iPhone वर ‘वॉलेट’ ॲपमध्ये डिजीटल कीज वापरा

‘वॉलेट’ ॲपमध्ये , तुम्ही तुमचे घर, हॉटेलची खोली, कार आणि स्कूटरच्या डिजिटल कीज संग्रहित करू शकता. तुम्ही तुमच्या दाराजवळ किंवा वाहनाजवळ पोहोचाल तेव्हा iPhone ऑटोमॅटिकली योग्य ‘की’ सादर करतो, ज्यामुळे तुम्हाला ’नियर फील्ड कम्युनिकेशन’ (NFC) वापरून फक्त टॅप करून ॲक्सेस मिळतो.

‘वॉलेट’ ॲपमधील होम की.

तुमचे घर अनलॉक करणे

सुसंगत स्मार्ट लॉक आणि ‘वॉलेट’ ॲपमधील ‘होम की’ सह, तुम्ही तुमच्या iPhone किंवा Apple Watch वर फक्त टॅप करून तुमचा दरवाजा अनलॉक करू शकता.

iPhone किंवा Apple Watch वर तुमची होम की वापरून तुमचा दरवाजा अनलॉक करणे पहा.

तुमच्या अपार्टमेंट इमारतीला किंवा कॉंडोमिनियमला ॲक्सेस करणे

तुमच्या iPhone किंवा Apple Watch मध्ये तुमच्या अपार्टमेंट इमारत, कॉंडोमिनियम किंवा इतर शेअर केलेल्या राहण्याच्या जागेसाठी ‘निवासी की’ समाविष्ट करण्यासाठी तुमच्या प्रॉपर्टी कंपनीच्या सूचनांचे पालन करा.

iPhone किंवा Apple Watch वर ‘Apple वॉलेट’ मध्ये निवासी की समाविष्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमची हॉटेलची खोली अनलॉक करणे

सहभागी हॉटेल्समध्ये, तुम्ही हॉटेल प्रदात्याच्या ॲपमधून Apple वॉलेटमध्ये तुमची रूम की समाविष्ट करू शकता, लॉबीमध्ये न जाता चेक इन करू शकता आणि तुमची रूम अनलॉक करण्यासाठी तुमचा iPhone किंवा Apple Watch वापरू शकता.

तुमच्या iPhone वर ‘Apple वॉलेट’ मध्ये तुमची हॉटेलच्या खोलीची की समाविष्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमची कार अनलॉक आणि सुरू करणे

‘Apple वॉलेट’ मधील डिजिटल कार कीसह, तुम्ही iPhone किंवा Apple Watch वापरून तुमची सुसंगत कार लॉक, अनलॉक आणि सुरू करू शकता.

तुमच्या iPhone किंवा Apple Watch वर ‘Apple वॉलेट’ मध्ये तुमची कार की समाविष्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमची स्कूटर अनलॉक करणे आणि सुरू करणे

‘Apple वॉलेट’ मधील डिजिटल स्कूटर कीसह, तुम्ही iPhone किंवा Apple Watch वापरून तुमची सुसंगत स्कूटर लॉक, अनलॉक आणि सुरू करू शकता.

तुमच्या iPhone किंवा Apple Watch वर ‘वॉलेट’ ॲपमध्ये तुमची स्कूटर की समाविष्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.