iPhone वर ‘नकाशा’ ॲपमध्ये ‘भेट दिलेली ठिकाणे’ बघणे आणि मॅनेज करणे

‘भेट दिलेली ठिकाणे’ फीचर तुम्हाला तुम्ही भेट दिलेली ठिकाणे ट्रॅक करण्यास मदत करते, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणांना नंतर सहजपणे पुन्हा भेट देऊ शकता किंवा शेअर करू शकता. अलीकडील सहलीतील रेस्टॉरंट्स किंवा तत्सम आधी भेट दिलेली अन्य ठिकाणे शोधण्यासाठी ह्याचा वापर करा—आणि त्यांना गाइड्समध्ये व्यवस्थापित करा किंवा इतरांसह शेअर करा. ‘भेट दिलेली ठिकाणे’ एंड टू एंड एनक्रिप्ट केलेली असतात, ती Apple द्वारे वाचली जाऊ शकत नाहीत आणि तुमच्या सिंक केलेल्या सर्व डिव्हाइसेसवर दिसतात.

नोट : ‘भेट दिलेली ठिकाणे’ सर्व देश किंवा प्रदेशांमध्ये उपलब्ध नाही.

‘नकाशा’ ॲपमधील ‘भेट दिलेली ठिकाणे’ स्क्रीन. स्क्रीनवरील कार्डमध्ये तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांच्या श्रेणीची यादी आहे—जसे की परिवहन, शॉपिंग, उद्योग—आणि ते प्रत्येकाला दिलेल्या भेटींची संख्या दर्शवते.

‘भेट दिलेली ठिकाणे’ सुरू करा

जेव्हा तुम्ही ‘नकाशा’ ॲप उघडता, तेव्हा तुम्हाला ‘भेट दिलेली ठिकाणे’ सुरू करण्यास सांगितले जाऊ शकते. असे नसेल तर,

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर ‘नकाशा’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘स्थान’ वर टॅप करा, त्यानंतर ‘अचूक स्थान’ आणि ‘भेट दिलेली ठिकाणे’ सुरू करा.

  4. ‘सेटिंग’ ॲपवर परत जा, त्यानंतर ‘गोपनीयता व सुरक्षा’ वर टॅप करा.

  5. ‘स्थान सेवा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘स्थान सेवा’ सुरू करा.

  6. ‘सिस्टीम सेवा’ वर टॅप करा, ‘महत्त्वाची स्थाने व मार्ग’ वर टॅप करा, त्यानंतर ‘महत्त्वाची स्थाने व मार्ग’ सुरू करा.

भेट दिलेले ठिकाण बघणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. ‘ठिकाणे’ वर टॅप करा, ‘भेट दिलेली ठिकाणे’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतीही एक कृती करा :

    • सर्च : नाव, श्रेणी, पत्ता किंवा नोट्सनुसार ठिकाण सर्च करा.

    • फिल्टर करा : दिनांक, श्रेणी किंवा शहरासाठी फिल्टर वापरून सर्च करा.

    • सर्व भेटी दाखवा : ‘सर्व भेटी’ वर टॅप करा.

भेट दिलेले ठिकाण मॅनेज करणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. ’ठिकाणे’ वर टॅप करा, नंतर ’भेट दिलेली ठिकाणे’ वर टॅप करा.

  3. ठिकाणाच्या पुढे, ‘अधिक’ (प्लेस कार्डच्या उजव्या बाजूला) वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी एक कृती करा :

    • तुमच्या ’ठिकाणे’ मध्ये समाविष्ट करा : ’ठिकाणांमध्ये समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • भेट दिलेले ठिकाण शेअर करा : ’शेअर करा’ वर टॅप करा.

    • वैयक्तिक नोट समाविष्ट करा : ’नोट समाविष्ट करा’ वर टॅप करा.

    • भेट दिलेले ठिकाण दुरुस्त करणे : ’चुकीचे स्थान’ वर टॅप करा.

    • भेट दिलेले ठिकाण काढून टाका : ’काढून टाका’ वर टॅप करा.

’नकाशा’ तुमची भेट दिलेली ठिकाणे किती काळ ठेवतो, ते बदलणे

तुम्ही फीचर सेट अप करता तेव्हा तुम्ही भेट दिलेली ठिकाणे जतन करण्यासाठी कालावधी निवडल्यास, तुम्ही कधीही त्यात बदल करू शकता.

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. ’ठिकाणे’ वर टॅप करा, नंतर ’भेट दिलेली ठिकाणे’ वर टॅप करा.

  3. खाली स्क्रोल करा, ’भेटी ठेवा’ वर टॅप करा, त्यानंतर कालावधी निवडा.

तुमची भेट दिलेल्या ठिकाणांची हिस्ट्री क्लिअर करणे

  1. तुमच्या iPhone वरील नकाशा ॲपवर जा.

  2. ’ठिकाणे’ वर टॅप करा, नंतर ’भेट दिलेली ठिकाणे’ वर टॅप करा.

  3. खाली स्क्रोल करा, त्यानंतर ’हिस्ट्री क्लिअर करा’ वर टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.