ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘छायाचित्र’ ॲपमध्ये लोक, आठवणी आणि सुट्ट्या लपवणे

तुम्ही तुमच्या आठवणी, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आणि ‘छायाचित्र’ विजेटमध्ये विशिष्ट लोक, दिवस आणि सुट्ट्या कमी वेळा दाखवण्यासाठी किंवा अजिबात न दाखवण्यासाठी ‘छायाचित्र’ ॲप सेट करू शकता. तुम्ही तुमच्या iPhone ‘होम स्क्रीन’ वरील विजेट आणि छायाचित्र ॲपमध्ये आठवणी आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे देखील बंद करू शकता.

एखादी व्यक्ती कमी वेळा दाखवणे किंवा अजिबात न दाखवणे

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. जी व्यक्ती तुम्हाला कमी वेळ दाखवायची आहे त्या व्यक्तीचे छायाचित्र उघडा.

  3. अधिक बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ह्या व्यक्तीला फीचर करू नका’ वर टॅप करा.

    छायाचित्रात एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास, तुम्हाला कमी फीचर करायचे असलेल्या व्यक्तीला टॅप करा, त्यानंतर ’पुढील’ वर टॅप करा.

  4. ’ह्या व्यक्तीला कमी फीचर करा’ किंवा ‘ह्या व्यक्तीला कधीही फीचर करू नका’ हे निवडा.

  5. ‘पुष्टी करा’ वर टॅप करा.

कोणत्याही व्यक्तीला पुन्हा फीचर करण्यासाठी, ‘संग्रह’ वर टॅप करा, वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या अकाउंटवर टॅप करा, त्यानंतर ‘लोक व पाळीव प्राण्यांबद्दलच्या सूचना रीसेट करा’ वर टॅप करा.

आठवणी, सुट्ट्या, आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेण्ट बंद करणे

तुम्ही ‘छायाचित्र’ ॲपमध्ये आठवणी किंवा वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे बंद करू शकता आणि तुमच्या मूळ देशातील किंवा प्रदेशातील सुट्टीच्या इव्हेंट्सच्या आठवणी किंवा वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेण्टमध्ये दिसण्यापासून रोखू शकता.

  1. तुमच्या iPhone वर छायाचित्र ॲपवर जा.

  2. ’संग्रह’ वर टॅप करा.

  3. वरच्या उजव्या कोपऱ्यात तुमच्या अकाउंटवर टॅप करा.

  4. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेंट आणि आठवणी लपवा : वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आणि आठवणी ऑटोमॅटिकली उत्पन्न करण्यापासून ’छायाचित्र’ ला रोखण्यासाठी ’वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेंट दाखवा’ बंद करा.

    • सुट्टीचे इव्हेंट बंद करा : ‘छायाचित्र’ ला आठवणी आणि सुट्ट्यांबद्दल वैशिष्ट्यपूर्ण कॉण्टेंट तयार करण्यापासून रोखण्यासाठी ‘सुट्टीचे इव्हेंट दाखवा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.