ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

व्हिजनसाठी CarPlay ॲक्सेसिबिलिटी सेटिंग ॲडजस्ट करणे

व्हिजनसाठी CarPlay ॲक्सेसिबिलिटी फीचरसह, तुम्ही CarPlay टचस्क्रीनवर टेक्स्ट वाचणे आणि रंग वेगळे करणे सोपे करू शकता.

नोट : CarPlay सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. iOS आणि iPadOS फीचर उपलब्धता संकेतस्थळ पहा.

डिस्प्लेचे रंग फिल्टर करणे

CarPlay टचस्क्रीनवर रंग वेगळे करणे सोपे करण्यासाठी, तुम्ही रंग दृष्टी कमतरतेसाठी फिल्टर लागू करू शकता किंवा संपूर्ण स्क्रीन ग्रेस्केलमध्ये पाहू शकता.

  1. CarPlay मध्ये, सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ’कलर फिल्टर्स’ वर टॅप करा.

  3. ‘कलर फिल्टर्स’ सुरू करा.

  4. ‘फिल्टर’ वर टॅप करा. फिल्टरची तीव्रता बदलण्यासाठी, ’कमी’, ‘मध्यम’ किंवा ‘उच्च’ वर टॅप करा.

टेक्स्टचा आकार बदलणे

  1. CarPlay मध्ये, सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ’टेक्स्टचा आकार’ वर टॅप करा.

  3. टेक्स्ट आकारावर टॅप करा. तुम्ही प्रत्येक नंबरच्या खाली टेक्स्टच्या आकाराचे प्रिव्ह्यू पाहू शकता.

टेक्स्ट ठळक करणे

CarPlay टचस्क्रीनवर काय आहे हे वाचणे सोपे करण्यासाठी ‘बोल्ड टेक्स्ट’ चालू करा.

  1. CarPlay मध्ये, सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ’बोल्ड टेक्स्ट’ सुरू करा.

व्हॉइस कमांडसह CarPlay नियंत्रित करणे

तुम्ही तुमच्या iPhone च्या मायक्रोफोनचा वापर व्हॉइस कमांड्सने CarPlay नियंत्रित करण्यासाठी करू शकता.

  1. CarPlay मध्ये, सेटिंग ॲपवर जा.

  2. ’ॲक्सेसिबिलिटी’ वर टॅप करा, त्यानंतर ’व्हॉइस कंट्रोल’ सुरू करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.