ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर कौटुंबिक शेअरिंगमध्ये असलेल्या मुलासाठी डिव्हाइस सेट अप करणे

‘कौटुंबिक शेअरिंग’ सह, आयोजक, आई-वडील किंवा पालक आपल्या मुलाचा नवीन iPhone किंवा iPad सेट अप करण्यासाठी आणि आईवडिलांचे नियंत्रण कस्टमाइझ करण्यासाठी त्यांच्या iPhone वर ‘क्विक स्टार्ट’ वापरू शकतात. तुम्ही ’क्विक स्टार्ट’ चा वापर न करता मुलासाठी डिव्हाइस सेट अपदेखील करू शकता.

तुम्ही लहान मुलाचे डिव्हाइस सेट अप करताना त्याच्या अकाउंटमध्ये साइन इन केलेले नसल्यास, तुम्ही त्याचा Apple अकाउंट आणि पासवर्डसह ‘सेटिंग’ मध्ये किंवा जवळपासच्या iPhone किंवा iPad सह ‘प्रॉक्सिमिटी साइन इन’ वापरून असे करू शकता.

नोट : जर मुलाकडे आधीपासूनच Apple अकाउंट असेल, तर त्या मुलाला तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गट ह्यामध्ये समाविष्ट केलेले असल्याची खात्री करा. अपत्याचे Apple अकाउंट नसल्यास आणि त्याचे वय 13 वर्षांपेक्षा कमी असल्यास (हे वय प्रदेशानुसार बदलते ), तुम्ही त्यांना गटामध्ये समाविष्ट करताना त्यांच्यासाठी Apple अकाउंट तयार करू शकता.

लहान मुलासाठी iPhone किंवा iPad सेट अप करण्यासाठी ‘क्विक स्टार्ट’ चा वापर करणे

नोट : iOS 16 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक. Bluetooth® सुरू असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. तुम्ही तुमच्या iPhone वर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असल्याची खात्री करा.

  3. तुम्हाला तुमच्या मुलासाठी जो नवीन iPhone किंवा iPad सेट अप करायचा आहे, त्याचे साइड बटण किंवा त्याच्या शीर्षस्थानी असलेले बटण Apple लोगो दिसेपर्यंत दाबा आणि होल्ड करा.

  4. तुमचा iPhone नवीन डिव्हाइसच्या बाजूला आणा.

  5. तुमच्या अपत्यासाठी वयोमर्यादा सिलेक्ट करा.

    वय श्रेणी सेटअप स्क्रीन. वयोगटाच्या तीन श्रेणी आहेत : मूल (12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे), किशोरवयीन (13 वर्षे ते 17 वर्षे वयाचे) आणि प्रौढ (18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे).
  6. ‘आता कनेक्ट करा’ वर टॅप करा.

  7. तुमच्या मुलाचे डिव्हाइस सेट अप करणे पूर्ण करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

‘क्विक स्टार्ट’ चा वापर न करता लहान मुलासाठी iPhone किंवा iPad सेट अप करा

  1. नवीन डिव्हाइस चालू करा.

  2. जेव्हा ‘क्विक स्टार्ट’ स्क्रीन दिसेल, तेव्हा ’दुसऱ्या डिव्हाइसशिवाय सेट अप करा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    तुमचे मूल 12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असल्यास, त्यांचा iPhone आईवडील किंवा पालकांच्या डिव्हाइसशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.

    नोट : देश किंवा प्रदेशानुसार वयाच्या अचूक श्रेणी बदलू शकतात.

  3. सेटअप पूर्ण करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करणे चालू ठेवा.

‘सेटिंग’ मध्ये लहान मुलासाठी iPhone किंवा iPad सेट अप करणे

जर तुम्ही सेटअप दरम्यान मुलाच्या अकाउंटमध्ये साइन इन केले नसेल, तर पुढील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. तुम्ही तुमच्या iPhone वर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असल्याची खात्री करा.

  3. चाइल्ड अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी पुढीलपैकी एक करा :

    • ईमेल पत्ता किंवा फोन नंबर आणि पासवर्डने साइन इन करा : ‘मॅन्युअली साइन इन करा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘माझ्या कुटुंबातील मुलाला साइन इन करून घ्या’ वर टॅप करा.

    • जवळपासच्या iPhone किंवा iPad सह साइन इन करा : ’दुसरे Apple डिव्हाइस वापरा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा. तुमच्या कौटुंबिक गटामध्ये आधीच एखादे मूल असल्यास, त्याच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’सुरू करुया’ वर टॅप करा. जर तुम्हाला मुलासाठी नवीन Apple अकाउंट तयार कारणे गरजेचे असेल, तर ’मुलासाठी नवीन अकाउंट तयार करा’ वर टॅप करा.

  4. सेटअप पूर्ण करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करणे चालू ठेवा.

तुम्ही तुमच्या अपत्यासाठी ‘कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध’, ‘संभाषण मर्यादा’, ‘स्क्रीनचे अंतर’ आणि ‘संभाषण सुरक्षा’ ह्यासारखे सुरक्षा फीचर्स सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी लहान मुलासाठी स्क्रीन टाइम सेट अप करणे पहा.

नोट : स्क्रीनपासूनचे अंतर सपोर्ट असलेल्या मॉडेल वर उपलब्ध आहे.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.