ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर (फक्त यू. एस.) ’आरोग्य’ मध्ये तुमच्या औषधांबद्दल अधिक जाणून घेणे

तुम्ही तुमच्या औषधांच्या यादीत समाविष्ट केलेल्या औषधांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

औषधाबद्दल जाणून घेणे

औषधाचा वापर कशासाठी केला जातो, ते कसे कार्य करते, संभाव्य साइड इफेक्ट आणि त्याचा उच्चार कसा करावा ह्याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. औषधावर टॅप करा (तुमच्या औषधांच्या यादीमध्ये), नंतर ‘माहिती’ पर्यंत खाली स्क्रोल करा.

तुमच्या औषधांमधील आंतरक्रियांबद्दल जाणून घेणे

  1. तुमच्या iPad वर आरोग्य ॲपवर जा.

  2. ‘सर्च करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘औषधे’ वर टॅप करा.

  3. खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’ड्रग इंटरॅक्शन’ वर टॅप करा.

  4. अल्कोहोल सारख्या आंतरक्रिया घटक तुमच्या औषधांबरोबर आंतरक्रिया करतात का हे जाणून घेण्यासाठी, ‘संपादित करा’ वर टॅप करा (‘आंतरक्रिया घटक’ भागात), लागू होणारे घटक सिलेक्ट करा, नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

  5. एखाद्या आंतरक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यावर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.