ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर SharePlay आणि CarPlay वापरून कारमध्ये एकत्र संगीत प्ले करणे

SharePlay आणि CarPlay चा वापर करून, तुम्ही आणि तुमचे सर्व प्रवासी कारमध्ये प्ले होणारे संगीत नियंत्रित करू शकता.

प्रवासी दोन प्रकारे SharePlay जॉइन करू शकतात : त्यांच्या iPhone वरील नोटिफिकेशनवर टॅप करून किंवा CarPlay ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनवर किंवा दुसऱ्या प्रवाशाच्या iPhone च्या ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करून.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

  • चालकाकडे iOS 17 किंवा नंतरचे व्हर्जन असलेला iPhone असणे आवश्यक आहे आणि तो Apple Music चा सदस्य असणे आवश्यक आहे.

  • प्रवाशांकडे iOS 17 किंवा नंतरचे व्हर्जन असलेला iPhone असणे आवश्यक आहे, परंतु Apple Music ची सदस्यता असणे आवश्यक नाही.

  • प्रत्येकाने कारमध्ये संगीत प्ले करताना त्यांच्या संपर्कांना त्यांना शोधण्याची अनुमती दिली पाहिजे—सेटिंग  > ॲप > ‘संगीत’ वर जा, त्यानंतर जर आधीपासून चालू केलेले नसेल तर ‘जवळपासच्या संपर्कांद्वारे शोधण्ययोग्य’ चालू करा.

तुमच्या iPhone वर CarPlay सह SharePlay सुरू करणे

कारमध्ये SharePlay वापरण्यासाठी, तुम्ही आणि तुमच्याबरोबर प्रवास करणारे त्याचा भाग व्हाल.

  1. CarPlay वापरून तुमच्या iPhone वरून संगीत प्ले करणे सुरू करा.

    प्रवाशांच्या iPhone डिव्हाइसच्या लॉक स्क्रीनवर नोटिफिकेशन दिसते. त्यांनी ‘कनेक्ट करा’ वर टॅप केल्यानंतर, तुम्हाला CarPlay मध्ये नोटिफिकेशन प्राप्त होते.

  2. प्रवाशाच्या नावावर टॅप करा, त्यानंतर तुमच्या iPhone वरुन प्रवाशाला संगीत निवडण्याची आणि स्ट्रीम करण्याची अनुमती देण्यासाठी चेकमार्क बटण वर टॅप करा.

    तुम्ही प्रवाशाला मान्यता दिल्यानंतर, तुम्ही त्यांचा ॲक्सेस बंद करेपर्यंत ते त्याच प्रक्रियेतून न जाता भविष्यात SharePlay जॉइन करू शकतात.

SharePlay जॉइन करण्यासाठी QR कोडचा वापर करणे

तुम्ही Bluetooth® वरून देखील QR कोड स्कॅन करून प्रवाशांना SharePlay जॉइन करू देऊ शकता.

  1. CarPlay मधील ’आता प्ले होत आहे’ स्क्रीनवर, SharePlay बटण वर टॅप करा.

    CarPlay स्क्रीनवर QR कोड दिसतो.

  2. एखाद्या प्रवाशाला त्यांच्या iPhone वर कॅमेरा ॲप उघडण्यास सांगा आणि कॅमेरा QR कोडच्या दिशेने धरा.

    SharePlay ला कनेक्शनची विनंती करण्यासाठी त्यांच्या iPhone वरील QR कोडच्या चित्राखाली एक बटण दिसते. प्रवासी बटणावर टॅप करतो, नंतर ‘कनेक्ट करा’ वर टॅप करतो.

  3. प्रवाशाला जॉइन करण्याची अनुमती देण्यासाठी CarPlay स्क्रीनवरील चेकमार्क बटण वर टॅप करा.

इतर प्रवासी समाविष्ट करण्यासाठी QR कोड वापरणे

जर तुम्ही कारमधील संगीत नियंत्रित करण्यासाठी SharePlay चा वापर करणारे प्रवासी असाल, तर चालक रस्त्यावर लक्ष केंद्रित करत असताना तुम्ही इतर प्रवाशांना आमंत्रित करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर संगीत ॲपवर जा.

  2. ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन उघडा, त्यानंतर स्क्रीनच्या तळाशी SharePlay बटण वर टॅप करा.

    एक SharePlay विंडो दिसते, ज्यात सर्व सहभागी तसेच जॉइन होण्यासाठीचा एक QR कोड यादीबध्द केला जातो.

  3. एखाद्या प्रवाशाला त्यांच्या iPhone वर कॅमेरा ॲप उघडण्यास सांगा आणि कॅमेरा QR कोडच्या दिशेने धरा, कोडच्या खाली दिसणाऱ्या बटणावर टॅप करा, नंतर ‘कनेक्ट करा’ वर टॅप करा.

    प्रवाशाला जॉइन होण्याची अनुमती देण्यासाठी चालक CarPlay स्क्रीनवर चेकमार्क बटण वर टॅप करेल.

कारमध्ये SharePlay मधून बाहेर पडणे किंवा ते समाप्त करणे

  • जर तुम्ही प्रवासी असाल : ’आता प्ले होत आहे’ च्या तळाशी SharePlay बटण वर टॅप करा, त्यानंतर ’बाहेर पडा’ वर टॅप करा.

  • जर तुम्ही चालक असाल : CarPlay स्क्रीनवर ‘समाप्त करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.