ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वरील ‘फाइल’ ॲपमध्ये फाइल्स आणि फोल्डर्स शोधणे आणि बघणे

फाइल ॲपमध्ये, तुम्ही तुमची डॉक्युमेंट, इमेज आणि इतर फाइल सर्च करू शकता आणि बघू शकता.

विशिष्ट फाइल किंवा फोल्डर शोधणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. ‘सर्च’ फील्डमध्ये फाइलचे नाव, फोल्डरचे नाव किंवा डॉक्युमेंटचा प्रकार प्रविष्ट करा.

    जेव्हा तुम्ही सर्च करता, तेव्हा तुमच्याकडे हे पर्याय असतात :

    • तुमच्या सर्चच्या व्याप्तीवर फोकस करा : ‘सर्च’ फील्डखाली, ‘अलीकडील’ किंवा स्थान किंवा टॅगचे नाव ह्यावर टॅप करा.

    • कीबोर्ड लपवा आणि स्क्रीनवर अधिक परिणाम पहा : ‘सर्च करा’ वर टॅप करा.

    • नवीन सर्च सुरू करा : सर्च फील्डमध्ये ‘टेक्स्ट क्लिअर करा’ बटण वर टॅप करा.

    • परिणाम उघडा : त्यावर टॅप करा.

फाइल उघडण्यासाठी ॲप सिलेक्ट करणे

फाइल उघडताना, तुम्हाला ज्या ॲपद्वारे ती उघडायची आहे ते तुम्ही उल्लेखित करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. तुम्हाला उघडायच्या असलेल्या फाइलवर टच आणि होल्ड करा.

  3. ‘मेन्यू’ मधून ‘ह्यासह उघडा’ निवडा, त्यानंतर पर्याय निवडा.

फाइल उघडण्यासाठी डीफॉल्ट ॲप निवडणे

तुम्ही फाइल उघडण्यासाठी डीफॉल्ट ॲप ठरवू शकता, जेणेकरून तुम्ही त्यावर टॅप केल्यावर फाइल नेहमी त्याच ॲपमध्ये उघडेल.

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. फाइलवर टच आणि होल्ड करा, त्यानंतर ’माहिती मिळवा’ निवडा.

  3. ‘प्रिव्ह्यू’ च्या खाली, ’नेहमी ह्यासह उघडा’ च्या पुढे असलेल्या पॉप अप मेन्यूवर टॅप करा, त्यानंतर ॲप सिलेक्ट करा.

    जेव्हा तुम्ही फाइल उघडण्यासाठी नवीन डिफॉल्ट ॲप सिलेक्ट करता, तेव्हा तुम्हाला त्या फाइलसाठी डिफॉल्ट ॲप बदलायचे आहे की नाही ह्याची पडताळणी करण्यासाठी प्रॉम्प्ट दिसेल.

‘क्विक लूक’ मध्ये फाइल उघडणे

तुम्ही ‘क्विक लूक’ मध्ये इमेज फाइल किंवा PDF प्रिव्ह्यू करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. फाइलवर टच आणि होल्ड करा, ’ह्यासह उघडा’ वर टॅप करा, त्यानंतर ‘क्विक लूकसह प्रिव्ह्यू’ निवडा.

फाइल आणि फोल्डर ब्राऊझ करणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. स्क्रीनच्या तळाशी ’ब्राऊझ करा’ वर टॅप करा, त्यानंतर ’ब्राऊझ करा’ स्क्रीनवरील डॉक्युमेंटवर टॅप करा.

    तुम्हाला ‘ब्राऊझ करा’ स्क्रीन दिसत नसल्यास, ‘ब्राऊझ करा’ वर पुन्हा टॅप करा.

  3. अलीकडे उघडलेल्या फाइल बघण्यासाठी, स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ’अलीकडील’ वर टॅप करा.

  4. फाइल, स्थान किंवा फोल्डर उघडण्यासाठी त्यावर टॅप करा.

    नोट : फाइल ज्या ॲपमध्ये तयार केली, ते ॲप तुम्ही इन्स्टॉल केलेले नसल्यास, फाइलचा प्रिव्ह्यू ‘क्विक लूक’ मध्ये उघडतो.

फोल्डर ‘आवडते’ म्हणून चिन्हांकित करण्याबाबत किंवा टॅग समाविष्ट करण्याबाबतच्या माहितीसाठी, फाइल किंवा फोल्डर टॅग करणे पहा.

फाइल आणि फोल्डर कसे क्रमवार लावले जातात ते बदलणे

  1. तुमच्या iPhone वर फाइल ॲपवर जा.

  2. उघडलेल्या स्थानावरून किंवा फोल्डरवरून, अधिक बटण वर टॅप करा.

  3. पर्याय निवडा : नाव, प्रकार, दिनांक, आकार किंवा टॅग.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.