iPad वर FaceTime कॉल्स स्क्रीन करणे आणि फिल्टर करणे

अज्ञात नंबर आणि संशयास्पद स्पॅमवरून येणारे कॉल्स FaceTime कसे हाताळते हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

अज्ञात FaceTime ऑडिओ कॉल्स स्क्रीन करणे

कॉल येण्यापूर्वी कॉलर्सकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही अज्ञात नंबरवरून येणारे FaceTime ऑडिओ कॉल्स स्क्रीन करू शकता. कॉल्स स्क्रीन आणि ब्लॉक करणे पहा.

FaceTime कॉल्स सायलेंट करणे किंवा फिल्टर करणे

  1. तुमच्या iPad वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर FaceTime वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • अज्ञात कॉलर्सना सायलेंट करा : ‘अज्ञात कॉलर्सना सायलेंट करा’ सुरू करा. अज्ञात नंबर्सवरून येणारे कॉल्स सायलेंट केले जातात, व्हॉइसमेलला पाठवले जातात आणि ‘अलीकडील’ यादीमध्ये दिसतात. तुमच्या संपर्क, अलीकडील आउटगोइंग कॉल्स आणि Siri सूचनांमधील लोकांकडून येणारे कॉल रिंग होत राहतील.

    • अज्ञान नंबर्सवरून येणारे कॉल्स फिल्टर करा : ‘अज्ञात कॉलर्स’ सुरू करा. अज्ञात नंबर्सवरून आलेले मिस्ड कॉल्स आणि व्हॉइसमेल्स तुमच्या कॉल हिस्ट्रीमधील अज्ञात कॉलर्सच्या यादीत मूव्ह केले जातात (यादी पाहण्यासाठी फिल्टर बटण वर टॅप करा).

    • स्पॅम म्हणून ओळखले गेलेले कॉल्स फिल्टर करा : FaceTime स्पॅम सुरू करा. स्पॅम कॉल्स सायलेंट केले जातात आणि तुमच्या कॉल हिस्ट्रीमधील स्पॅम यादीमध्ये मूव्ह केले जातात (यादी पाहण्यासाठी फिल्टर बटण वर टॅप करा).

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.