iPhone वर ‘शॉर्टकट’ ॲपमध्ये Apple Intelligence वापरणे

तुम्ही Apple Intelligence सह पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली शॉर्टकट्स तयार करू शकता. * शॉर्टकट्समधील इंटेलिजंट ॲक्शन्स टेक्स्ट सारांशित करू शकतात, इमेजेस तयार करू शकतात किंवा तुमच्या शॉर्टकटमध्ये फीड केलेले प्रतिसाद प्रदान करण्यासाठी Apple Intelligence किंवा एक्सटेंशन मॉडेल्समध्ये थेट टॅप करू शकतात.

नोट : Apple Intelligence सर्व iPhone मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. ** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची आणि Apple Intelligence सुरू केलेले असल्याची खात्री करा.

Apple Intelligence शॉर्टकट्स शोधा

जर तुम्ही तुमच्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी नवीन शॉर्टकट्स शोधत असाल, किंवा तुम्हाला काय शक्य आहे आणि विशिष्ट Apple Intelligence शॉर्टकट्स कसे तयार केले गेले आहेत हे पाहायचे असेल, तर ‘शॉर्टकट’ गॅलरीमधील Apple Intelligence श्रेणी पहा.

  1. तुमच्या iPhone वर ‘शॉर्टकट’ ॲपवर जा.

  2. ‘गॅलरी’ वर टॅप करा, नंतर तुमच्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी Apple Intelligence श्रेणीतील शॉर्टकटवर ’शॉर्टकट तयार करा’ बटण वर टॅप करा.

कस्टम शॉर्टकट्स तयार करण्यासाठी मॉडेल वापरा

तुम्ही Apple Intelligence मॉडेल वापरून तुमच्या स्वतःचे कस्टम शॉर्टकट्स तयार करू शकता—हे मॉडेल तुमच्या डिव्हाइसवर किंवा ‘प्रायव्हेट क्लाउड कंप्यूट’ वर आधारित असू शकते—किंवा तुमच्या शॉर्टकट्समधील साध्या किंवा क्लिष्ट विनंत्या हाताळण्यासाठी ChatGPT वापरू शकता. तुम्ही कृतीला इनपुट प्रदान करण्यासाठी, कृतीचे आउटपुट पार्स करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी मॉडेलचा वापर करू शकता.

तुम्ही तीन मॉडेल्समधून निवड करू शकता :

  • ऑन डिव्हाइस : नेटवर्क कनेक्शनची गरज नसताना साध्या विनंत्या हाताळण्यासाठी ऑन डिव्हाइस Apple Intelligence मॉडेलचा वापर केला जातो.

  • प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट : तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करताना क्लिष्ट विनंत्या हाताळण्यासाठी Apple च्या ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ चा वापर केला जातो.

  • एक्सटेंशन मॉडेल : तुमच्या विनंत्या हाताळण्यासाठी ChatGPT चा वापर केला जातो.

सुरू करण्यासाठी, पुढीलप्रमाणे काहीतरी वापरून पहा :

  1. तुमच्या iPhone वर ‘शॉर्टकट’ ॲपवर जा.

  2. ’शॉर्टकट तयार करा’ बटण वर टॅप करा.

    टिप : Apple Intelligence श्रेणीवर टॅप करा, त्यानंतर विशिष्ट इंटेलिजंट ॲक्शन निवडा.

  3. कृती सर्च करा, नंतर ती तुमच्या शॉर्टकटमध्ये समाविष्ट करण्यासाठी टॅप करा.

    उदाहरणार्थ, ’सध्याचे हवामान प्राप्त करा’ साठी सर्च करा, त्यानंतर त्यावर टॅप करा. जर ‘शॉर्टकट’ तुम्हाला तुमच्या स्थानावर ॲक्सेस करण्यासाठी प्रॉम्प्ट करत असेल, तर ‘ॲक्सेसला अनुमती द्या’ वर टॅप करा.

  4. ‘मॉडेल वापरा’ कृती सर्च करा, त्यानंतर मॉडेल निवडा.

    उदाहरणार्थ, ऑन डिव्हाइस निवडा.

  5. ’मॉडेल वापरा’ च्या खाली असलेल्या टेक्स्ट फील्डमध्ये, तुमचा प्रॉम्प्ट प्रविष्ट करा.

    उदाहरणार्थ, ‘आजच्या हवामानाचा इमोजीसह संक्षिप्त, मजेदार सारांश लिहा’ प्रविष्ट करा.

    तुम्हाला तुमची विनंती अधिक सुधारण्यासाठी मॉडेलबरोबर संवाद साधता यावा असे वाटत असल्यास, ‘मॉडेल वापरा’ च्या बाजूला असलेल्या बाणावर टॅप करा, त्यानंतर ‘फॉलो अप चेकबॉक्स’ वर टॅप करा.

  6. दुसरी कृती समाविष्ट करण्यासाठी, ती सर्च करा, त्यानंतर ती समाविष्ट करण्यासाठी त्यावर टॅप करा.

    उदाहरणार्थ, ‘कॉण्टेण्ट दाखवा’ सर्च करा, त्यावर टॅप करा, त्यानंतर ‘प्रतिसाद’ सिलेक्ट करा.

  7. तुमच्या नवीन शॉर्टकटची चाचणी घेण्यासाठी, ‘प्ले करा’ बटण वर टॅप करा.

तुमचा शॉर्टकट ऑटोमॅटिकली जतन केला जातो. तुम्ही तुमचा शॉर्टकट रन करू शकता अशा विविध मार्गांबद्दल जाणून घेण्यासाठी, iPhone किंवा iPad वर दुसऱ्या ॲपमधून शॉर्टकट लॉंच करा पहा.

इनपुट, फॉलो अप आणि आउटपुट बद्दल अधिक जाणून घ्या

‘मॉडेल वापरा’ कृती वापरण्याबद्दल काही तपशील येथे दिले आहेत :

  • मॉडेल्समधील टेक्स्ट इनपुटमध्ये चले, मागील कृतींमधील आउटपुट, दिनदर्शिका इव्हेंट्स, रिमाइंडर्स, छायाचित्रे आणि बरेच काही समाविष्ट असू शकते.

  • तुम्ही ‘फॉलो अप’ सिलेक्ट केल्यास, तुम्ही शॉर्टकट रन केल्यावर, ते तुम्हाला मॉडेलचा प्रतिसाद दाखवते आणि अंतिम प्रतिसाद पुढील कृतीला पास केला जाण्याआधी तुम्हाला तुमचा इनपुट सुधारण्याची अनुमती देते. उदाहरणार्थ, तुम्ही अतिरिक्त विनंत्या करू शकता किंवा अधिक माहिती देऊ शकता.

  • ज्या कृतींमध्ये आउटपुट प्रतिसाद पास केले गेले आहेत त्यांच्यासाठी ते ऑटोमॅटिकली ऑप्टिमाइझ केले जातात. तुम्ही प्रतिसाद कसा आउटपुट केला जातो हे देखील उल्लेखित करू शकता : तुम्ही ‘मॉडेल वापरा’ कृती समाविष्ट करता, तेव्हा ‘आउटपुट’ पॉप अप मेन्यूवर टॅप करा आणि पर्याय निवडा.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेलचा वापर करते आणि आउटपुट बदलू शकतात. अचूकतेसाठी महत्त्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.