ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे आणि मॅनेज करणे

तुमचे Apple अकाउंट तुम्हाला Apple सेवांचा जसे की App Store, Apple Games ॲप, iTunes Store, Apple Books, Apple Music, FaceTime, iCloud, iMessage आणि इतर सेवांचा ॲक्सेस देते.

जेव्हा तुम्ही चीन मेनलॅण्डमध्ये किंवा भारतात नवीन Apple अकाउंट तयार करता, तेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल नंबर तुमचा Apple अकाउंट यूझर नेम म्हणून वापरू शकता. ईमेल ॲड्रेस ऐवजी फोन नंबरचा वापर करून Apple अकाउंट तयार करा आणि मॅनेज करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणे

तुम्ही सेटअपच्या दरम्यान साइन इन केले नसेल तर खालील गोष्टी करा :

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. ‘Apple अकाउंट’ वर टॅप करा.

  3. खालीलपैकी एक टॅप करा :

    • दुसरे Apple डिव्हाइस वापरा : तुमचा इतर iPhone किंवा iPad ( iOS 17, iPadOS 17 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनसह) जवळ आणा, त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    • मॅन्युअली साइन इन करा : तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर प्रविष्ट करा, नंतर तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा. तुमच्याकडे Apple अकाउंट नसल्यास, तुम्ही ते तयार करू शकता.

  4. तुम्ही तुमचे अकाउंट टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसह सुरक्षित केले असल्यास, सहा अंकी पडताळणी कोड प्रविष्ट करा.

जर तुम्ही तुमचा Apple अकाउंट पासवर्ड विसरलात, तर तुमचा पासवर्ड संकेतस्थळ रीसेट करा पहा.

तुमचे Apple अकाउंट सेटिंग बदलणे

‘Apple अकाउंट सेटिंग’ मध्ये पर्यायांची यादी दिली असून ह्यात वैयक्तिक माहिती, सदस्यता, ‘शोधाशोध’ आणि बरेच काही समाविष्ट आहे.
  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वैयक्तिक माहिती अपडेट करा : तुमचे नाव, जन्मदिनांक आणि Memoji किंवा तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित छायाचित्र अपडेट करा. तुम्ही Apple वरून संभाषण करण्यासाठी तुमची प्राधान्ये देखील सेट अप करू शकता आणि तुमचा डेटा कसा मॅनेज केला जातो ते पाहू शकता.

    • ‘साइन इन व सुरक्षा’ बदला : तुमचा Apple अकाउंट पासवर्ड बदला, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा, साइन इन करण्यासाठी तुम्ही वापरू शकणारे फोन नंबर्स आणि ईमेल्स समाविष्ट करा किंवा काढून टाका, आणि ’अकाउंट रिकव्हरी’ किंवा ‘लेगसी संपर्क’ सेट अप करा.

    • ‘पेमेंट व शिपिंग’ मॅनेज करा : तुमच्या Apple अकाउंटसाठी आणि Apple Store मधील खरेदीसाठी तुमच्या पेमेंटच्या पद्धती आणि शिपिंग पत्ता निवडा.

    • तुमच्या सदस्यता बघा आणि मॅनेज करा : Apple वरील तुमच्या सदस्यता आणि App Store वरून तुम्ही ॲप्समध्ये खरेदी केलेल्या सदस्यता बघा आणि मॅनेज करा.

    • iCloud वापरा.

    • कौटुंबिक शेअरिंग मॅनेज करा.

    • शोधाशोध वापरा.

    • ‘मीडिया व खरेदी’ मॅनेज करा : Apple Music, Apple Podcasts, Apple TV आणि Apple Books शी लिंक केलेले अकाउंट्स मॅनेज करा आणि खरेदीच्या सेटिंग सिलेक्ट करा.

    • Apple सह साइन इन करा वापरा.

तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित पेमेंट पद्धत समाविष्ट किंवा अपडेट करणे

तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित पेमेंट माहिती Apple मीडिया खरेदी आणि सेवांसाठी वापरली जाते.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. [तुमचे नाव] वर टॅप करा, त्यानंतर ’पेमेंट व शिपिंग’ वर टॅप करा. तुम्हाला कदाचित Face ID किंवा Touch ID ने ऑथेंटिकेट करावे लागेल.

  3. ‘पेमेंट पद्धत समाविष्ट करा’ वर टॅप करा किंवा ‘सध्याची पेमेंट पद्धत’ वर टॅप करा.

तुम्हाला तुमची Apple अकाउंट पेमेंट पध्दत बदलायची किंवा अपडेट करायची असल्यास काय करावे ह्याबाबत Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.