ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ॲप लायब्ररीमध्ये तुमचे ॲप शोधणे आणि वापरणे

ॲप लायब्ररी तुमची ॲप सामाजिक, मनोरंजन व उत्पादकता व वित्त ह्यासारख्या श्रेणींमध्ये व्यवस्थापित केलेले दाखवते. तुम्ही सर्वाधिक वापरत असलेले ॲप स्क्रीनच्या वरच्या बाजूला जवळ आणि त्यांच्या श्रेणीच्या वरच्या स्तरावर असतात, त्यामुळे तुम्ही ते सहजपणे शोधू आणि उघडू शकता.

iPhone वरील ॲप लायब्ररी श्रेणीनुसार व्यवस्थापित केलेले ॲप दाखवते (यूटिलिटी, सामाजिक, मनोरंजन इत्यादी).

नोट : तुम्ही तुमच्या ॲपचा वापर कसा करता ह्या आधारावर ॲप लायब्ररीमधील ॲप बुद्धिपूर्वक श्रेणीमध्ये व्यवस्थापित केले जातात. तुम्ही ॲप लायब्ररीमधील ॲप होम स्क्रीनवर समाविष्ट करू शकता, परंतु तुम्ही त्यांना ॲप लायब्ररीमध्ये दुसऱ्या श्रेणीमध्ये मूव्ह करू शकत नाही.

ॲप लायब्ररीमध्ये ॲप शोधणे आणि उघडणे

  1. होम स्क्रीनवर जा, नंतर ॲप लायब्ररीमध्ये जाण्यासाठी तुमच्या सर्व होम स्क्रीन पृष्ठांच्या मागे डावीकडे स्वाइप करा.

  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी असलेल्या ‘सर्च फिल्ड’ वर टॅप करा, नंतर तुम्ही सर्च करत असलेल्या ॲपचे नाव प्रविष्ट करा. किंवा वर्णमाला यादी ब्राउझ करण्यासाठी वर आणि खाली स्क्रोल करा.

  3. ॲप उघडण्यासाठी, त्यावर टॅप करा.

श्रेणीमध्ये काही लहान ॲप आयकॉन असल्यास, तुम्ही श्रेणी वाढवण्यासाठी आणि त्यातील सर्व ॲप पाहण्यासाठी त्यांना टॅप करू शकता.

होम स्क्रीन पृष्ठे लपवणे आणि दाखवणे

तुम्हाला तुमचे सर्व ॲप ‘ॲप लायब्ररी’ मध्ये सापडू शकतात, त्यामुळे तुम्हाला कदाचित ॲपसाठी जास्त होम स्क्रीन पृष्ठांची गरज भासणार नाही. तुम्ही काही होम स्क्रीन पृष्ठे लपवू शकता, जे ॲप लायब्ररीला तुमच्या पहिल्या होम स्क्रीन पृष्ठाच्या जवळ आणतात. (जेव्हा तुम्हाला लपवलेली पृष्ठे पुन्हा पहायची असतील, तेव्हा तुम्ही त्यांना दाखवू शकता.)

  1. होम स्क्रीनवर जा, नंतर ॲप आयकॉन हलणे सुरू होईपर्यंत होम स्क्रीनच्या वॉलपेपरवर टच आणि होल्ड करा.

  2. स्क्रीनच्या खाली असलेल्या डॉटवर टॅप करा.

    तुमच्या होम स्क्रीन पृष्ठांच्या थंबनेल इमेज खाली चेकमार्कसह दिसतात.

  3. पृष्ठे लपवण्यासाठी, ‘चेकमार्क काढून टाका’ वर टॅप करा.

    लपवलेली पृष्ठे दाखवण्यासाठी, ‘चेकमार्क समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  4. ‘झाले’ वर टॅप करा (iPhone वर Face ID ने) किंवा होम बटण दाबा (इतर iPhone मॉडेलवर).

अतिरिक्त होम स्क्रीन पृष्ठे लपवल्यास, तुम्ही फक्त एक किंवा दोन स्वाइपसह होम स्क्रीनच्या पहिल्या पृष्ठावरून ॲप लायब्ररीमध्ये (आणि मागे) जाऊ शकता.

नोट : जेव्हा होम स्क्रीन पृष्ठे लपवली जातात, तेव्हा तुम्ही App Store वरून डाउनलोड केलेली नवीन ॲप होम स्क्रीनऐवजी ॲप लायब्ररीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.

होम स्क्रीन पृष्ठे रिऑर्डर करणे

तुमच्याकडे अनेक होम स्क्रीन पृष्ठे असल्यास, तुम्ही त्यांची क्रमवारी बदला. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे आवडती ॲप एका होम स्क्रीन पृष्ठावर एकत्रित करू शकता आणि नंतर ते तुमचे पहिले होम स्क्रीन पृष्ठ बनवू शकता.

  1. होम स्क्रीनवर जा, नंतर ॲप आयकॉन हलणे सुरू होईपर्यंत होम स्क्रीनच्या वॉलपेपरवर टच आणि होल्ड करा.

  2. स्क्रीनच्या खाली असलेल्या डॉटवर टॅप करा.

    तुमच्या होम स्क्रीन पृष्ठांच्या थंबनेल इमेज खाली चेकमार्कसह दिसतात.

  3. प्रत्येक होम स्क्रीन पृष्ठ मूव्ह करण्यासाठी, पृष्ठाला टच आणि होल्ड करा, नंतर त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.

  4. ‘झाले’ वर दोन वेळा टॅप करा (iPhone वर Face ID ने) किंवा होम बटण दोन वेळा दाबा (इतर iPhone मॉडेलवर).

नवीन ॲप जिथे डाउनलोड केले जातात ते बदलणे

जेव्हा तुम्ही App Store वरून नवीन ॲप डाउनलोड करता, तेव्हा तुम्ही त्यांना ‘होम स्क्रीन’ आणि ‘ॲप लायब्ररी’ किंवा फक्त ‘ॲप लायब्ररी’ मध्ये समाविष्ट करू शकता.

  1. सेटिंग  > ‘होम स्क्रीन व ॲप लायब्ररी’ वर जा.

  2. ‘केवळ होम स्क्रीन किंवा ॲप लायब्ररीमध्ये समाविष्ट करा’ निवडा.

नोट : ॲप लायब्ररीमधील ॲपवर ‘ॲप नोटिफिकेशन बॅज’ दिसण्याची अनुमती देण्यासाठी, ‘ॲप लायब्ररीमध्ये दाखवा’ चालू करा.

ॲप लायब्ररीमधून होम स्क्रीनवर ॲप मूव्ह करणे

तुम्ही ‘ॲप लायब्ररी’ मध्ये ॲप डाउनलोड केल्यास, तुम्ही ते सहजपणे ‘होम स्क्रीन’ वर मूव्ह करू शकता.

  1. ॲप लायब्ररीवर जा.

  2. ॲप आयकॉन हलायला लागेपर्यंत आणि ॲप होम स्क्रीनवर मूव्ह होईपर्यंत ॲपवर टच आणि होल्ड करा, नंतर तुमचे बोट वर उचला.

हे देखील पहाiPhone वर ॲप उघडणे
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.