ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Apple TV ॲपमध्ये खेळ बघणे

स्पोर्ट्स रो तुम्हाला लाइव्ह आणि शेड्यूल केलेल्या स्पोर्ट्स इव्हेंट्सच्या तपशीलवार ॲरेचा ॲक्सेस देते, ज्यामध्ये Apple TV सदस्यता किंवा MLS Season Pass सह मेजर लीग सॉकर ह्यासह Friday Night Baseball आणि Sunday Night Soccer ह्यासारख्या केवळ सदस्यता फीचर्सच्या ॲक्सेसचा समावेश आहे.

तुम्ही अद्ययावत दर मिनिटाच्या स्कोअरसह लाइव्ह गेम पाहू शकता, आगामी गेम्स ब्राउझ करू शकता आणि प्रीगेम आणि पोस्टगेम शोज ॲक्सेस करू शकता.

स्पोर्ट्स ब्राउझ करणे

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲप वर जा.

  2. ’होम’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’स्पोर्ट्स’ वर टॅप करा.

  3. खालीलपैकी एक करा :

    • वैशिष्ट्यपूर्ण इव्हेंट्स ब्राउझ करण्यासाठी स्क्रीनच्या शीर्षस्थानी डावीकडे स्वाइप करा.

      अधिक माहिती मिळविण्यासाठी इव्हेंटवर टॅप करा, किंवा तुमच्या वॉचलिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • श्रेणी रोवर खाली स्क्रोल करा, नंतर उपलब्ध असलेले पर्याय बघण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

      टिप : श्रेणीतील सर्व आयटम्स बघण्यासाठी किंवा संग्रहाविषयी अधिक माहिती बघण्यासाठी ’शीर्षक’ ओळीवर टॅप करा.

लाइव्ह स्पोर्ट्स बघणे

  1. तुमच्या iPhone वर Apple TV ॲपवर जा.

  2. ’होम’ वर टॅप करा, खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’स्पोर्ट्स’ वर टॅप करा.

  3. बघणे सुरू करण्यासाठी, चालू असलेल्या स्पोर्ट्स इव्हेंटवर टॅप करा, नंतर लाइव्ह ब्रॉडकास्ट बघण्यासाठी ‘लाइव्ह बघा’ वर टॅप करा किंवा सुरुवातीपासून बघण्यासाठी ‘पुन्हा सुरू करा’ वर टॅप करा.

    जर तुम्ही चॅनल किंवा ॲपची सदस्यता घेतली नसेल, तर ’ह्यामध्ये उघडा’ वर टॅप करा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    नोट : तुमच्या वॉचलिस्टमध्ये समाविष्ट केलेले स्पोर्ट्स इव्हेंट लाइव्ह असताना ’बघणे चालू ठेवा’ ओळीमध्ये दिसतात.

जर तुम्हाला लॉक स्क्रीनवर गेमसाठी लाइव्ह अपडेट प्राप्त करायचे असतील, तर ‘लाइव्ह फॉलो करा’ वर टॅप करा. iPhone लॉक स्क्रीनवरून फीचर ॲक्सेस करणे पहा.

सिलेक्ट केलेले गेम हे गेम पृष्ठावर सध्याचा स्कोअर आणि खेळानुसार अपडेटदेखील दाखवू शकतात.

लाइव्ह गेमचे स्कोअर लपवण्यासाठी, सेटिंग  > ॲप > TV वर जा, त्यानंतर ‘खेळाचे स्कोअर दाखवा’ बंद करा.

Apple TV साठी सदस्यता आवश्यक आहे, ज्यामध्ये काही देश आणि प्रदेशांमध्ये पुढीलपैकी काही किंवा सर्व गोष्टी समाविष्ट असू शकतात : Friday Night Baseball, Major League Soccer (MLS) आणि Formula 1. सर्व फीचर्स आणि कॉण्टेण्ट सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाहीत. Apple TV सदस्यतेमध्ये थर्ड पार्टी ब्रँडेड सदस्यता सेवा किंवा Apple TV ॲपमध्ये भाड्याने किंवा खरेदीसाठी उपलब्ध असलेला कॉण्टेण्ट समाविष्ट नाही.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.