ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Apple Intelligence सह ‘लेखन साधने’ वापरणे

Apple Intelligence* सह, तुम्ही तुमचे काम प्रूफरीड करण्यासाठी रायटिंग टूल्स वापरू शकता, योग्य शब्दरचना आणि टोन शोधण्यात मदत करण्यासाठी एकाच टेक्स्टची वेगवेगळी व्हर्जन्स तयार करू शकता आणि सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा सारांश घेऊ शकता. थर्ड पार्टी ॲप्स आणि संकेतस्थळांसह तुम्ही लिहिता अशा बहुतांश ठिकाणी रायटिंग टूल्स उपलब्ध आहेत.

नोट्स ॲपमध्ये लिहिली जाणारी स्टोरी दाखवणारा iPhone. स्क्रीनच्या तळाशी ’रायटिंग टूल्सने लिहा’ असा संवाद आहे ज्यामध्ये ChatGPT सह सुधारणा करण्यासाठी, पुन्हा लिहिण्यासाठी, ChatGPT सूचना निवडण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी पर्याय समाविष्ट आहेत.

नोट : Apple Intelligence सर्व iPhone मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. ** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची आणि Apple Intelligence सुरू केलेले असल्याची खात्री करा.

टेक्स्ट प्रूफरीड करणे

  1. लिहिताना, तुम्हाला सुधारायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा, नंतर ’रायटिंग टूल्स’ बटण वर टॅप करा.

    टिप : तुम्ही कीबोर्डच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या ‘रायटिंग टूल्स उघडा’ बटण वर देखील टॅप करू शकता.

  2. ‘प्रूफरीड करा’ वर टॅप करा.

    Apple Intelligence व्याकरण आणि स्पेलिंगच्या त्रुटींसाठी तुमचे टेक्स्ट तपासते. सर्व बदल ग्लोइंग लाइनसह रेखांकित केले गेले आहेत.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • प्रत्येक बदलासाठी बदल आणि स्पष्टीकरण बघा : तळाशी ’मागील बदल दाखवा’ बटण आणि ’पुढील बदल दाखवा’ बटण वर टॅप करा.

    • बदल डिस्कार्ड करा : ‘मूळ वापरा’ वर टॅप करा.

    • तुमच्या टेक्स्टच्या अपडेट केलेल्या आणि मूळ व्हर्जनमध्ये स्विच करा : ‘मूळ’ वर टॅप करा.

    • तुमच्या टेक्स्टच्या संपादित न केलेल्या व्हर्जनला पूर्वस्थितीत आणा : रिव्हर्ट बटण वर टॅप करा.

  4. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, ’सर्व शिफारस केलेले बदल स्वीकारा’ बटण वर टॅप करा.

टेक्स्ट पुन्हा लिहिणे

टेक्स्ट लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर—जसे की, क्लास नोट्स, किंवा ब्लॉग पोस्ट — तुम्ही ती पुन्हा लिहू शकता जेणेकरून सर्व काही बरोबर वाचले जात आहे ह्याची खात्री होईल. तुम्ही तुमच्या लिखाणाचा टोन देखील प्रेक्षक आणि टास्कशी ॲडजस्ट करू शकता.

  1. तुम्हाला सुधारणा करायचे असलेले टेक्स्ट सिलेक्ट करा, त्यानंतर ’रायटिंग टूल्स’ बटण वर टॅप करा.

    टिप : तुम्ही कीबोर्डच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या ‘रायटिंग टूल्स उघडा’ बटण वर देखील टॅप करू शकता.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • टेक्स्ट पुन्हा लिहा : पुन्हा लिहिण्यासाठी टॅप करा.

    • विशिष्ट टोनमध्ये टेक्स्ट पुन्हा लिहा : ‘फ्रेंडली’, ‘प्रोफेशनल’ किंवा ‘संक्षिप्त’ वर टॅप करा.

    • वर्णनाच्या आधारे टेक्स्ट पुन्हा लिहा : “तुमच्या बदलाचे वर्णन करा” वर टॅप करा, नंतर वर्णन प्रविष्ट करा—उदाहरणार्थ, “ह्याला अधिक उत्साही बनवा”.

    तुमच्या टेक्स्टचे पुन्हा लिहिलेले व्हर्जन इनलाइन दिसते. तुम्ही PDF सारख्या ’रीड ओन्ली’ डॉक्युमेंटमधील टेक्स्ट सिलेक्ट केलेले असल्यास, ’रायटिंग टूल्स’ डायलॉगमध्ये टेक्स्ट दिसेल.

  3. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा : पुन्हा लिहिण्यासाठी टॅप करा.

    • तुमच्या टेक्स्टच्या अपडेट केलेल्या आणि मूळ व्हर्जनमध्ये स्विच करा : ‘मूळ’ वर टॅप करा.

    • बदल पूर्ववत करा : मागील बदल दाखवण्यासाठी ‘पूर्ववत करा’ बटण वर टॅप करा.

    • तुमच्या टेक्स्टच्या संपादित न केलेल्या व्हर्जनला पूर्वस्थितीत आणा : रिव्हर्ट बटण वर टॅप करा.

    • केवळ ‘रीड ओन्ली’ टेक्स्टचे पुनर्लेखन कॉपी करा : ’रायटिंग टूल्स डायलॉगमध्ये कॉपी करा’ वर टॅप करा.

  4. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, पूर्ण बटण वर टॅप करा.

टेक्स्ट सारांशित आणि व्यवस्थापित करणे

टेक्स्ट लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, सारांश तयार करण्यासाठी तुम्ही Apple Intelligence वापरू शकता. तुम्ही सारांश बुलेट केलेले की पॉइंट म्हणून देखील सादर करू शकता किंवा मूळ टेक्स्ट यादी किंवा टेबलमध्ये व्यस्थापित करू शकता.

  1. तुम्हाला सारांशित किंवा व्यवस्थापित करायचा असलेला टेक्स्ट सिलेक्ट करा, त्यानंतर ’रायटिंग टूल्स’ बटण वर टॅप करा.

    टिप : तुम्ही कीबोर्डच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या ‘Apple Intelligence’ बटण वर देखील टॅप करू शकता.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • टेक्स्टचा सारांश करा : ‘सारांश करा’ वर टॅप करा.

    • टेक्स्टचे मुख्य बिंदूं सारांशित करा : ‘मुख्य बिंदू’ वर टॅप करा.

    • मूळ टेक्स्टला यादीमध्ये व्यस्थापित करा : ‘यादी’ वर टॅप करा.

    • मूळ टेक्स्ट टेबलमध्ये व्यवस्थापित करा : ‘टेबल’ वर टॅप करा.

    तुमच्या टेक्स्टचे पुन्हा लिहिलेले व्हर्जन दिसते.

  3. सारांश पाहिल्यानंतर, खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • सारांश कॉपी करा : ‘कॉपी करा’ वर टॅप करा.

    • मूळ टेक्स्टला सारांशाने बदला : ‘बदला’ वर टॅप करा.

      नोट : जर स्त्रोत टेक्स्ट संपादित करण्यायोग्य नसेल तर बदलणे हा पर्याय नाही.

    • सारांश शेअर करा : ‘शेअर करा’ वर टॅप करा, त्यानंतर शेअर पर्याय निवडा.

  4. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, पूर्ण बटण वर टॅप करा.

तुम्ही ChatGPT एक्सटेंशन सुरू केलेले असल्यास, तुम्ही ’रायटिंग टूल्स’ सह टेक्स्ट लिहू शकता. एक्सटेंशन सुरू करण्यासाठी आणि उपलब्धतेविषयी जाणून घेण्यासाठी, Apple Intelligence सह ChatGPT वापरा पहा.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेलचा वापर करते आणि आउटपुट बदलू शकतात. अचूकतेसाठी महत्त्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.