ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमच्या iPhone कॅमेऱ्याने पॅनोरॅमिक छायाचित्रे घेणे

पॅनो मोड मध्ये तुमच्या सभोवतालचे पॅनोरॅमिक छायाचित्र घेण्यासाठी iPhone कॅमेरा वापरा.

  1. तुमच्या iPhone वर कॅमेरा उघडा.

  2. ‘पॅनो मोड’ सिलेक्ट करण्यासाठी डावीकडे स्वाइप करा.

  3. शटर बटणावर टॅप करा किंवा (सपोर्ट केलेल्या मॉडेलवर) ‘कॅमेरा कंट्रोल’ वर क्लिक करा.

  4. मध्य रेषेवर ठेवून ॲरोच्या दिशेने हळूहळू पॅन करा.

  5. पूर्ण करण्यासाठी, (सपोर्ट केलेल्या मॉडेलवर) पुन्हा शटर बटणावर टॅप करा किंवा ‘कॅमेरा कंट्रोल’ वर क्लिक करा.

विरुद्ध दिशेने पॅन करण्यासाठी ॲरोवर टॅप करा. अनुलंब पॅन करण्यासाठी, iPhone लॅण्डस्केप ओरिएंटेशनमध्ये फिरवा. तुम्ही अनुलंब पॅनची दिशादेखील रिव्हर्स करू शकता.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.