ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Mail, संपर्क आणि दिनदर्शिका अकाउंट सेट अप करणे

iPhone सह येणाऱ्या आणि iCloud सह तुम्ही वापरता त्या ॲप्स व्यतिरिक्त, Microsoft Exchange आणि बऱ्याच लोकप्रिय इंटरनेट आधारित मेल, संपर्क आणि दिनदर्शिका सेवांसह iPhone काम करतो. ह्या सेवांसाठी तुम्ही अकाउंट सेट अप करू शकता.

मेल अकाउंट सेट अप करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘Mail’ ॲपवर टॅप करा.

  3. Mail अकाउंटवर टॅप करा, त्यानंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. तुमचा ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा, ’पुढील’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या ईमेल अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    तुम्ही वापरू इच्छित असलेली ईमेल सेवा सिलेक्ट करण्यासाठी ‘ईमेल ॲड्रेस’ फील्ड अंतर्गत ’यादीमधून निवडा’ वर टॅप करू शकता—उदाहरणार्थ, iCloud, Microsoft Exchange किंवा Gmail (Google).

    जर तुमची ईमेल सेवा यादीमध्ये नसेल, तर ‘इतर अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, ‘Mail अकाउंट’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या ईमेल अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

ईमेल अकाउंट समाविष्ट करा आणि काढून टाका पहा.

संपर्क अकाउंट सेट अप करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘संपर्क’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘संपर्क अकाउंट्स’ वर टॅप करा, नंतर ‘अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • प्रोव्हायडरवर टॅप करा—उदाहरणार्थ, iCloud किंवा Microsoft Exchange—त्यानंतर तुमच्या अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    • ‘इतर’ वर टॅप करा, ‘LDAP अकाउंट समाविष्ट करा’ किंवा (जर तुमची संस्था ह्याला सपोर्ट करत असेल तर) ‘CardDAV अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर सर्व्हर आणि अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

’संपर्क’ मध्ये अकाउंट समाविष्ट करा किंवा त्यातून काढून टाका पहा.

दिनदर्शिका अकाउंट सेट अप करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’दिनदर्शिका’ वर टॅप करा.

  3. ’दिनदर्शिका अकाउंट्स’ वर टॅप करा, त्यानंतर ’अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • प्रोव्हायडर निवडा : प्रोव्हायडरवर टॅप करा—उदाहरणार्थ, iCloud किंवा Microsoft Exchange—त्यानंतर तुमच्या अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    • CalDAV, CardDav किंवा LDAP अकाउंट समाविष्ट करा : ’इतर अकाउंट समाविष्ट करा’ वर टॅप करा, पर्याय निवडा, त्यानंतर तुमचा सर्व्हर आणि अकाउंटची माहिती प्रविष्ट करा.

    • iCal (.ics) दिनदर्शिकेची सदस्यता घ्या : ‘इतर’ वर टॅप करा, ‘सदस्यता घेतलेली दिनदर्शिका समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर सदस्यता घेण्यासाठी .ics फाइलची URL प्रविष्ट करा; किंवा Mail मधून .ics फाइल इम्पोर्ट करा.

अनेक दिनदर्शिका सेट अप करा पहा.

कॉर्पोरेट वातावरणामध्ये Microsoft Exchange अकाउंट सेट अप करण्याबाबतच्या माहितीसाठी, Apple सपोर्ट लेख तुमच्या iPhone किंवा iPad वर Exchange ActiveSync सेट अप करा पहा.

तुम्ही तुमच्या iPhone वर iCloud कीचेन चालू केल्यास, तुमचे अकाउंट तुमच्या iCloud कीचेन चालू असलेल्या सर्व डिव्हाइसवर अद्ययावत राहतात. iCloud यूझर गाइडमध्ये iCloud सह पासवर्ड, अकाउंट आणि बऱ्याच गोष्टी अद्ययावत ठेवण्यासाठी iCloud कीचेन चा वापर करा पहा.

हे देखील पहाiPhone वर iCloud वापरणे
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.