iPhone वर अपत्याच्या ‘स्क्रीन टाइम’ विनंतीला प्रतिसाद देणे

‘स्क्रीन टाइम’ पालकांना त्यांच्या मुलांनी डिव्हाइसेसवर घालवलेला वेळ, ते कोणते ॲप्स वापरतात आणि ते कोणत्या लोकांशी संवाद साधू शकतात हे मॅनेज करण्यास मदत करतो. आणि जेव्हा ते तुम्ही सेट केलेल्या मर्यादेपर्यंत पोहोचतात तेव्हा ते त्यांना विनंती करण्याची अनुमती देते. उदाहरणार्थ :

  • तुम्ही ’डाउनटाइम’ किंवा ‘ॲप मर्यादा’ सुरू केले असल्यास, ते तुम्हाला त्यांच्या वेळेच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर अधिक वेळेची अनुमती देण्यास सांगू शकतात.

  • जर तुम्ही त्यांच्या ‘संपर्क मर्यादा’ सेट केल्या असतील जेणेकरून ते केवळ त्यांच्या संपर्क यादीतील लोकांशीच संवाद साधू शकतील, तर ते यादीमध्ये नवीन संपर्क समाविष्ट करण्यास सांगू शकतात.

    नोट : जर ॲपने आवश्यक असलेल्या तांत्रिक आवश्यकता स्वीकारल्या असतील, तर तुमचे अपत्य ॲपमधील लोकांशी संवाद साधण्याची विनंती करू शकेल.

तुमचे अपत्य ‘स्क्रीन टाइम’ व्यतिरिक्त इतर विनंत्या देखील करू शकते. तुम्ही ‘खरेदीसाठी विचारा’ सेट अप केल्यास, तुमचे अपत्य ॲप डाउनलोड करण्याची, शेअर केलेले ॲप पुन्हा डाउनलोड करण्याची किंवा App Store, iTunes Store किंवा Apple Books मधून आयटम खरेदी करण्याची परवानगी मागू शकते. ते त्यांच्या सध्याच्या वय श्रेणीपेक्षा जास्त वय मर्यादा असलेले ॲप अपवाद म्हणून खरेदी किंवा डाउनलोड करण्यासाठी सांगू शकतात. ‘खरेदीसाठी विचारा’ सेट अप करण्यासाठी किंवा ह्या विनंत्या हाताळण्यासाठी, अपत्यासाठी ‘खरेदीसाठी विचारा’ चालू करा आणि अपत्याच्या अपवाद विनंतीला प्रतिसाद देणे पहा.

’अधिक वेळेसाठी विनंत्या करा’ साठी विभाग दाखवणारी, ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटातील अपत्यासाठी असलेली स्क्रीन.

अपत्याच्या डिव्हाइसवर थेट त्यांच्या ‘स्क्रीन टाइम’ विनंतीला प्रतिसाद देणे

  1. अपत्याच्या डिव्हाइसवर, संबंधित ॲप उघडा, त्यानंतर विनंती सुरू करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा किंवा टॅप करा. (उदाहरणार्थ, ’अधिक वेळ मागा’ वर क्लिक किंवा टॅप करा.)

  2. ’स्क्रीन टाइम पासकोड प्रविष्ट करा’ वर क्लिक किंवा टॅप करा, त्यानंतर ’स्क्रीन टाइम पासकोड’ प्रविष्ट करा.

  3. ‘मान्यता द्या’ किंवा ‘नाकारा’ पर्यायावर क्लिक किंवा टॅप करा.

तुमच्या iPhone वर अपत्याच्या ‘स्क्रीन टाइम’ विनंतीला प्रतिसाद देणे

तुमच्या iPhone वर तुम्ही अपत्याच्या विनंतीला मान्यता देऊ शकता—जसे की ॲपवर अधिक वेळ घालवण्याची विनंती.

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग ॲपवर  जा.

  2. ’स्क्रीन टाइम’ वर टॅप करा, त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर टॅप करा. (कदाचित तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.)

  3. तुमच्या अपत्याने विनंती केलेली असल्यास, ॲप्सची यादी दिसेल. अपत्याच्या विनंत्यांच्या खालील ॲपवर टॅप करा, त्यानंतर ‘स्क्रीन टाइम’ पासकोड प्रविष्ट करा.

  4. विनंतीनुसार, पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • 15 मिनिटांसाठी मान्यता द्या : ’15 मिनिटांसाठी मान्यता द्या’ वर टॅप करा.

    • 1 तासासाठी मान्यता द्या : ‘एक तासासाठी मान्यता द्या’ वर टॅप करा.

    • उर्वरित दिवसासाठी मान्यता द्या : ’पूर्ण दिवसासाठी मान्यता द्या’ वर टॅप करा.

    • विनंती मान्य करा. ’विनंती मान्य करा’ वर टॅप करा.

    • विनंती नाकारा : ’मान्यता देऊ नका’ वर टॅप करा.

तुम्ही थेट नोटिफिकेशन्स आणि ‘संदेश’ ॲपमधून देखील विनंत्यांना मान्यता देऊ शकता किंवा त्या नाकारू शकता. नोटिफिकेशन किंवा संदेशामध्ये, ‘मान्यता द्या’ किंवा ‘नाकारा’ वर क्लिक करा (किंवा पर्याय निवडण्यासाठी ‘पर्याय’ पॉप अप मेन्यूवर क्लिक करा).

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.