iPad वर कॉल रेकॉर्ड आणि ट्रान्सक्राइब करणे

काही देश आणि प्रदेशात, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना फोन कॉल रेकॉर्ड करू शकता. निवडक क्षेत्रात आणि भाषांमध्ये, तुम्ही ‘नोट्स’ ॲपमध्ये कॉलची ट्रान्सक्रिप्ट बघू शकता. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

नोट : कॉल रेकॉर्डिंग सध्या अझरबैजान, बहारीन, इजिप्त, युरोपियन युनियन, इराण, इराक, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, नायजेरिया, ओमान, पाकिस्तान, कतार, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, संयुक्त अरब अमीरात आणि येमेनमध्ये उपलब्ध नाही.

कॉल रेकॉर्ड करणे

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तुमच्या भाषेत आणि प्रदेशात कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का हे पाहण्यासाठी iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ तपासा आणि इतर कॉल सहभागी रेकॉर्ड करायला तयार असल्याची खात्री करा.

  1. तुमच्या iPad वर ‘फोन’ ॲपवर जा.

  2. कॉल करा.

  3. कॉल दरम्यान, अधिक बटण वर टॅप करा, नंतर ‘कॉल रेकॉर्डिंग’ वर टॅप करा.

    दोन्ही कॉल सहभागींना कॉल रेकॉर्ड केला जात असल्याची ऑडिओ सूचना ऐकू येते.

  4. रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी, थांबवा बटण वर टॅप करा किंवा फक्त बंद करा.

    iPad ‘नोट्स’ ॲपमधील ‘कॉल रेकॉर्डिंग’ फोल्डरमध्ये ऑटोमॅटिकली कॉल रेकॉर्डिंग जतन करते.

  5. नोट्स ॲपमध्ये कॉल पाहण्यासाठी, ’जतन केलेला कॉल बघा’ वर टॅप करा.

रेकॉर्ड केलेला कॉल प्ले करणे

  1. तुमच्या iPad वर नोट्स ॲपवर जा.

  2. ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ फोल्डरमध्ये ‘नोट’ वर टॅप करा, त्यानंतर ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

कॉल ट्रान्सक्रिप्ट बघणे

निवडक प्रदेश आणि भाषांमध्ये, तुम्ही ‘नोट्स’ ॲपमध्ये रेकॉर्ड केलेल्या कॉलची ट्रान्सक्रिप्ट बघू शकता. ट्रान्सक्रिप्ट लगेच उपलब्ध नसेल—तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन सुरू असल्याचा संदेश दिसेल.

नोट : ट्रान्सक्रिप्शनवर अवलंबून राहण्यापूर्वी त्याच्या अचूकतेची पडताळणी करा. हे कदाचित संभाषणाचे परिपूर्ण प्रतिनिधित्व नसेल.

  1. तुमच्या iPad वर नोट्स ॲपवर जा.

  2. ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ फोल्डरमध्ये ‘नोट’ वर टॅप करा, त्यानंतर ’ट्रान्सक्रिप्ट आणि सारांश दाखवा’ बटण वर टॅप करा.

    नोट : सपोर्ट केलेल्या भाषांमध्ये बोललेले शब्द ऑटोमॅटिकली ट्रान्सक्राइब केले जातात. तुम्हाला ‘ट्रान्सक्रिप्ट’ दिसत नसल्यास, तुमचा iPad किमान आवश्यकता पूर्ण करत नाही किंवा सपोर्ट केलेली भाषा ओळखत नाही.

    ट्रान्सक्रिप्टमध्ये, प्रत्येक वाक्याचा स्पीकर ओळखला जातो.

  3. ट्रान्सक्रिप्ट बघत असताना, तुम्ही खालीलपैकी कोणतेही काम करू शकता :

    • विशिष्ट पॉइंटपासून ऑडिओ प्ले करा : तुम्हाला ऐकायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा.

    • ट्रान्सक्रिप्ट सर्च करा : अधिक बटण वर टॅप करा, नंतर 'ट्रान्सक्रिप्टमध्ये शोधा’ वर टॅप करा.

    • ट्रान्सक्रिप्ट कॉपी करा : अधिक बटण वर टॅप करा, नंतर 'ट्रान्सक्रिप्ट नोटमध्ये समाविष्ट करा’ किंवा 'ट्रान्सक्रिप्ट कॉपी करा' निवडा.

    • ऑडिओ रेकॉर्डिंग जतन करा : अधिक बटण वर टॅप करा, ’फाइल्समध्ये ऑडिओ जतन करा’ वर टॅप करा, त्यानंतर पर्याय निवडा.

    • रेकॉर्डिंगचा वेव्हफॉर्म बघा : ’ट्रान्सक्रिप्ट लपवा’ बटण वर टॅप करा.

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलचा सारांश तुम्हाला ‘फोन’ ॲपमध्ये मिळू शकतो. ’फोन’ ॲपमध्ये Apple Intelligence वापरा पहा.

रेकॉर्ड केलेला कॉल हटवणे

  1. तुमच्या iPad वर नोट्स ॲपवर जा.

  2. ‘कॉल रेकॉर्डिंग्ज’ फोल्डरमध्ये नोटवर टॅप करा, अधिक बटण वर टॅप करा, नंतर ’हटवा’ वर टॅप करा.

    नोट : ऑडिओ रेकॉर्डिंग हटवल्याने ट्रान्सक्रिप्ट देखील हटवले जाते.

कॉल रेकॉर्डिंग बंद करणे

‘कॉल रेकॉर्डिंग’ डिफॉल्टनुसार चालू केले जाते, परंतु तुम्ही ते बंद करू शकता.

  1. तुमच्या iPad वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’फोन’ ॲपवर टॅप करा.

  3. ’कॉल रेकॉर्डिंग’ वर टॅप करा, नंतर ’कॉल रेकॉर्डिंग’ बंद करा.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.