iPhone वापरून ट्रांझिटसाठी पैसे भरा

तुमच्या स्थानिक ट्रांझिट सिस्टीमनुसार, Apple Pay मधील पेमेंट कार्ड किंवा ‘वॉलेट’ ॲपमध्ये संग्रहित केलेल्या ट्रांझिट कार्डसह तुमचे भाडे देण्यासाठी तुम्ही तुमच्या iPhone चा वापर करू शकता.

नोट : सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही; तुम्ही कुठे Apple Pay वापरून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकता पहा.

‘वॉलेट’ ॲपमधील ट्रांझिट कार्ड. कार्डाच्या खाली ’पैसे समाविष्ट करा’ बटणाच्या पुढे शिल्लक आहे.

‘वॉलेट’ ॲपमध्ये ट्रांझिट कार्ड समाविष्ट करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘वॉलेट’ ॲपवर  जा.

  2. ‘कार्ड समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ‘ट्रांझिट कार्ड’ वर टॅप करा.

  3. यादीतील ट्रांझिट कार्ड निवडा—किंवा स्थान किंवा कार्डच्या नावानुसार सर्च करा—त्यानंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

तुमचे ट्रांझिट कार्ड ट्रान्सफर कसे करावे हे जाणून घेण्यासाठी ’Apple वॉलेट’ मध्ये ट्रांझिट कार्ड समाविष्ट करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

तुमची शिल्लक पाहणे आणि पैसे जमा करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘वॉलेट’ ॲपवर  जा.

  2. शिल्लक आणि व्यवहार पाहण्यासाठी तुमच्या ट्रांझिट कार्डवर टॅप करा.

  3. ‘पैसे भरा’ वर टॅप करा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

अधिक जाणून घेण्यासाठी, ’Apple Pay’ सह तुमचे ट्रांझिट कार्ड टॉप अप करा ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

ट्रांझिट कार्डचे तपशील बघणे आणि सेटिंग बदलणे

  1. तुमच्या iPhone वर ‘वॉलेट’ ॲपवर  जा.

  2. तुमच्या ट्रांझिट कार्डवर टॅप करा, नंतर अधिक बटण वर टॅप करा.

  3. पुढीलपैकी कोणत्याही एकावर टॅप करा :

    • कार्ड नंबर : तुमचा अकाउंट नंबर बघा.

    • कार्डचे तपशील : तुमची अकाउंट शिल्लक बघा; स्टेशन्स आणि कियोस्कवर मदत मिळवण्यासाठी ‘सेवा मोड’ सुरू करा; ‘एक्सप्रेस ट्रांझिट’ सुरू किंवा बंद करा; किंवा ‘वॉलेट’ ॲपमधून कार्ड काढून टाका.

    • नोटिफिकेशन : नोटिफिकेशन चालू किंवा बंद करा.

‘एक्सप्रेस ट्रांझिट’ सह तुमच्या प्रवासासाठी पैसे देणे

‘एक्सप्रेस ट्रांझिट’ सह, तुम्हाला Face ID, Touch ID किंवा तुमच्या पासकोडद्वारे ऑथेंटिकेट करण्याची गरज नाही, आणि तुम्हाला तुमचे डिव्हाइस सक्रिय करण्याची किंवा अनलॉक करण्याची किंवा ॲप उघडण्याची गरज नाही.

नोट : ‘एक्सप्रेस ट्रांझिट’ सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही.

  1. तुमच्याकडे ट्रांझिट नेटवर्कसाठी अनेक कार्ड्स असल्यास, सेटिंग  > ‘वॉलेट व Apple Pay’ > ‘एक्सप्रेस ट्रांझिट कार्ड’ मध्ये डिफॉल्ट ‘एक्सप्रेस ट्रांझिट’ कार्ड सेट करा.

    डीफॉल्टनुसार, तुम्ही पात्र कार्ड समाविष्ट करता तेव्हा ’एक्सप्रेस ट्रांझिट’ सुरू केले जाते.

  2. तुम्ही फेअर गेटजवळ जाता किंवा बसमध्ये चढता, तेव्हा तुमचे डिव्हाइस सुरू केलेले असल्याची खात्री करा (ते इंटरनेटशी कनेक्ट करण्याची गरज नाही).

  3. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत नाही तोपर्यंत तुमच्या iPhone ची वरची बाजू तिकीट गेट स्कॅनरच्या मध्यभागी धरून ठेवा.

तुमचा iPhone चार्ज करणे आवश्यक असले तरीही तुम्ही तुमचे ‘एक्सप्रेस ट्रांझिट’ कार्ड वापरू शकता.

फेअर गेटवर ट्रांझिटसाठी पैसे देणे

तुम्ही ‘एक्सप्रेस ट्रांझिट’ वापरत नसल्यास, पुढील गोष्टी करा :

  1. तुमचे डिव्हाइस सुरू केलेले असल्याची खात्री करा (त्याला इंटरनेटशी कनेक्ट करण्याची गरज नाही).

  2. तुम्ही फेअर गेटजवळ जाता किंवा बसमध्ये चढता, तेव्हा पुढीलपैकी एक करा :

    • iPhone वर Face ID सह : साइड बटणावर डबल क्लिक करा, नंतर Face ID सह ऑथेंटिकेट करण्यासाठी iPhone कडे पहा किंवा तुमचा पासकोड प्रविष्ट करा.

    • Touch ID सह iPhone वर : तुमच्या डिव्हाइसवर ‘लॉक स्क्रीन’ दिसत असताना, होम बटणावर डबल क्लिक करा, नंतर तुमचे बोट Touch ID वर ठेवा.

  3. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवत नाही तोपर्यंत तुमच्या iPhone ची वरची बाजू तिकीट गेट स्कॅनरच्या मध्यभागी धरून ठेवा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.