्रेसेस, वाढदिवस आणि बरेच काही एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी ‘संपर्क’ ॲप वापरा.

‘संपर्क’ ॲपमधील ‘नवीन संपर्क’ विंडो.

संपर्क तयार करणे

संपर्क तयार करण्यासाठी, ‘संपर्क’ ॲपवर जा, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, संपर्काचे तपशील समाविष्ट करा, नंतर पूर्ण बटण वर टॅप करा.

वेगवेगळ्या संपर्क सेवा दाखवणारी ‘अकाउंट समाविष्ट करणे’ स्क्रीन.

इतर अकाउंट समाविष्ट करणे

जर तुमचे संपर्क iCloud, Google किंवा Yahoo सारख्या इतर अकाउंट्समध्ये जतन केलेले असतील, तर तुम्ही तुमचे सर्व संपर्क एकाच ठिकाणी पाहण्यासाठी ते ‘संपर्क’ ॲपमध्ये समाविष्ट करू शकता. सेटिंग  > ॲप्स > संपर्क > ‘संपर्क अकाउंट’ वर टॅप करा, नंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

‘संपर्क’ ॲपमधील ’संपर्क शेअर करा’ विंडो.

संपर्क शेअर करणे

संपर्क शेअर करणे सोपे आहे. संपर्क सिलेक्ट करा, नंतर ‘संपर्क शेअर करा’ वर टॅप करा. तुम्हाला शेअर करायचे असलेले फील्ड निवडा, पूर्ण बटण वर टॅप करा, नंतर ‘संदेश’ किंवा ‘Mail’ सारखा शेअरिंग पर्याय निवडा.

iPad वर संपर्क यादी आणि iPhone वर संपर्क कार्ड

तुमचे संपर्क सिंक करणे

तुम्ही त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असताना तुमच्या इतर Apple डिव्हाइसेसवर तुमचे संपर्क पहा. सेटिंग > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा. ‘iCloud वर जतन झाले’ च्या बाजूला असलेल्या ‘सर्व पहा’ वर टॅप करा, नंतर ‘संपर्क’ चालू करा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का?

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.