ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर ‘शोधाशोध’ मध्ये AirTag किंवा इतर आयटमला ’हरवले’ म्हणून चिन्हांकित करणे

तुमच्या Apple अकाउंटवर नोंदणीकृत असलेला AirTag किंवा थर्ड पार्टी आयटम हरवल्यास, तुम्ही’शोधाशोध’ ॲपचा वापर करून तो हरवल्याचे चिन्हांकित करू शकता आणि संदेशासह तुमची संपर्क माहिती दाखवू शकता.

AirTag किंवा थर्ड पार्टी आयटम कसा नोंदवायचा हे जाणून घ्या.

तुम्ही जेव्हा आयटमला ’हरवले’ म्हणून चिन्हांकित कराल तेव्हा काय होईल?

  • तुम्ही आयटम हरवला आहे असा संदेश समाविष्ट करू शकता आणि तुमचा फोन नंबर किंवा ईमेल ॲड्रेस समाविष्ट करू शकता.

  • जर दुसऱ्या कोणाला तुमचा आयटम सापडला, तर ते ’लॉस्ट मोड’ संदेश असलेले संकेतस्थळ पाहण्यासाठी सपोर्ट केलेले डिव्हाइस वापरू शकतात.

‘हरवलेल्या आयटमसाठी संपर्क माहिती दाखवा’ चालू करणे

‘हरवलेल्या आयटमसाठी संपर्क माहिती दाखवा’ चालू करण्यासाठी, पुढील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या आयटमवर टॅप करा, नंतर हरवलेल्या आयटमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘हरवलेले’ AirTag च्या खाली, ‘संपर्क माहिती दाखवा’ वर टॅप करा.

  4. ज्यावर तुम्हाला संपर्क करता येईल असा फोन नंबर प्रविष्ट करण्यासाठी ऑनस्क्रिन सुचनांचे अनुसरण करा. त्याऐवजी ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करण्यासाठी, “ईमेल ॲड्रेस वापरा” वर टॅप करा.

    महत्त्वाचे : शोधाशोध ॲपसाठी तुम्ही नोटिफिकेशनला अनुमती देत असल्याची खात्री करा. iPad वर नोटिफिकेशन सेटिंग बदलणे पहा.

  5. ‘पूर्ण’ वर टॅप करा.

लॉस्ट मोड संदेशातील संपर्क माहिती बदलणे

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या आयटमवर टॅप करा, नंतर हरवलेल्या आयटमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘हरवलेले’ AirTag च्या खाली, ‘संपर्क माहिती दाखवा’ वर टॅप करा.

  4. फोन नंबर किंवा संदेश संपादित करा, त्यानंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

‘हरवलेल्या आयटमसाठी संपर्क माहिती दाखवा’ बंद करणे

जेव्हा तुम्हाला तुमचा हरवलेला आयटम सापडेल, तेव्हा ‘संपर्क माहिती दाखवा’ बंद करा.

  1. तुमच्या iPad वर शोधाशोध ॲपवर वर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी डावीकडे असलेल्या ‘आयटम’ वर टॅप करा, नंतर आयटमच्या नावावर टॅप करा.

  3. ‘हरवलेले’ AirTag च्या खाली, ‘संपर्क माहिती दाखवा’ वर टॅप करा.

  4. ‘माहिती दाखवणे थांबवा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.