ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर तुमच्या Apple अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे

टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर केल्याने इतरांना तुमचे Apple अकाउंट अकाउंट ॲक्सेस करण्यापासून रोखण्यात मदत होते, जरी त्यांना तुमचा Apple अकाउंट पासवर्ड माहित असेल तरीही. ते चालू केलेले असताना, तुम्हाला तुमच्या Apple अकाउंमध्ये साइन इन करण्यासाठी तुमचा Apple अकाउंट पासवर्ड आणि सहा अंकी पडताळणी कोड ह्या दोन्हीची आवश्यकता असते. पडताळणी कोड तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित फोन नंबरवर पाठवला जातो किंवा तुमच्या विश्वासार्ह डिव्हाइसवर डिस्प्ले केला जातो.

नोट : कदाचित काही अकाउंट प्रकार टू फॅक्टर ऑथेंटिकेशनला सपोर्ट करत नाहीत. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही. तुमच्या Apple अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची उपलब्धता ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

  3. ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वर टॅप करा.

  4. विश्वासार्ह फोन नंबर (पडताळणी कोड प्राप्त करण्यासाठी तुम्ही वापरणार असलेला नंबर) प्रविष्ट करा, त्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

    तुमच्या विश्वासार्ह फोन नंबरवर पडताळणी कोड पाठवला जातो.

  5. तुमच्या iPhone वर पडताळणी कोड प्रविष्ट करा.

    तुमच्या Apple अकाउंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केले गेले आहे, आणि तुमचा iPhone आता एक विश्वासार्ह डिव्हाइस आहे.

दुसरे विश्वासार्ह डिव्हाइस समाविष्ट करणे

तुम्ही तुमच्या iPhone वर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केल्यानंतर, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये इतर विश्वासार्ह डिव्हाइस समाविष्ट करू शकता.

  1. तुम्हाला समाविष्ट करायचे असलेल्या डिव्हाइसवर, तुम्ही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करण्यासाठी वापरलेल्या त्याच Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

  2. प्रॉम्प्ट केल्यावर, तुमच्या iPhone, दुसरे विश्वासार्ह डिव्हाइस, विश्वासार्ह फोन नंबर किंवा तुमच्या Mac वर दिसणारा सहा अंकी पडताळणी कोड प्रविष्ट करा.

  3. नवीन डिव्हाइसवर पडताळणी कोड प्रविष्ट करा.

    जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे साइन आउट करत नाही, तुमचे डिव्हाइस इरेझ करत नाही, वेब ब्राउझरमध्ये तुमच्या Apple अकाउंट पृष्ठावर साइन इन करत नाही किंवा सुरक्षेच्या कारणास्तव तुमचा Apple अकाउंट पासवर्ड बदलण्याची आवश्यकता नाही, तोपर्यंत तुम्हाला पुन्हा पडताळणी कोडसाठी विचारले जाणार नाही.

विश्वासार्ह फोन नंबर समाविष्ट करणे किंवा काढून टाकणे

जर तुम्हाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरायचे असेल, परंतु तुम्ही ते चालू करताना समाविष्ट केलेला फोन नंबर ॲक्सेस करू शकत नसाल, तर विश्वासार्ह फोन नंबर समाविष्ट करणे उपयुक्त ठरू शकते.

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा, त्यानंतर ’साइन इन व सुरक्षा’ वर टॅप करा.

  3. ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • नंबर समाविष्ट करा : ‘विश्वासार्ह फोन नंबर समाविष्ट करा’ वर टॅप करा, त्यानंतर फोन नंबर प्रविष्ट करा.

    • नंबर काढून टाका : फोन नंबरच्या पुढे हटवा बटण वर टॅप करा.

  5. तुम्ही बदल करणे पूर्ण केल्यावर, ’पूर्ण’ वर टॅप करा.

विश्वासार्ह फोन नंबर ऑटोमॅटिकली पडताळणी कोड प्राप्त करत नाहीत. टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी नवीन डिव्हाइस सेट अप करताना तुम्ही कोणतेही विश्वासार्ह डिव्हाइस ॲक्सेस करू शकत नसल्यास, “पडताळणी कोड मिळाला नाही का?” वर टॅप करा. नवीन डिव्हाइसवर, नंतर पडताळणी कोड प्राप्त करण्यासाठी तुमच्या विश्वासार्ह फोन नंबरपैकी एक निवडा.

विश्वासार्ह डिव्हाइस बघणे किंवा काढून टाकणे

  1. तुमच्या iPhone वरील सेटिंग ॲपवर जा.

  2. तुमच्या नावावर टॅप करा.

    तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित डिव्हाइसची यादी स्क्रीनच्या तळाशी दिसते.

  3. डिव्हाइस काढून टाकण्यासाठी, त्यावर टॅप करा, त्यानंतर ‘अकाउंटमधून काढून टाका’ वर टॅप करा.

    जर तुम्ही विश्वासार्ह डिव्हाइस काढून टाकले, तर ते ह्यापुढे पडताळणी कोड डिस्प्ले करू शकणार नाही आणि त्याचा iCloud (आणि डिव्हाइसवरील इतर Apple सेवा) चा ॲक्सेस ब्लॉक केला जाईल. हे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी, पुन्हा तुमच्या Apple अकाउंटवर साइन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.

तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करणाऱ्या ॲपसाठी पासवर्ड उत्पन्न करणे

टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करून थर्ड पार्टी ॲप किंवा सेवेतून (उदाहरणार्थ ईमेल, संपर्क किंवा दिनदर्शिका ॲप) तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी, ॲप विशिष्ट पासवर्ड उत्पन्न करा.

  1. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करा.

  2. ‘ॲप विशिष्ट पासवर्ड’ वर टॅप करा, त्यानंतर “ॲप विशिष्ट पासवर्ड उत्पन्न करा” वर टॅप करा.

  3. ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुम्ही तुमचा ॲप विशिष्ट पासवर्ड उत्पन्न केल्यानंतर, तो नेहमीप्रमाणे ॲपच्या पासवर्ड फील्डमध्ये प्रविष्ट करा किंवा पेस्ट करा.

अधिक माहितीसाठी, ॲप विशिष्ट पासवर्ड वापरून तुमच्या Apple अकाउंटसह ॲपमध्ये साइन इन करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.