ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘पॉडकास्ट’ साठी तुमचे डाउनलोड सेटिंग बदलणे

तुम्ही फॉलो केलेले पॉडकास्ट तुमच्या Apple डिव्हाइसवर ऑटोमॅटिकली डाउनलोड केले जातात. तुम्ही प्ले केलेले एपिसोड तुमच्या डिव्हाइसवरून ऑटोमॅटिकली हटवले जातात. तुम्ही ही सेटिंग बदलू शकता आणि इतर डाउनलोड पर्याय ॲडजस्ट करू शकता.

‘ऑटोमॅटिक डाउनलोड’ चालू किंवा बंद करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर, ‘पॉडकास्ट’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘ऑटोमॅटिकली डाउनलोड करा’ वर टॅप करा, त्यानंतर पर्यायावर टॅप करा.

टिप : विशिष्ट पॉडकास्टमधून एपिसोडस ऑटोमॅटिकली डाउनलोड करण्यासाठी, ‘पॉडकास्ट’ ॲप वर जा, ‘लायब्ररी’ वर टॅप करा, नंतर ’शो’ वर टॅप करा. शोवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’सेटिंग’ वर टॅप करा. ऑटोमॅटिक डाउनलोड्सना ठराविक संख्येच्या एपिसोड्स किंवा टाइमफ्रेमपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ‘ऑटोमॅटिकली डाउनलोड करा’ वर टॅप करा. व्हिडिओ डाउनलोड करायचा की नाही हे निवडण्यासाठी ‘व्हिडिओ डाउनलोड करा’ वर टॅप करा.

तुम्ही पॉडकास्ट पाहिल्या किंवा ऐकल्यानंतर डाउनलोड केलेले पॉडकास्ट काढून टाकणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर, ‘पॉडकास्ट’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘प्ले केलेले डाउनलोड काढून टाका’ चालू करा.

    तुम्ही फॉलो करत असलेल्या विशिष्ट पॉडकास्टसाठी हे सेटिंग ॲडजस्ट करण्यासाठी, ‘लायब्ररी’ वर टॅप करा, ’शोज’ वर टॅप करा, त्यानंतर ‘शो’ वर टच आणि होल्ड करा. सेटिंगवर टॅप करा, त्यानंतर ‘प्ले केलेले डाउनलोड काढून टाका’ चालू करा.

ऑटोमॅटिक डाउनलोड्स पुन्हा सुरु करणे

जर तुम्ही काही काळापासून फॉलो करत असलेला शो पाहिला किंवा ऐकला नसेल, तर नवीन एपिसोड ऑटोमॅटिकली डाउनलोड होणे थांबते. तुम्ही कोणत्याही क्षणी ऑटोमॅटिक डाउनलोड्स पुन्हा सुरु करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर ‘पॉडकास्ट’ ॲपमध्ये वर जा.

  2. ’लायब्ररी’ वर टॅप करा, ’शो’ वर टॅप करा, त्यानंतर शोवर टॅप करा.

  3. ’ऑटोमॅटिक डाउनलोड पुन्हा सुरू करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’ऑटोमॅटिक डाउनलोड्स सुरू करा’ वर टॅप करा.

Apple डिव्हाइसवर ऑटोमॅटिक सिंकिंग बंद करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘ॲप्स’ वर टॅप करा, त्यानंतर, ‘पॉडकास्ट’ ॲपवर टॅप करा.

  3. ‘लायब्ररी सिंक करा’ बंद करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.