ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPad वर तुमची संपर्क माहिती आणि छायाचित्र समाविष्ट करणे किंवा संपादित करणे

संपर्क ॲपमध्ये माझे कार्ड नावाचे तुमचे संपर्क कार्ड तयार करण्यासाठी iPad तुमचा Apple अकाउंट वापरतो. तुम्ही लोकांना कॉल करता किंवा संदेश पाठवता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी शेअर करत असलेले तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि वाढदिवसाची तारीख तसेच, संपर्क पोस्टर ह्यासारखे तपशील तुम्ही समाविष्ट करू शकता किंवा संपादितदेखील करू शकता.

‘माझे कार्ड’ पूर्ण करणे किंवा संपादित करणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी असलेल्या ‘माझे कार्ड’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

    तुम्हाला ‘माझे कार्ड’ दिसत नसल्यास, ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा आणि तुमची माहिती प्रविष्ट करा, त्यानंतर, संपर्क यादीवर परत या, तुमच्या संपर्कावर टच आणि होल्ड करा आणि ‘हे माझे कार्ड करा’ वर टॅप करा.

  3. तुमची संपर्क माहिती प्रविष्ट करा.

    ‘संपर्क’ द्वारे तुम्हाला मदत करण्यासाठी पत्ते आणि फोन नंबर सुचवले जातात.

टिप : तुम्ही तुमच्या नावाचा उच्चार कसा करावा हे Siri ला देखील शिकवू शकता. तुमचे नाव कसे बोलायचे ते Siri ला सांगणे पहा.

तुमच्या घराचा पत्ता समाविष्ट करणे किंवा संपादित करणे

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी असलेल्या ‘माझे कार्ड’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  3. ‘पत्ता समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमचा पत्ता समाविष्ट करा.

  4. पत्त्याच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या लेबलवर टॅप करा, त्यानंतर ‘होम’ सिलेक्ट करा.

ऑनलाइन शॉपिंग किंवा ऑनलाइन फॉर्मसारख्या गोष्टींसाठी तुमचा ॲड्रेस ऑटोमॅटिकली भरण्यासाठी तुम्ही Safari मध्ये ‘ऑटोफिल’ वापरू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे ‘माझे कार्ड’ संपादित करता, तेव्हा तुमची ऑटोफिल माहिती ऑटोमॅटिकली अपडेट होते. वैयक्तिक माहिती भरा पहा.

तुमचे छायाचित्र आणि पोस्टर समाविष्ट करणे किंवा संपादित करणे

जेव्हा तुम्ही इतरांना कॉल करता किंवा संदेश पाठवता तेव्हा तुम्ही छायाचित्र आणि पोस्टर ऑटोमॅटिकली दिसण्यासाठी सेट करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी असलेल्या ‘माझे कार्ड’ वर टॅप करा, नंतर ‘संपादित करा’ वर टॅप करा.

  3. तुमच्या संपर्क छायाचित्रावर टॅप करा, त्यानंतर तुमचे छायाचित्र आणि पोस्टर निवडा आणि कस्टमाइझ करा.

तुमचे नाव आणि संपर्क इमेज शेअर करणे

तुम्ही तुमचे अपडेट केलेले नाव, छायाचित्र आणि पोस्टर तुमच्या सांपर्कांमधील लोकांबरोबर ऑटोमॅटिकली शेअर करणे निवडू शकता.

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. शीर्षस्थानी ’माझे कार्ड’ वर टॅप करा, ’संपादित करा’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या संपर्क छायाचित्रावर टॅप करा.

  3. तुमचे संपर्क छायाचित्र आणि पोस्टर इतरांसह शेअर करणे सुरू करण्यासाठी ‘नाव व छायाचित्र शेअरिंग’ चालू करा. (कदाचित तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.)

    तुम्ही ‘फक्त संपर्क’ बरोबर ऑटोमॅटिकली शेअर करू शकता किंवा तुम्ही कुणाशीही तुमचे नाव, छायाचित्र आणि पोस्टर शेअर केले जाण्यापूर्वी पूर्वसूचना मिळवण्यासाठी ‘नेहमी विचारा’ सिलेक्ट करा.

संपर्क सर्वनामे समाविष्ट करणे किंवा संपादित करणे

तुम्ही संपर्क ॲपमध्ये तुमचे सर्वनाम किंवा दुसऱ्या संपर्काचे सर्वनाम समाविष्ट करू शकता किंवा संपादित करू शकता.

  1. तुमच्या iPad वर संपर्क ॲपवर जा.

  2. तुमचे सर्वनाम समाविष्ट करण्यासाठी शीर्षस्थानी असलेल्या ‘माझे कार्ड’ वर टॅप करा किंवा त्यांचे सर्वनाम समाविष्ट करण्यासाठी दुसरा संपर्क सिलेक्ट करा.

  3. ‘संपादित करा’ वर टॅप करा, नंतर ‘सर्वनामे समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. तुमची भाषा सिलेक्ट करा आणि योग्य सर्वनाम समाविष्ट करा.

    तुम्ही ‘पुन्हा सर्वनाम समाविष्ट करा’ वर टॅप करून इतर भाषांमध्ये देखील सर्वनाम समाविष्ट करू शकता.

  5. ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

नोट : जेव्हा तुम्ही ‘संपर्क’ किंवा ‘NameDrop’ द्वारे तुमची संपर्क माहिती शेअर करता, तेव्हा डिफॉल्टनुसार तुमची सर्वनामे शेअर केली जात नाहीत. जेव्हा तुम्ही दुसऱ्या संपर्काची माहिती शेअर करता, तेव्हा त्यांची सर्वनामे कधीही शेअर केली जात नाहीत.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.