ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर पुस्तक ॲपमध्ये वाचन उद्दिष्टे सेट करणे

तुम्ही दररोज किती मिनिटे वाचन करता आणि तुम्ही दर वर्षी किती पुस्तके आणि ऑडिओबुक पूर्ण करता याचा मागोवा ठेवण्यासाठी ‘पुस्तक’ ॲप तुम्हाला मदत करते. तुम्ही अधिक वेळ वाचनात घालवण्यासाठी, नवीन वाचन स्ट्रीक सेट करण्यासाठी आणि तुमची उद्दिष्ट्ये गाठण्यात प्रोत्साहन प्राप्त करण्यासाठी तुमची उद्दिष्ट्ये कस्टमाइझ करू शकता.

यूझरची सांख्यिकी दाखवणारी ‘वाचन उद्दिष्ट्ये’ स्क्रीन—जसे की आजचे वाचन, आठवड्यातील त्यांचे वाचन रेकॉर्ड आणि त्यांनी ह्या वर्षी वाचलेली पुस्तके. खालच्या बाजूला होम (सिलेक्ट केलेले), लायब्ररी, ‘पुस्तकालय’, ऑडिओबुक आणि सर्च टॅब आहेत.

नोट : Apple Books सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. Apple मीडिया सेवांची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमचे दैनंदिन वाचन उद्दिष्ट्य बदलणे

तुम्हाला दररोज किती मिनिटे वाचन करायचे आहे ह्यानुसार तुम्ही तुमचे दैनिक वाचन उद्दिष्ट्य समायोजित करू शकता. जर तुम्ही तुमचे दैनंदिन वाचन उद्दिष्ट्य कस्टमाइझ केले नाही, तर ते ‘दररोज 5 मिनिटे’ वर सेट केले जाते.

  1. तुमच्या iPhone वरील पुस्तक ॲप वर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूस असलेले वाचन लक्ष्य बटणावर टॅप करा.

  3. ‘वाचन उद्दिष्ट्य टायमर’ वर टॅप करा, त्यानंतर ‘उद्दिष्ट्य समायोजित करा’ वर टॅप करा.

    नोट : तुमच्या वाचन उद्दिष्टाच्या दिशेने PDF मोजण्यासाठी, सेटिंग  > ॲप > ‘पुस्तक’ वर जा, नंतर ‘वाचन उद्दिष्ट्ये’ च्या खाली ‘PDF समाविष्ट करा’ चालू करा.

  4. तुम्हाला दररोज किती मिनिटे वाचन करायचे आहे हे सेट करण्यासाठी काउंटर ‘वर’ किंवा ‘खाली’ स्लाइड करा., नंतर ‘पूर्ण’ वर टॅप करा.

तुमचे वार्षिक वाचन उद्दिष्ट्य बदलणे

तुम्ही पुस्तक पूर्ण केल्यानंतर, ’या वर्षी वाचलेली पुस्तके’ च्या खाली कव्हर डिस्प्ले केले जाते. डिफॉल्ट वार्षिक वाचन उद्दिष्ट्य दर वर्षी तीन पुस्तके एवढे आहे, परंतु तुम्हाला किती पुस्तके वाचून पूर्ण करायची आहेत त्यानुसार तुम्ही तुमचे उद्दिष्ट्य वाढवू किंवा कमी करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील पुस्तक ॲप वर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूस असलेले वाचन लक्ष्य बटणावर टॅप करा.

  3. पुस्तकाचे कव्हर किंवा कव्हर प्लेसहोल्डरवर टॅप करा, त्यानंतर ‘उद्दिष्ट्य समायोजित करा’ वर टॅप करा.

  4. तुम्हाला प्रत्येक वर्षी वाचायची असलेली पुस्तके सेट करण्यासाठी काउंटर ‘वर’ किंवा ‘खाली’ स्लाइड करा, त्यानंतर ‘झाले’ वर टॅप करा.

टिप : तुम्ही तुमच्या लायब्ररीमधील पुस्तकाचे स्टेटस ‘पूर्ण झाले’ मध्ये बदलू शकता. पुस्तक किंवा ऑडिओबुक कव्हरच्या खाली ‘अधिक माहिती’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘झाले म्हणून चिन्हांकित करा’ वर टॅप करा.

प्रशिक्षण नोटिफिकेशन बंद करणे

तुमची वाचन उद्दिष्ट्ये गाठण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला ‘पुस्तक’ कडून प्रोत्साहन आणि उत्तेजन प्राप्त होते. तुम्ही ही नोटिफिकेशन बंद करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील पुस्तक ॲप वर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तुमच्या अकाउंट बटणावर टॅप करा.

  3. नोटीफिकेशनवर टॅप करा, त्यानंतर प्रशिक्षण बंद करा.

  4. ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

‘वाचन उद्दिष्ट्ये नोटिफिकेशन’ बंद करणे

जेव्हा तुम्ही वाचन उद्दिष्ट्य साध्य करता किंवा वाचन स्ट्रीक सेट करता तेव्हा ‘पुस्तक’ तुम्हाला नोटिफिकेशन पाठवते. तुम्ही ही नोटिफिकेशन बंद करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील पुस्तक ॲप वर जा.

  2. ‘होम’ वर टॅप करा, त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तुमच्या अकाउंट बटणावर टॅप करा.

  3. नोटिफिकेशनवर टॅप करा, त्यानंतर ‘उद्दिष्ट्य पूर्ण करणे’ बंद करा.

  4. ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

‘वाचन उद्दिष्ट्ये’ बंद करणे

  1. तुमच्या iPhone वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ’ॲप्स’ वर टॅप करा, ’पुस्तक’ ॲपवर टॅप करा, त्यानंतर ’वाचन उद्दिष्ट्ये’ बंद करा.

जेव्हा ‘वाचन उद्दिष्टे’ बंद केली जातात, तेव्हा ‘होम’ टॅबमधील वाचन निर्देशक लपवले जातात आणि तुम्हाला वाचन नोटिफिकेशन्स मिळत नाहीत.

वाचन डेटा क्लिअर करणे

तुम्ही वाचन, वाचन उद्दिष्ट्य आणि वाचन स्ट्रीक ह्यासारखा तुमचा वाचन डेटा क्लिअर करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील ‘सेटिंग’ ॲपवर जा.

  2. ’ॲप’ वर टॅप करा, ’पुस्तक’ ॲपवर टॅप करा, त्यानंतर ’वाचन उद्दिष्ट्ये डेटा क्लिअर करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.